Homeताज्या बातम्याभ्रष्टाचाराचा कळस चक्क डांबर प्लांट समोर निकृष्ट दर्जाचा डांबरी रस्ता

भ्रष्टाचाराचा कळस चक्क डांबर प्लांट समोर निकृष्ट दर्जाचा डांबरी रस्ता

येरवडा (पुणे) – भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक ते बिंदू माधव बाळासाहेब ठाकरे चौक (डांबर प्लांट समोर) रस्त्याच्या निकृष्ट कामाबाबत तीव्र संताप

येरवडा, पुणे येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक ते बिंदू माधव बाळासाहेब ठाकरे चौक, डांबर प्लांट समोरील रस्त्यावर ठेकेदारामार्फत करण्यात आलेले दुरुस्तीचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते सचिन भोसले यांनी केला आहे.

सदर ठिकाणी रस्त्यावर केवळ डांबराचे पाणी मारून त्यावर खडी टाकण्यात आल्याचे स्पष्ट दिसत आहे. संपूर्ण रस्त्यावर सैल खडी पसरलेली असून त्यामुळे अनेक वाहनचालक घसरून अपघातग्रस्त झाले आहेत. विशेषतः दुचाकी वाहनधारक आणि ॲक्टिवा सारख्या मोपेड चालकांना मोठा धोका निर्माण झाला आहे.

सचिन भोसले यांनी प्रश्न उपस्थित केला आहे की, ठेकेदार फक्त पैसे कमवण्यासाठी काम करत आहे का? तसेच पालिका प्रशासन या कामाची पाहणी का करत नाही? हे काम म्हणजे भ्रष्टाचाराचा कळस असल्याची तीव्र प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली आहे.

जर संबंधित रस्ता तात्काळ दर्जेदार पद्धतीने दुरुस्त करण्यात आला नाही, तर नागरिकांच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला आहे. संबंधित ठेकेदारावर तातडीने कारवाई करून त्याला ब्लॅकलिस्ट करण्यात यावे, ही प्रमुख मागणी करण्यात आली आहे.

तसेच नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक ते बिंदू माधव बाळासाहेब ठाकरे चौक, डांबर प्लांट समोरील रस्त्यावरून प्रवास करताना विशेष काळजी घ्यावी. दुचाकी व मोपेड चालकांनी विशेष सतर्कता बाळगावी. जोपर्यंत रस्त्यावरील सैल खडी पूर्णपणे काढून व्यवस्थित डांबरीकरण केले जात नाही, तोपर्यंत वाहन सावधगिरीने चालवावे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

लोणीकंद परिसरात नाकाबंदी दरम्यान मोक्का व खुनाच्या गुन्ह्यातील ३ कुख्यात आरोपी जेरबंद; पिस्टलसह ६.३६...

पुणे (प्रतिनिधी): पुणे शहर पोलिसांच्या लोणीकंद पोलीस स्टेशनच्या वतीने गुन्हेगारी टोळ्यांवर वचक निर्माण करण्यासाठी एक मोठी आणि यशस्वी कामगिरी करण्यात आली आहे. लोणीकंद पोलीस स्टेशनच्या...

“पुणे मनपा शाळा क्र. १७ मध्ये आर्थिक भ्रष्टाचार आणि वीजचोरी प्रकरण; दोषींवर कारवाईपूर्वी नवीन...

अं पुणे- प्रभाग क्र. २७, नवी पेठ येथील पुणे महानगरपालिका शाळा क्र. १७ (धर्मवीर संभाजी महाराज विद्यालय) येथे २०१८ पासून सत्ताधारी नगरसेवक आणि त्यांच्या कार्यकर्त्यांकडून...

भारती विद्यापीठ पोलिसांची धडाकेबाज कामगिरी: जबरी चोरी करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला अटक; १ लाख ३०...

पुणे: पुणे शहर पोलीस दलाच्या भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनच्या तपास पथकाने जबरी चोरीच्या एका गंभीर गुन्ह्याचा छडा लावत एका सराईत गुन्हेगाराला अटक केली आहे. या...

‘फक्त एक सिग्नल नाही’: लोहगडच्या कड्यावर केतनच्या शेवटच्या पोहोचण्यापासून सिया गोयलचे संरक्षण करण्यासाठी पोलिसांनी...

सिया गोयल (20) आणि चेतन चौधरी (22) यांना 18 जून रोजी पुणे जिल्ह्यातील लोहगड किल्ल्यावरील 25 वर्षीय केतन अग्रवालला ठार मारण्याचा कट रचल्याप्रकरणी...

केतन अग्रवाल हत्या प्रकरणातील आरोपी सिया गोयल, चेतन चौधरी यांना ३ जुलैपर्यंत पोलीस कोठडी...

आरोपी सिया आणि चेतन यांना ३ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पुणे : व्यापारी केतन अग्रवाल यांच्या हत्येप्रकरणी आरोपी सिया गोयल आणि...

error: Content is protected !!