महिला दिनानिमित्त पीएमपीएमएलकडून ८ पर्यटन बसमार्गांवर विशेष सेवा
पुणे, दि. ४ मार्च २०२६ : आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त पुणे महानगर परिवहन महामंडळ (PMPML) कडून नागरिकांसाठी विशेष पर्यटन बससेवा सुरू करण्यात येणार आहे. रविवार, दि. ८ मार्च २०२६ रोजी स्वारगेट मुख्य बसस्थानकावरून ८ प्रसिद्ध पर्यटन मार्गांवर वातानुकूलित ई-बसेस सोडण्यात येणार आहेत.
पुणे, पिंपरी-चिंचवड तसेच पीएमआरडीए कार्यक्षेत्रातील धार्मिक, ऐतिहासिक आणि निसर्गरम्य पर्यटन स्थळांचा आनंद नागरिकांना घेता यावा यासाठी पीएमपीएमएलकडून एकूण १३ पर्यटन बससेवा मार्ग सुरू करण्यात आले आहेत. या पर्यटन बससेवेला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत असून प्रवाशांच्या बुकिंगनुसार बसेस सोडल्या जातात.
महिला दिन आणि सुट्टीचा दिवस लक्षात घेऊन नागरिकांना पर्यटनाची संधी मिळावी यासाठी स्वारगेट बसस्थानकावरून ८ विशेष वातानुकूलित ई-बसेस चालविण्यात येणार आहेत. या बससेवेमध्ये प्रति व्यक्ती फक्त ५०० रुपये इतक्या परवडणाऱ्या दरात पुणे परिसरातील विविध धार्मिक, ऐतिहासिक आणि निसर्गरम्य स्थळांची सफर करता येणार आहे.
कुटुंबीय, मित्रपरिवार तसेच विशेषतः महिला प्रवाशांनी या पर्यटन बससेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन पीएमपीएमएल प्रशासनाने केले आहे.
बुकिंगसाठी केंद्रे
पर्यटन बससेवेचे बुकिंग पुढील पास केंद्रांवर करता येणार आहे –
डेक्कन जिमखाना
पुणे स्टेशन
स्वारगेट
मनपा भवन
कात्रज
हडपसर गाडीतळ
भोसरी बसस्थानक
निगडी बसस्थानक
पर्यटन बससेवेबाबत अधिक माहितीसाठी समन्वयक नितीन गुरव (मो. ९८५०५०१८६२) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
महिला दिनानिमित्त सुरू करण्यात आलेल्या या विशेष पर्यटन बससेवेचे महिला तसेच इतर पर्यटकांनी मोठ्या संख्येने बुकिंग करून लाभ घ्यावा, असे आवाहन पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून करण्यात आले आहे.

(Grievance Redressal – IT Rules 2021)
क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्यूज (Crimemaharashtra.live) हे केंद्र सरकारच्या माहिती तंत्रज्ञान नियम, २०२१ (IT Rules 2021) च्या नियम १८ अंतर्गत नोंदणीकृत आणि नियमांचे पालन करणारे अधिकृत डिजिटल न्यूज पोर्टल आहे. आमच्या पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या कोणत्याही बातमी, लेख किंवा मजकुराबाबत आपल्याला काही आक्षेप किंवा तक्रार असल्यास, आपण आमच्या मुख्य तक्रार निवारण अधिकाऱ्यांकडे लेखी नोंदणी करू शकता.
कायदा आणि नियमांनुसार आपल्या तक्रारीची २४ तासांच्या आत दखल घेऊन १५ दिवसांच्या आत त्याचे निवारण केले जाईल.
📌 मुख्य तक्रार निवारण अधिकारी (Level 1):
अधिकारी: आमीर मोहम्मद शेख (Editor & Publisher)
वेबसाईट: https://crimemaharashtra.live
अधिकृत ईमेल: crimemaharashtra.live@gmail.com
Info@crimemaharashtra.live
कार्यालयीन पत्ता: पुणे, महाराष्ट्रIn accordance with Rule 11(2)(a) of the Information Technology (Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules, 2021, any person having a grievance regarding the content published on Crimemaharashtra.live may send their complaint to the designated Grievance Redressal Officer.
Grievance Officer: Amir Mohammad Shaikh (Editor & Publisher)
Website: https://crimemaharashtra.live
Official Email: crimemaharashtra.live@gmail.com
Address: Pune, Maharashtra, India.
Note: Please ensure that your complaint includes the specific URL of the news article, the date of publication, and a clear description of the grievance along with supporting documents. All grievances will be acknowledged within 24 hours and resolved within 15 days.,























