Homeताज्या बातम्या"माधुरी हत्तीचं दुःख समजलं, पण १५ हरणांच्या मृत्यूवर मौन का?" 'मिस...

“माधुरी हत्तीचं दुःख समजलं, पण १५ हरणांच्या मृत्यूवर मौन का?” ‘मिस फरा चॅरिटेबल फाउंडेशन’चा PETA ला थेट सवाल – निवडक प्राणीप्रेम का?

“माधुरी हत्तीचं दुःख समजलं, पण १५ हरणांच्या मृत्यूवर मौन का?”

‘मिस फरा चॅरिटेबल फाउंडेशन’चा PETA ला थेट सवाल – निवडक प्राणीप्रेम का?

पुणे –

राजीव गांधी प्राणी संग्रहालयात १५ हरणांचे मृत्यू हे प्रशासनाच्या निष्काळजीपणाचे गंभीर उदाहरण असूनही, PETA India व इतर प्राणी कल्याण संस्थांनी या प्रकरणावर मौन पाळल्याने अनेक प्रश्न निर्माण होत आहेत.

एकीकडे कोल्हापूरच्या माधुरी हत्तीच्या वेदनेसाठी सुप्रीम कोर्टात लढणाऱ्या संस्था, दुसरीकडे १५ हरणांच्या सामूहिक मृत्यूवर शांत का आहेत? हा परखड सवाल ‘मिस फरा चॅरिटेबल फाउंडेशन’च्या डॉ. फराह अन्वर हुसैन शेख आणि अनवर शेख यांनी उपस्थित केला आहे.

“निवडक प्राणीप्रेम की केवळ प्रसिद्धीचा हव्यास?”

PETA सारख्या संस्थांनी माधुरी हत्तीच्या मुद्द्यावर भरपूर प्रसिध्दी मिळवली, कोर्टात लढे दिले, प्रसारमाध्यमांचा वापर केला. पण मग पुण्यातील हरणांचे जीवन इतके कमी मोलाचे का?

ही घटना जर खाजगी संस्थेत घडली असती, तर PETA ने आतापर्यंत न्यायालयीन हस्तक्षेप केला असता. पण सरकारी संस्थेतील हलगर्जीपणावर मात्र कोणीच आवाज उठवत नाही, हेच खरे दु:खद आहे.

‘मिस फरा फाउंडेशन’चा सातत्यपूर्ण पाठपुरावा

ही घटना समोर आल्यानंतर ‘मिस फरा चॅरिटेबल फाउंडेशन’ने Times of India आणि इतर माध्यमांच्या मदतीने आवाज उठवला. अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी केली आणि याचिकेचा विचार केला. पण अजूनही दोषींवर कोणतीही कारवाई झालेली नाही.

प्रमुख मागण्या:

1. स्वतंत्र न्यायालयीन चौकशी – राजीव गांधी प्राणी संग्रहालयातील हरणांच्या मृत्यूप्रकरणाची निष्पक्ष चौकशी तातडीने करण्यात यावी.
.

—2. जबाबदार अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई – अक्षम्य हलगर्जीपणासाठी संबंधितांवर कायदेशीर आणि प्रशासकीय कारवाई व्हावी.

3. पारदर्शकता आणि समानता – PETA व इतर संस्थांनी त्यांच्या कामात सर्व प्राण्यांना समान न्याय देण्याचा दृष्टिकोन ठेवावा.
आमचा निर्धार:

‘मिस फरा चॅरिटेबल फाउंडेशन’ प्राणी हक्क, महिला सक्षमीकरण आणि सामाजिक उत्तरदायित्वासाठी लढत राहील. जोपर्यंत हरणांच्या मृत्यूला न्याय मिळत नाही, तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही.

> “प्राणी कल्याण हे प्रसिद्धी मिळवण्याचे साधन नसून एक नैतिक कर्तव्य आहे!”

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

एसपीपीयूच्या विद्यार्थ्यांनी वसतिगृह आणि स्टायपेंडच्या प्रश्नांना झेंडा दाखवला, रोहित पवार यांनी कारवाईचे आश्वासन दिले....

एनसीपी (एसपी) नेते रोहित पवार एसपीपीयूच्या विद्यार्थ्यांसोबत पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या (एसपीपीयू) विद्यार्थ्यांनी रविवारी कॅम्पस भेटीदरम्यान आमदार रोहित पवार यांच्याशी झालेल्या...

भारतीय शास्त्रज्ञांना मलेरिया थांबवण्याचा मार्ग सापडला असेल. पुणे बातम्या

नवी दिल्लीतील रस्त्यावर साचलेले पाणी. भारतामध्ये 2015 पासून मलेरियाच्या प्रकरणांमध्ये अंदाजे 80-87% घट नोंदवली गेली आहे. लडाख, लक्षद्वीप आणि पुद्दुचेरीसह अनेक प्रदेशांमध्ये अलीकडच्या...

पुण्याच्या आयटी कॉरिडॉरमध्ये प्रीमियम, आरोग्य-केंद्रित टिफिन सेवांची भूक वाढत आहे. पुणे बातम्या

पुणे : पुण्यातील आयटी कॉरिडॉरमध्ये प्रीमियम टिफिन सेवांना जोरदार मागणी दिसून येत आहे कारण कार्यरत व्यावसायिक वाढत्या प्रमाणात हेल्दी, गॉरमेट जेवणाचे पर्याय...

गोंधळात टाकणारा फरक : आरोग्य विभागाला पुण्यात डेंग्यूचे ४५२ रुग्ण; PMC फक्त 22 |...

पीएमसीने रुग्णालयांना त्यांचा डेटा सुधारण्यासाठी नोटिसा बजावल्या आहेत. पुणे: शहरातील डेंग्यू आणि चिकुनगुनियाच्या संख्येत PMC आणि राज्य आरोग्य डेटामधील गोंधळात टाकणारा फरक दिसून...

विलगीकरणानंतर दोन वर्षांनी उरुळी-फुरसुंगी येथील टीपी स्कीमला गती मिळाली नाही. पुणे बातम्या

पुणे : पीएमसी हद्दीतून उरुळी-फुरसुंगीचे विलगीकरण होऊन सुमारे दोन वर्षे उलटूनही या भागांची नगररचना (टीपी) योजना रखडली आहे. पीएमसीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले TOI...

error: Content is protected !!