Homeताज्या बातम्यामा.राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या अध्यक्षतेखाली पुणे महानगरपालिकेच्या विकास प्रकल्पांचा सखोल आढावा...

मा.राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या अध्यक्षतेखाली पुणे महानगरपालिकेच्या विकास प्रकल्पांचा सखोल आढावा बैठक संपन्न.

पुणे..महाराष्ट्र राज्याच्या नगर विकास, परिवहन, सामाजिक न्याय, वैद्यकीय शिक्षण, अल्पसंख्यांक विकास व औकाफ राज्यमंत्री मा. श्रीमती माधुरी मिसाळ यांच्या अध्यक्षतेखाली आज दि. २७.०४.२०२६ रोजी पुणे महानगरपालिकेमध्ये विविध विकास प्रकल्पांबाबत आढावा बैठक आयोजित करण्यात आली. यावेळी मान्यवरांच्या उपस्थितीत शहराच्या सर्वांगीण प्रगतीसंदर्भात सखोल चर्चा करण्यात आली.

सदर आढावा बैठकीमध्ये मुळा-मुठा नदी पुनरुज्जीवन प्रकल्प (RFD), अमृत योजना, समाविष्ट ११ गावांचा विकास आराखडा (DP), मलनिःसारण प्रकल्प, पाणी प्रक्रिया प्रकल्प, रस्ते विकास प्रकल्प, प्रधानमंत्री आवास योजना व श्रम साफल्य योजना, पाणीपुरवठा योजना, पावसाळ्यापूर्वीची रस्त्यांची कामे व नाला सफाई, आपत्ती व्यवस्थापन, वाहतूक आराखडा, घनकचरा व्यवस्थापन तसेच नव्याने समाविष्ट २३ गावांमधील नागरी सुविधा (रस्ते, पाणी, सांडपाणी) आणि शाळा व रुग्णालयांचे

आधुनिकीकरण व दर्जा सुधारणा या महत्त्वाच्या विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी शहराच्या वाढत्या गरजांना अनुसरून प्रकल्पांची गती वाढवणे, नागरिकांना दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देणे आणि आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर आवश्यक ती तयारी पूर्ण करणे यावर विशेष भर देण्यात आला. पुणेकरांना अधिक सक्षम पायाभूत सुविधा, सुयोग्य नियोजन, स्वच्छ व सुंदर शहर तसेच आधुनिक नागरी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सुरू असलेल्या आणि आगामी विविध प्रकल्पांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. यावेळी विकासकामांना अधिक वेग, गुणवत्ता आणि परिणामकारकता देण्यावर विशेष भर देण्यात आला.

बैठकीच्या सुरुवातीला मा. महापौर सौ. मंजुषा दीपक नागपुरे यांनी मा. राज्यमंत्री श्रीमती माधुरी मिसाळ यांचे स्वागत केले. सदर बैठकीसाठी मा. उपमहापौर श्री. परशुराम वाडेकर, मा. स्थायी समिती अध्यक्ष श्री. श्रीनाथ भिमाले, मा. विरोधी पक्षनेते श्री. निलेश निकम, रिपब्लिकन पार्टी आठवले गटाच्या मा. पक्षनेत्या सौ. हिमाली कांबळे, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे मा. पक्षनेते श्री. सोपान चव्हाण, शिवसेना उ.बा.ठा.चे मा.पक्षनेते श्री. नितीन गावडे, मा.महापालिका आयुक्त श्री. नवल किशोर राम, मा. अतिरिक्त महापालिका आयुक्त (जनरल) श्रीमती पवनीत कौर, मा. अतिरिक्त महापालिका आयुक्त (विशेष) श्री. ओमप्रकाश दिवटे, मा.उपायुक्त, मा.खातेप्रमुख, तसेच संबंधित महापालिका अधिकारी व कर्मचारी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पुण्यात पोलिसांची मोठी कारवाई: काळेपडळमधून सुगंधी गुटखा व तंबाखूजन्य पदार्थांचा साठा जप्त, आरोपीला ठोकल्या...

पुणे, दिनांक २६ जून २०२६: महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेल्या सुगंधी गुटखा, सुपारी आणि तंबाखूजन्य पदार्थांची बेकायदेशीर साठवणूक आणि विक्री करणाऱ्यांविरोधात पुणे शहर पोलिसांच्या काळेपडळ पोलीस...

‘केतनने मला सांगितले की लग्न मोडण्यास उशीर झाला आहे’: पोलिसांनी म्हटले आहे की सिया...

चॅट्स सिया गोयलच्या विधानांच्या विरोधात आहेत, लोणावळा पोलिस म्हणतात लोणावळा: रियाल्टर केतन अग्रवालच्या कथित हत्येच्या तपासाला नवे वळण मिळाले आहे, पोलिसांनी दावा केला...

लोहगड किल्ला खून प्रकरण: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केतन अग्रवालच्या वडिलांची भेट घेतली, जलदगती...

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जलदगती न्यायालयाचे आदेश दिले असून धक्कादायक लोहगड किल्ला हत्याकांडप्रकरणी उज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती केली...

​कर्बलाच्या शहीदांच्या स्मरणार्थ एकतेची मिसाल: मोहरमच्या रात्री पुण्यात सरबतासाठी मोफत साखर वाटप

​पुणे, दि. २५ जून २०२६: मुस्लिम बांधवांचा पवित्र महिना 'मोहरम'च्या नवव्या दिवशी, म्हणजेच 'कत्तलची रात्र' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रात्री, 'पंजेतन पवित्र संघटना, महाराष्ट्र राज्य' यांच्या...

मुंबई लोकल हत्या: ‘सोशल मीडिया ट्रायल’मुळे आमच्या आयुष्यावर, नोकऱ्यांवर परिणाम; असे आरोपीच्या कुटुंबीयांचे म्हणणे...

सोशल मीडिया ट्रायलमुळे आमचे जीवन आणि नोकऱ्यांवर परिणाम होत आहे, असे मुंबई लोकल ट्रेनवर चाकूहल्ला करणाऱ्या आरोपीचे नातेवाईक म्हणतात मुंबई: मुंबई लोकल ट्रेनमध्ये...

error: Content is protected !!