प
पुपुणे शहरातील नागरिकांच्या हातातील मोबाईल हिसकावून पळ काढणाऱ्या दोन सराईत गुन्हेगारांना येरवडा पोलिसांनी अत्यंत शिताफीने अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून एकूण ४३ मोबाईल फोन आणि इतर मुद्देमाल असा एकूण २,६५,५००/- रुपयांचा ऐवज हस्तगत करण्यात आला आहे.
घटनेची पार्श्वभूमी
दिनांक २९/०४/२०२६ रोजी येरवडा पोलीस स्टेशनच्या हद्दीत सह्याद्री हॉस्पिटलसमोरील गल्लीत एक नागरिक रात्रीचे जेवण करून शतपावली करत असताना दोन अज्ञात इसमांनी त्यांच्या हातातील मोबाईल हिसकावून नेला होता. याप्रकरणी येरवडा पोलीस स्टेशनमध्ये भारतीय न्याय संहिता कलम ३०४, ३(४) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
अशी झाली अटक
गुन्हा दाखल होताच वरिष्ठांच्या सूचनेनुसार तपास पथकाने चक्रे फिरवली. तपास पथकातील पोलीस अंमलदार साईनाथ म्हस्के यांना त्यांच्या खास बातमीदाराकडून माहिती मिळाली की, चोरीचे मोबाईल विक्री करण्यासाठी काही तरुण येणार आहेत. मिळालेल्या माहितीच्या आधारे सपोनि प्रसन्न जराड, पोलीस अंमलदार राहुल ठोंबरे आणि किरण गंभीरे यांनी सापळा रचला. पोलिसांनी संशयितांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी त्यांना शिताफीने पकडले.
ताब्यात घेतलेले आरोपी
१. राजकुमार सोनु पाटील (वय १९, रा. राजगुरु चौक, ताडीवाला रोड, पुणे).
२. गौरव बाळु खुडे (वय १८, रा. अप्पर व्हिआयटी, बिबवेवाडी, पुणे).
गुन्ह्याची पद्धत
आरोपींनी चौकशीत धक्कादायक खुलासे केले आहेत. मौजमजा करण्यासाठी ते निर्जन स्थळी वयोवृद्ध व्यक्ती आणि महिलांना लक्ष्य करत असत. तसेच पुणे रेल्वे स्टेशनसारख्या गर्दीच्या ठिकाणी प्रवाशांच्या खिशातून मोबाईल लंपास केल्याची कबुलीही त्यांनी दिली आहे. त्यांच्याकडे असलेल्या पांढऱ्या पिशवीत सुरुवातीला १९ मोबाईल मिळून आले होते, मात्र सखोल तपासात एकूण ४३ मोबाईल जप्त करण्यात आले.
तपास पथक आणि मार्गदर्शन
ही यशस्वी कामगिरी अप्पर पोलीस आयुक्त श्री. मनोज पाटील, पोलीस उपायुक्त (परिमंडळ ४) श्री. चिलुमूला रजनिकांत, सहा. पोलीस आयुक्त श्री. सुनिल जैतापुरकर, आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. अंजुम बागवान यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
या मोहिमेत पोलीस निरीक्षक (गुन्हे) विजय ठाकर, सपोनि प्रसन्न जराड, पोलीस उपनिरीक्षक किशोर बेरड (तपास अधिकारी), तसेच पोलीस अंमलदार शैलेश वाबळे, मुकुंद कोकणे, संदिप जायभाय, साईनाथ म्हस्के, नटराज सुतार, बालाजी सोगे, गणेश पालवे, अनिल मन्हाळकर, राहुल ठोंबरे आणि किरण गंभीरे यांचा समावेश होता.
सध्या पोलीस उपनिरीक्षक किशोर बेरड या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

(Grievance Redressal – IT Rules 2021)
क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्यूज (Crimemaharashtra.live) हे केंद्र सरकारच्या माहिती तंत्रज्ञान नियम, २०२१ (IT Rules 2021) च्या नियम १८ अंतर्गत नोंदणीकृत आणि नियमांचे पालन करणारे अधिकृत डिजिटल न्यूज पोर्टल आहे. आमच्या पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या कोणत्याही बातमी, लेख किंवा मजकुराबाबत आपल्याला काही आक्षेप किंवा तक्रार असल्यास, आपण आमच्या मुख्य तक्रार निवारण अधिकाऱ्यांकडे लेखी नोंदणी करू शकता.
कायदा आणि नियमांनुसार आपल्या तक्रारीची २४ तासांच्या आत दखल घेऊन १५ दिवसांच्या आत त्याचे निवारण केले जाईल.
📌 मुख्य तक्रार निवारण अधिकारी (Level 1):
अधिकारी: आमीर मोहम्मद शेख (Editor & Publisher)
वेबसाईट: https://crimemaharashtra.live
अधिकृत ईमेल: crimemaharashtra.live@gmail.com
Info@crimemaharashtra.live
कार्यालयीन पत्ता: पुणे, महाराष्ट्रIn accordance with Rule 11(2)(a) of the Information Technology (Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules, 2021, any person having a grievance regarding the content published on Crimemaharashtra.live may send their complaint to the designated Grievance Redressal Officer.
Grievance Officer: Amir Mohammad Shaikh (Editor & Publisher)
Website: https://crimemaharashtra.live
Official Email: crimemaharashtra.live@gmail.com
Address: Pune, Maharashtra, India.
Note: Please ensure that your complaint includes the specific URL of the news article, the date of publication, and a clear description of the grievance along with supporting documents. All grievances will be acknowledged within 24 hours and resolved within 15 days.,























