राहुरी नगरपरिषद हद्दीत स्मशानभूमीकडे दुर्लक्ष; प्रेत जळत असताना कुत्र्यांचा सुळसुळाट. नागरिकांचा संताप.
क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्युज सहसंपादक शिवाजी दवणे 9730170965
– राहुरी नगरपरिषद हद्दीत असलेल्या नगरपरिषद स्मशानभूमीकडे प्रशासनाचे उघडपणे दुर्लक्ष असल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे. स्मशानभूमीत अंत्यसंस्कार सुरू असतानाच परिसरात भटक्या कुत्र्यांचा मोठ्या प्रमाणात सुळसुळा सुरू असून, मृतदेहाजवळ फिरणाऱ्या कुत्र्यांमुळे अंत्यसंस्कार प्रक्रियेचा पवित्रपणा भंग होत असल्याची नाराजी व्यक्त केली जात आहे.
या गंभीर परिस्थितीकडे आरोग्य अधिकारी राजेंद्र पवार तसेच मुख्याधिकारी हे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. “प्रेताची अंत्ययात्रा सुरू असताना किंवा चिता पेटलेली असतानाही कुत्रे फिरत राहतात. हा प्रकार केवळ असंवेदनशील नव्हे तर अत्यंत असभ्य आहे,” अशी प्रतिक्रिया स्थानिकांनी दिली.
नागरिकांच्या म्हणण्यानुसार, स्मशानभूमी परिसर स्वच्छ ठेवणे, सुरक्षा राखणे आणि अनुशासन पाळणे ही नगरपरिषदेची जबाबदारी आहे. मात्र प्रत्यक्षात तिथे कोणताही कर्मचारी, सुरक्षा रक्षक किंवा देखभाल करणारा उपलब्ध नसल्याने सार्या जबाबदाऱ्या नागरिकांवरच येत आहेत.
नागरिकांची ठाम मागणी आहे की
स्मशानभूमीत कायमस्वरूपी कर्मचारी नेमावा
परिसर स्वच्छ ठेवण्याची सोय करावी
कुत्र्यांचा वावर थांबवण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात
या संदर्भात नगरपरिषद प्रशासन काय उपाययोजना करणार याकडे रहिवाशांचे लक्ष आहे.

नियम व अटी / Disclaimer:
वरील माहिती विविध ओपन सोर्स माध्यमांतून, सोशल मीडियातील चर्चांमधून तसेच उपलब्ध असलेल्या सार्वजनिक वाचन-सामग्रीवर आधारित आहे. “क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्युज” (Crime Maharashtra Live News) व त्याचे संपादक, प्रतिनिधी किंवा संबद्ध कर्मचारी या माहितीच्या संपूर्ण सत्यतेचा दावा करत नाहीत.ही माहिती केवळ जनहितार्थ, समाजजागृती व चर्चेसाठी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. कृपया वाचक/दर्शकांनी संबंधित अधिकृत यंत्रणांकडून खातरजमा करूनच कोणताही निर्णय घ्यावा. या माहितीमध्ये काही बाबी चुकीच्या, अपूर्ण किंवा कालांतराने बदललेल्या असू शकतात. त्यामुळे कोणतीही कायदेशीर अथवा प्रशासकीय कृती करण्यापूर्वी अधिकृत स्रोताची खात्री करणे अत्यावश्यक आहे.. तथापि, या बातम्यांमुळे उद्भवणाऱ्या कोणत्याही गैरसमज किंवा नुकसानीस Crime Maharashtra Live News जबाबदार राहणार नाही.> टीप: जर कोणाला आमच्या बातमीबाबत आक्षेप असल्यास, कृपया आम्हाला [crimemaharashtra.live@gmail.com] वर संपर्क करा.मोबाईल नंबर 7744808833






















