Homeक्राईमशिवसेनेचा आक्रमक पवित्रा – “आंबील ओढा सीमाभिंतीचा निधी कुठे गेला?”

शिवसेनेचा आक्रमक पवित्रा – “आंबील ओढा सीमाभिंतीचा निधी कुठे गेला?”

पुणे (प्रतिनिधी):
२०१९ मध्ये आलेल्या महापुरामुळे संपूर्ण पुणे हादरले होते. आंबील ओढ्याने अनेक वस्ती, झोपडपट्ट्या आणि सोसायट्यांना पाण्यात बुडवले. या प्रलयानंतर शहरात नालेसफाई, अतिक्रमण हटाव आणि सीमाभिंतीची गरज स्पष्ट झाली होती. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे हा पूर पुणेकरांच्या जिवावर बेतला आणि त्याच वेळी प्रशासनाच्या कामकाजावरही मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झाले.

याच पार्श्वभूमीवर, तत्कालीन महापौर मुरलीधर मोहोळ यांनी महाराष्ट्र शासनाकडे आंबील ओढ्याच्या सीमाभिंतीसाठी पाठपुरावा केला. शासनाकडून २०० कोटी रुपयांचा निधी मंजूर केल्याचे पत्र पुणे महापालिकेला मिळाले. मात्र, या निधीचे काय झाले, हा मोठा प्रश्न आजही अनुत्तरित आहे. निवडणुकीच्या तोंडावर भाजपा नेत्यांनी आणि तत्कालीन महापौर यांनी या निधीच्या घोषणा करत होर्डिंगबाजी केली, आणि पुणेकरांना गंडवले. प्रत्यक्षात निधी मिळाला नाही, काम झाले नाही आणि पुणेकर पुन्हा संकटाच्या छायेत राहिले.

या फसवणुकीविरोधात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने आज दत्तवाडी येथे आंबील ओढ्यावर जोरदार आंदोलन करण्यात आले. “पुणेकरांची दिशाभूल करणाऱ्या भाजपाच्या खोट्या घोषणांचा निषेध करतो,” २०० कोटी गेले कुठे, अश्या घोषणा यावेळी देण्यात आल्या .

आंबील ओढा सीमाभिंत प्रश्न स्थानिक कार्यकर्ते, शिवसेना प्रसिद्धी प्रमुख अनंत घरत यांनी वेळोवेळी मांडला प्रशासनाने त्यावर स्थळ पाहणी केली पण पुढील कार्यवाही होत नाही, हे निष्क्रिय प्रशासनाचे लक्षण आहे.

यावेळी आंदोलनाचे नेतृत्व शहरप्रमुख संजय मोरे,गजानन थरकुडे, यांनी केले. त्यांच्या सोबत, माजी नगरसेवक अशोक हरणावळ, सचिव मकरंद पेठकर, प्रसिद्धी प्रमुख अनंत घरत, उपशहरप्रमुख पंढरीनाथ खोपडे, आबा कुंभारकर, शहर संघटक राजेंद्र शिंदे, दिपक जगताप, महिला आघाडीच्या रेखा कोंडे, मनीषा गरुड, विभागप्रमुख चंदन साळुंके, नंदू येवले, वाहतूक सेना जिल्हाध्यक्ष दत्ता घुले, आरोग्य सेनेचे रमेश क्षीरसागर, तसेच बाळासाहेब गरुड, गणेश घोलप, गिरीश गायकवाड, रूपेश पवार, निलेश वाघमारे, संजय साळवी, किरण जगताप, प्रतीक गालिंदे, नागेश खडके, मनोज यादव, विजय जोरी, नितीन दलभंजन, शिवम खोपडे, मोहन देशपांडे, राहुल शेडगे, विनोद वांजले, रमेश लडकत, राजेश शेलार, मनीष घरत, सनी गायकवाड, सचिन बाबर, हृषिकेश गायकवाड, जगदीश रेड्डी आदी शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष यापुढेही पुणेकरांच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरणार आहे आणि निधी मिळेपर्यंत लढा थांबणार नाही, वेळप्रसंगी पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांच्या नवीन कार्यालयाबाहेर आंदोलन केले जाईल असा निर्धार यावेळी करण्यात आला.

अनंत रामचंद्र घरत
शिवसेना प्रसिद्धी प्रमुख पुणे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

हडपसर दारूकांड: २२ बळी घेणारा सराईत आरोपी वेषांतर करून पळून जाण्याच्या तयारीत असताना जेरबंद

पुणे ग्रामीण: उरूळी कांचन पोलीस ठाणे आणि सी.आय.डी. पुणे यांच्या संयुक्त पथकाने हडपसर दारूकांडातील मुख्य तथा सराईत आरोपीला शिताफीने ताब्यात घेतले आहे. पुणे शहर हद्दीत...

शिरूर पोलीस स्टेशन हद्दीत एन.डी.पी.एस. कायद्यांतर्गत मोठी कारवाई: ५६ ग्रॅम एम.डी. अंमली पदार्थासह दोन...

पुणे ग्रामीण: ‘नशामुक्त भारत अभियान’ व ‘ड्रग्ज फ्री महाराष्ट्र’ या उपक्रमांतर्गत पुणे ग्रामीण पोलीस दलाच्या क्षेत्रात अंमली पदार्थांची बेकायदेशीर विक्री रोखण्यासाठी विशेष मोहीम हाती घेण्यात...

​पुणे शहर पोलिसांची मोठी कारवाई: ४ कोटींहून अधिक किमतीच्या अंमली पदार्थांची विल्हेवाट

पुणे: केंद्र सरकारच्या "ड्रग मुक्त भारत" या संकल्पाच्या दिशेने एक मोठे पाऊल टाकत, पुणे शहर पोलीस गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथक-१ ने एका कारवाईत...

शिरूर घरफोडी प्रकरणाचा छडा: स्थानिक गुन्हे शाखा व पुणे ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई; तीन...

​पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून प्राप्त झालेल्या अधिकृत प्रेस नोटनुसार, स्थानिक गुन्हे शाखा, पुणे ग्रामीण तसेच सासवड व शिरूर पोलीस स्टेशनच्या संयुक्त पथकाने शिरूर...

पर्वती पोलीस ठाण्यात गंभीर गुन्ह्यांची नोंद: व्हॉट्सॲप स्टेटसद्वारे बदनामी व जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी दोघांवर...

सविस्तर वृत्त (प्रथम खबर अहवालानुसार) ​पुणे शहरातील पर्वती पोलीस ठाण्याच्या हद्दीत सोशल मीडियाच्या माध्यमातून एका महिलेची आणि तिच्या कुटुंबाची लैंगिक व सामाजिक बदनामी केल्याप्रकरणी तसेच...

error: Content is protected !!