समलैंगिक अत्याचार प्रकरणी पोलीस अधिकारी निलंबित
सहसंपादक शिवाजी दवणे 9730170965
क्राईम महाराष्ट्र न्यूज
कायमच वादग्रस्त ठरलेला पोलीस उप निरीक्षक सज्जन नाऱ्हेडा याचा आणखी एक प्रताप समोर आला असून या विकृत पोलीस अधिकाऱ्याने एका पोस्कोच्या गुन्ह्यात ताब्यात घेतलेल्या तीन तरुणांना एकमेकांशी सम लैंगिक चाळे करण्यास लावले. या घटनेची वरीष्ठ अधिकाऱ्यांनी दखल घेऊन सज्जन नाऱ्हेडा या पोलीस उप निरीक्षकास तडका फडकी निलंबित केले.
२२ जुलै २०२५ रोजी जळगाव जिल्ह्यातील चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्यात एका अल्पवयीन मुलीच्या अपहरणचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्ह्याचा तपास पोलिस उप निरीक्षक सज्जन नाऱ्हेडा याच्याकडे होता. पिडीत मुलीला पळवून लावण्यास मदत केली या संशयावरुन सज्जन नाऱ्हेडा याने एक महिला व तीन तरुणांना चौकशीसाठी पोलीस ठाण्यात बोलावून घेतले. चौकशी दरम्यान सज्जन नाऱ्हेडा याने त्या चौघांना पट्ट्याने बेदम मारहाण केली. नंतर त्या तीन तरुणांना स्वतःच्या अंगावरील कपडे काढण्यास सांगीतले आणि परस्पराशी समलैंगिक अतिशय घाणेरडे असे विकृत चाळे करण्यास लावले. सदर घाणेरडा प्रकार चोपडा ग्रामीण पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनिल भवारी यांच्या लक्षात आला. त्यांनी ताबडतोब पोलीस उप निरीक्षक सज्जन नाऱ्हेडा याला निलंबित करण्याची शिफारस जिल्हा पोलीस प्रमुख डॉ. महेश्वर रेड्डी यांच्याकडे पाठवली. नंतर काही स्थानिक नेत्यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांना निवेदन देऊन पोलीस उप निरीक्षक सज्जन नाऱ्हेडा याला निलंबित करण्याची मागणी केली.
त्यानंतर पोलीस उप निरीक्षक सज्जन नाऱ्हेडा याला निलंबित करण्यात आले असून त्याची विभागीय चौकशी सुरू करण्यात आली. तसेच तो चौकशीत दोषी निष्पन्न झाल्यानंतर गुन्हा दाखल करून पुढील कारवाई करण्यात येईल, अशी माहिती पोलीस सूत्रांकडून समजली.
सज्जन नाऱ्हेडा हा पोलीस उप निरीक्षक काही वर्षापूर्वी राहुरी येथील पोलिस ठाण्यात कार्यरत असताना राहुरी तालुक्यातील एका विवाहित महिलेवर बलात्कार केल्याचा गुन्हा त्याच्यावर दाखल करण्यात आला होता. त्यानंतर तो अनेक दिवस पसार होता. तेव्हा आरपीआय संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आक्रमक भूमिका घेऊन आरोपी सज्जन नाऱ्हेडा याला अटक करण्याची मागणी केली होती. मात्र त्यावेळी आरोपी सज्जन नाऱ्हेडा याने न्यायालयात अटकपूर्व जामीन मंजूर करून घेतला. त्यानंतर तो अहिल्यानगर मुख्यालयात कामावर रुजू झाला होता. काही महिन्यांपूर्वीच तो जळगाव जिल्ह्यातील चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्यात पोलीस उप निरीक्षक पदावर रुजू झाला होता. आणि सदर अतिशय घाणेरडा असा विकृत प्रकार करुन पुन्हा वादग्रस्त ठरला.

नियम व अटी / Disclaimer:
वरील माहिती विविध ओपन सोर्स माध्यमांतून, सोशल मीडियातील चर्चांमधून तसेच उपलब्ध असलेल्या सार्वजनिक वाचन-सामग्रीवर आधारित आहे. “क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्युज” (Crime Maharashtra Live News) व त्याचे संपादक, प्रतिनिधी किंवा संबद्ध कर्मचारी या माहितीच्या संपूर्ण सत्यतेचा दावा करत नाहीत.ही माहिती केवळ जनहितार्थ, समाजजागृती व चर्चेसाठी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. कृपया वाचक/दर्शकांनी संबंधित अधिकृत यंत्रणांकडून खातरजमा करूनच कोणताही निर्णय घ्यावा. या माहितीमध्ये काही बाबी चुकीच्या, अपूर्ण किंवा कालांतराने बदललेल्या असू शकतात. त्यामुळे कोणतीही कायदेशीर अथवा प्रशासकीय कृती करण्यापूर्वी अधिकृत स्रोताची खात्री करणे अत्यावश्यक आहे.. तथापि, या बातम्यांमुळे उद्भवणाऱ्या कोणत्याही गैरसमज किंवा नुकसानीस Crime Maharashtra Live News जबाबदार राहणार नाही.> टीप: जर कोणाला आमच्या बातमीबाबत आक्षेप असल्यास, कृपया आम्हाला [crimemaharashtra.live@gmail.com] वर संपर्क करा.मोबाईल नंबर 7744808833























