Homeताज्या बातम्यासासवड इफ्तार पार्टी हल्ला प्रकरण : आरोपींना तात्काळ अटक करण्याच्या मागणीसाठी पुणे...

सासवड इफ्तार पार्टी हल्ला प्रकरण : आरोपींना तात्काळ अटक करण्याच्या मागणीसाठी पुणे ग्रामीण CP कार्यालयासमोर धरणे आंदोलन

सासवड इफ्तार पार्टी हल्ला प्रकरण : आरोपींना तात्काळ अटक करण्याच्या मागणीसाठी पुणे ग्रामीण CP कार्यालयासमोर धरणे आंदोलन

पुणे (प्रतिनिधी) : सासवड येथे आयोजित इफ्तार पार्टी दरम्यान मुस्लिम तरुणांवर झालेल्या हल्ल्याच्या गंभीर प्रकरणात अद्याप आरोपींना अटक करण्यात आलेली नसल्याने संतप्त प्रतिक्रिया उमटत असून, या पार्श्वभूमीवर समाजवादी पार्टीच्या वतीने पुणे ग्रामीण पोलीस आयुक्त (CP) कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.
या आंदोलनात राष्ट्रीय दलित पॅंथर सेना आणि SDPI (सोशल डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया) यांनी सक्रिय पाठिंबा दर्शवला. आंदोलनकर्त्यांनी “आरोपींना तात्काळ अटक करा”, “पीडितांना न्याय द्या” अशा जोरदार घोषणाबाजी करत प्रशासनाचे लक्ष वेधले.
सदर प्रकरणात हल्लेखोरांचा घोळका उघडपणे हिंसाचार करत असल्याचे समोर आले असून, तरीही पोलिसांकडून कारवाई होत नसल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला. यामुळे कायदा व सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत असल्याचेही त्यांनी नमूद केले.
या वेळी उपस्थित मान्यवरांनी प्रशासनावर तीव्र शब्दांत टीका करत सांगितले की, “जर लवकरात लवकर आरोपींना अटक झाली नाही, तर राज्यभर तीव्र आंदोलन छेडले जाईल.” तसेच, पीडितांना संरक्षण व न्याय मिळावा, दोषींवर कठोर कलमांखाली गुन्हे दाखल करून तात्काळ कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली.
या आंदोलनात पुढील मान्यवर उपस्थित होते :
राष्ट्रीय दलित पॅंथर सेनेच्या राष्ट्रीय अध्यक्षा सौ. आस्मा ताई शेख
मा. वसीम शब्बीर शेख (महाराष्ट्र राज्य सरचिटणीस)
मा. दशरथ भाऊ गायकवाड (राज्य प्रवक्ता)
मा. अदनान भाई बागवान (पुणे जिल्हा अध्यक्ष)
सौ. उषा ताई सोनवणे (पुणे शहर युवती अध्यक्ष)
अ‍ॅड. तौफीक शेख (सल्लागार)
मा. अजहर भाई तांबोळी (SDPI प्रदेशाध्यक्ष)
मा. दिलावर भाई सैय्यद (SDPI प्रदेश कार्यकारिणी सदस्य)
मा. असलम भाई सय्यद (SDPI पुणे जिल्हा अध्यक्ष)
यावेळी विविध संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मुख्य मागण्या :
सासवड इफ्तार पार्टी हल्ला प्रकरणातील सर्व आरोपींना तात्काळ अटक करावी.
पीडितांना पोलीस संरक्षण व न्याय मिळवून द्यावा.
दोषींवर कठोर कलमांखाली गुन्हे दाखल करून जलदगतीने कारवाई करावी.
प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून जबाबदार अधिकाऱ्यांवरही कारवाई करावी.
आंदोलनकर्त्यांनी प्रशासनाला इशारा देत सांगितले की, लवकरात लवकर कारवाई न झाल्यास राज्यभर तीव्र आंदोलन उभारले जाईल.
(क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्यूज – पुणे)

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

वडगाव शेरी येथे पुणे पोलिसांची मोठी कारवाई; ३ लाख ६५ हजारांचा बेकायदेशीर गुटखा आणि...

पुणे (विशेष प्रतिनिधी): अंमली पदार्थ विरोधी दिनाचे औचित्य साधून पुणे शहर पोलिसांच्या गुन्हे शाखेने एक मोठी कारवाई केली आहे. वडगाव शेरी परिसरातील एका गोदामावर छापा...

लष्कराच्या QMTI ने अपंग सैनिकांना सक्षम करण्यासाठी ड्रोन आणि EV दुरुस्ती अभ्यासक्रम सुरू केले...

लष्कराच्या QMTI ने अपंग सैनिकांसाठी अभ्यासक्रम सुरू केले आहेत पुणे : क्वीन मेरीज टेक्निकल इन्स्टिट्यूट (QMTI) ने अपंग सैनिकांसाठी ड्रोन तंत्रज्ञान आणि इलेक्ट्रिक...

‘सिया गोयलची विग टिप्पणी, जबरदस्ती लग्न, गुप्त संबंध’: केतन अग्रवाल खून प्रकरणात ट्विस्टनंतर ट्विस्ट....

पोलिसांनी केतन अग्रवालची मंगेतर, सिया गोयल (20) आणि तिचा कथित साथीदार, चेतन चौधरी (22) यांना अटक केली आहे, त्यांच्यावर 18 जून रोजी 25...

पुणे पोलिसांची मोठी कारवाई: मोटार सायकल चोरी करणारी टोळी जेरबंद; ६ गुन्हे उघडकीस, ४...

​पुणे, दिनांक २७ जून २०२६: पुणे शहर पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट ७ च्या पथकाने वाघोली परिसरात धडक कारवाई करत मोटार सायकल चोरी करणाऱ्या एका सक्रिय...

​जीवे मारण्याची व बांधकाम पाडण्याची भीती दाखवून १० लाखांची खंडणी मागणाऱ्या भीम संघर्ष संघटनेच्या...

पुणे: ममता फाउंडेशन संस्थेच्या इमारतीचे व घरांचे बांधकाम पाडण्याची आणि जीवे मारण्याची भीती दाखवून तब्बल १० लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्या आरोपींना पुणे शहर पोलिसांच्या भारती...

error: Content is protected !!