Homeउद्योग"पुणे महापालिकेची भूमिका संशयास्पद" हडपसर, फुरसुंगी, शेळकेवाडी परिसरात बिल्डरांची बेकायदेशीर जाहिरातबाजी –...

“पुणे महापालिकेची भूमिका संशयास्पद” हडपसर, फुरसुंगी, शेळकेवाडी परिसरात बिल्डरांची बेकायदेशीर जाहिरातबाजी – पुणे महानगरपालिका मात्र मौनधारण

हडपसर, फुरसुंगी, शेळकेवाडी परिसरात बिल्डरांची बेकायदेशीर जाहिरातबाजी – पुणे महानगरपालिका मात्र मौनधारण

पुणे | दि. २८ मे २०२५

हडपसर, फुरसुंगी, शेळकेवाडी या परिसरात अलीकडील काही महिन्यांपासून बांधकाम व्यावसायिक (बिल्डर) आणि रिअल इस्टेट एजंट यांच्याकडून मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर जाहिरातबाजी सुरू आहे. रस्त्यांच्या कडेला, सार्वजनिक ठिकाणी, वीजखांबांवर, झाडांवर आणि महापालिकेच्या मालकीच्या भिंतींवर मोठ्या प्रमाणात फलक, होर्डिंग्ज आणि पोस्टर्स लावण्यात आले आहेत. यामुळे सार्वजनिक सौंदर्यावर परिणाम होत असून नागरिकांच्या सुरक्षिततेलाही धोका निर्माण झाला आहे.

विशेष म्हणजे, यातील बहुतांश जाहिराती परवानगी न घेता लावण्यात आल्या आहेत. यामध्ये अनेक बिल्डर्सनी स्वतःच्या प्रोजेक्ट्सची माहिती, आकर्षक ऑफर्स आणि बुकिंग संदर्भातील मेसेजेस मोकळेपणाने चिटकवले आहेत. यासाठी ना महापालिकेची परवानगी घेतली, ना कर भरला गेला आहे.

महापालिकेची भूमिका संशयास्पद

पुणे महानगरपालिका जाहिरात विभागाकडे या बेकायदेशीर जाहिरातबाजीबाबत अनेक वेळा तक्रारी करण्यात आल्या आहेत. परंतु महापालिकेकडून कुठलाही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही. विशेष म्हणजे जेव्हा सामान्य व्यावसायिक किंवा छोटे दुकानदार पोस्टर लावतात, तेव्हा तत्काळ दंडात्मक कारवाई केली जाते. मग मोठे बिल्डर्स आणि त्यांच्याशी संबंधित लोकांवर कारवाई का केली जात नाही? असा प्रश्न नागरिकांमध्ये निर्माण झाला आहे.

या प्रकारामुळे महापालिकेच्या जाहिरात विभागातील काही अधिकाऱ्यांच्या भूमिकेवरही संशय घेतला जात आहे. बिल्डर्सना अभय दिले जात असल्याचा आरोप स्थानिक सामाजिक कार्यकर्त्यांनी केला आहे.

कायदा काय सांगतो?

महाराष्ट्र महानगरपालिका कायद्यानुसार कोणत्याही सार्वजनिक जागेवर जाहिरात लावण्यासाठी पालिकेची परवानगी घेणे आवश्यक आहे. तसेच त्या बदल्यात जाहिरात कर भरणे बंधनकारक आहे. बेकायदेशीर जाहिरात लावणाऱ्यावर दंडात्मक कारवाई होणे आवश्यक आहे.

मागणी

संबंधित विभाग प्रमुखांनी याची दखल घेऊन या जाहिरात रॅकेटवर तत्काळ कारवाई करावी, दोषींवर दंडात्मक कारवाई करून जाहिराती काढून टाकाव्यात, आणि या प्रकाराला पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांचीही चौकशी व्हावी, अशी जोरदार मागणी नागरिक, सामाजिक संस्था आणि स्थानिक आंदोलक करत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

की कोंढवा जंक्शनवर खोदकाम केल्यानंतर दुरुस्ती न केलेल्या रस्त्यामुळे पावसाळ्यात पुराची भीती निर्माण झाली...

खोदलेल्या पॅचमुळे रस्त्याची रुंदी कमी झाली आहे, त्यामुळे वारंवार खड्डे पडतात. पुणे : कोंढवा आणि एनआयबीएम रोड परिसरातील रहिवाशांनी या पावसाळ्यात ज्योती हॉटेलजवळील...

पुण्यात मुसळधार पाऊस; आयएमडीने या आठवड्यात आणखी पावसाचा अंदाज वर्तवला आहे. पुणे बातम्या

मान्सूनच्या हालचाली सुरू होताच पुण्यात मोठ्या प्रमाणावर पाऊस पडतो पुणे:: रविवारी संध्याकाळी पुण्याच्या अनेक भागांमध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली, त्यामुळे प्रदीर्घ कोरड्या हवामानापासून...

‘मोक्का’च्या गुन्ह्यातील ३ महिन्यांपासून फरार असलेला सराईत गुन्हेगार राम उमाप अखेर जेरबंद!

पुणे: पुणे शहर पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट २ ने एक अत्यंत धडक कारवाई करत, महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम (मोक्का) सारख्या गंभीर गुन्ह्यात गेल्या ३...

या उन्हाळ्यात पाण्याचा पुरवठा कमी होत असताना गार्डन नर्सरींना उन्हाचा सामना करावा लागत आहे....

हजारो झाडे आणि रोपे असलेल्या बागांच्या रोपवाटिकांच्या पाण्याच्या व्यवसायावर विपरित परिणाम होतो. पुणे : बागांच्या रोपवाटिकांसाठी हा कठीण उन्हाळा आहे कारण बोअरवेल आणि...

एमआयडीसी हद्दीबाहेरील औद्योगिक वसाहतींनाही पाण्याची समस्या भेडसावत आहे. पुणे बातम्या

पिण्याच्या उद्देशाने, लहान उत्पादक 20-लिटर पाण्याच्या कॅनवर अवलंबून असतात. पुणे : एमआयडीसी क्षेत्राबाहेरील औद्योगिक क्लस्टर्सना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे, ज्यामुळे नगरपालिका क्षेत्रांमध्ये...

error: Content is protected !!