“कोई हाथ उठाएगा, गोली चलाएगा, तो तोड दूँगा!” – अमितेश कुमार यांचा इशारा
पुणे पोलिसांचा गुन्हेगारी टोळ्यांवर चोख प्रहार सुरू
पुणे, 17 जून 2025 – पुणे शहरात गुन्हेगारी टोळ्यांच्या मुसक्या आवळण्याच्या मोहिमेला गती देत, पुणे पोलिसांनी कुख्यात टिपू पठाण टोळीविरोधात निर्णायक कारवाई सुरू केली आहे. या पार्श्वभूमीवर, पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी स्पष्ट शब्दांत इशारा दिला आहे — “कोई हाथ उठाएगा, गोली चलाएगा, तो तोड दूँगा!”
या कारवाईत मोठा टप्पा गाठत, रविवारी (दि. 15 जून) पहाटे सोलापूर जिल्ह्यातील लांबोटी गावात पोलिसांसोबत झालेल्या चकमकीत या टोळीतील सदस्य शाहरुख ऊर्फ अट्टी शेख ठार झाला. त्याच्याकडे गंभीर गुन्ह्यांची नोंद असून, त्याच्या मुसक्या आवळण्यासाठी पोलिस बराच काळ प्रयत्नशील होते.
यावेळी पोलिसांनी टिपू पठाण टोळीशी संबंधित एकूण ६० संशयित व्यक्तींची झाडाझडती घेतली, आणि त्यांना काळेपडळ पोलीस ठाण्यात बोलावून त्यांच्या हालचालींची माहिती घेतली. या प्रत्येकाची सखोल चौकशी करत वैयक्तिक गुन्हेगारी पार्श्वभूमी (कुंडली) तयार करण्यात आली आहे.
पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या या मोहिमेमुळे शहरातील गुन्हेगारी जगताला चाप बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पुणे पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या मोहिमेत आणखी काही आरोपींवर लक्ष केंद्रित करण्यात येत असून, भविष्यात अजून काही मोठ्या कारवायांची शक्यता नाकारता येत नाही.
Crime Maharashtra Live News
📅 दिनांक: 17 जून 2025

नियम व अटी / Disclaimer:
वरील माहिती विविध ओपन सोर्स माध्यमांतून, सोशल मीडियातील चर्चांमधून तसेच उपलब्ध असलेल्या सार्वजनिक वाचन-सामग्रीवर आधारित आहे. “क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्युज” (Crime Maharashtra Live News) व त्याचे संपादक, प्रतिनिधी किंवा संबद्ध कर्मचारी या माहितीच्या संपूर्ण सत्यतेचा दावा करत नाहीत.ही माहिती केवळ जनहितार्थ, समाजजागृती व चर्चेसाठी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. कृपया वाचक/दर्शकांनी संबंधित अधिकृत यंत्रणांकडून खातरजमा करूनच कोणताही निर्णय घ्यावा. या माहितीमध्ये काही बाबी चुकीच्या, अपूर्ण किंवा कालांतराने बदललेल्या असू शकतात. त्यामुळे कोणतीही कायदेशीर अथवा प्रशासकीय कृती करण्यापूर्वी अधिकृत स्रोताची खात्री करणे अत्यावश्यक आहे.. तथापि, या बातम्यांमुळे उद्भवणाऱ्या कोणत्याही गैरसमज किंवा नुकसानीस Crime Maharashtra Live News जबाबदार राहणार नाही.> टीप: जर कोणाला आमच्या बातमीबाबत आक्षेप असल्यास, कृपया आम्हाला [crimemaharashtra.live@gmail.com] वर संपर्क करा.मोबाईल नंबर 7744808833























