अहिल्या नगर जिल्ह्यातील गोटुंबे आखाडा येथे श्रावणातील तिसऱ्या सोमवार निमित्त भव्य भंडारा संपन्न
सहसंपादक शिवाजी दवणे क्राईम महाराष्ट्र न्यूज 9730170965
गोटुंबे आखाडा येथे नुकताच एक मोठा भंडारा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात परिसरातील हजारो लोकांनी उत्साहाने भाग घेतला. हा भंडारा गोटुंबे आखाडा येथील सर्वांचे आराध्य दैवत महादेव मंदिराच्या प्रांगणात आयोजित करण्यात आला होता. रोजच्याप्रमाणे अगोदर हरिपाठाचा कार्यक्रम पार पडला आणि त्यानंतर 7 ते 11 वाजेपर्यंत महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. यावेळी गावातील अनेक मंडळांनी या कार्यक्रमासाठी उपस्थिती दर्शवून खूप सहकार्य देखील केले. 
या कार्यक्रमाला स्थानिक नेते यातून सरपंच, उपसरपंच, तसेच माजी उपसरपंच, तसेच सदस्य देखील उपस्थित होते. भंडारा यशस्वीरित्या पार पडला, या परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली. महाप्रसादाचा लाभ सर्वांनी मिळून मिसळून या कार्यक्रमाचा आनंद घेतला. या कार्यक्रमासाठी पोलीस मित्र संघटना भारत नजन सर यांच्या मार्गदर्शनाखालील जिल्हाध्यक्ष आलम शेख तसेच महिला भगिनी नंदा कुसळकर, सुनिता मकासरे, तसेच मंदा बाचकर या पोलीस मित्र देखील उपस्थित होते आणि त्यांचे पूर्ण सहकार्य हा कार्यक्रम पार पडेपर्यंत राहिले . या पोलीस मित्र संघटनेचे भारत नजन यांच्या मार्गदर्शनाखाली यांनी दिलेल्या सेवेबद्दल त्यांचा ग्रामस्थांच्या वतीने सत्कार देखील करण्यात आला. गोटुंबे आखाडा येथे या भव्य भंडाऱ्याने परिसरातील नागरिकांमध्ये उत्साहाची
वातावरण निर्माण झाले.

नियम व अटी / Disclaimer:
वरील माहिती विविध ओपन सोर्स माध्यमांतून, सोशल मीडियातील चर्चांमधून तसेच उपलब्ध असलेल्या सार्वजनिक वाचन-सामग्रीवर आधारित आहे. “क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्युज” (Crime Maharashtra Live News) व त्याचे संपादक, प्रतिनिधी किंवा संबद्ध कर्मचारी या माहितीच्या संपूर्ण सत्यतेचा दावा करत नाहीत.ही माहिती केवळ जनहितार्थ, समाजजागृती व चर्चेसाठी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. कृपया वाचक/दर्शकांनी संबंधित अधिकृत यंत्रणांकडून खातरजमा करूनच कोणताही निर्णय घ्यावा. या माहितीमध्ये काही बाबी चुकीच्या, अपूर्ण किंवा कालांतराने बदललेल्या असू शकतात. त्यामुळे कोणतीही कायदेशीर अथवा प्रशासकीय कृती करण्यापूर्वी अधिकृत स्रोताची खात्री करणे अत्यावश्यक आहे.. तथापि, या बातम्यांमुळे उद्भवणाऱ्या कोणत्याही गैरसमज किंवा नुकसानीस Crime Maharashtra Live News जबाबदार राहणार नाही.> टीप: जर कोणाला आमच्या बातमीबाबत आक्षेप असल्यास, कृपया आम्हाला [crimemaharashtra.live@gmail.com] वर संपर्क करा.मोबाईल नंबर 7744808833























