Homeताज्या बातम्याथेऊर येथे यशवंत कृषी महोत्सवाचे आयोजन : शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शन व पुरस्कार वितरण

थेऊर येथे यशवंत कृषी महोत्सवाचे आयोजन : शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शन व पुरस्कार वितरण

थेऊर येथे यशवंत कृषी महोत्सवाचे आयोजन : शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शन व पुरस्कार वितरण

पै. दत्तात्रय उर्फ आबा काळे सामाजिक प्रतिष्ठान यांच्या वतीने श्रीक्षेत्र थेऊर, ता. हवेली, पुणे येथे यशवंत कृषी महोत्सव दिनांक 20 नोव्हेंबर ते 23 नोव्हेंबर 2025 दरम्यान भव्यदिव्य स्वरूपात आयोजित करण्यात येणार आहे.

आज या महोत्सवाच्या उद्घाटनाबाबत महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री मा. ना. दत्तात्रय भरणे यांना महोत्सवाचे उद्घाटन करण्यासाठी अधिकृत निमंत्रण देण्यात आले. या निमित्ताने झालेल्या बैठकीत हवेली तालुक्याचे माजी आमदार श्री. रमेश आप्पा थोरात, माजी आमदार श्री. अशोक बापू पवार, ज्येष्ठ नेते श्री. सुरेश आंण्णा घुले, उद्योजक श्री. संदीप शेठ धुमाळ, पुणे जिल्ह्यातील युवा नेते श्री. सचिनतात्या तुपे यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.

या वेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश सरचिटणीस व सामाजिक कार्यकर्ते पै. दत्तात्रय उर्फ आबा काळे यांनी माहिती देताना सांगितले की, या कृषी महोत्सवाची जय्यत तयारी सुरू झाली असून महोत्सवात शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना देण्यासाठी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. विशेष बाब म्हणजे या कृषी महोत्सवात आंतरराष्ट्रीय स्तरावरील पीक पद्धतींचे प्रदर्शन तर असणारच, पण पशुपक्षी प्रदर्शनाचाही विशेष समावेश करण्यात येणार आहे.

या महोत्सवात सुमारे २०० स्टॉल्स उभारण्यात येणार असून शेतकऱ्यांना खालील विषयांवर माहिती व मार्गदर्शन उपलब्ध होणार आहे –

आंतरराष्ट्रीय शेती अवजारे व अत्याधुनिक तंत्रज्ञान

बियाणे व कीटकनाशके

हरितगृहे व कृषी जैविक तंत्रज्ञान

हॉर्टिकल्चर, फळबाग, मसाला व भाजीपाला शेती

मासेमारी व अक्वाकल्चर

डेअरी तंत्रज्ञान व दुग्धविकास

शेतमाल प्रक्रिया उद्योग व वेअरहाऊस

अपारंपरिक ऊर्जा प्रकल्प

कृषी विपणन तंत्रज्ञान व कृषी बाजारपेठ

अर्थसाह्य संस्था, कृषी कर्ज व वित्तपुरवठा

सेंद्रिय शेती व नैसर्गिक शेती पद्धती

शेळी-मेंढी पालन व पशुपालन

समूह शेती व शेतकरी बचत गट

या महोत्सवाचा आणखी एक विशेष उपक्रम म्हणजे कृषी क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या शेतकरी, महिला व कृषिकन्या यांना ‘आदर्श शेतकरी पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये प्रेरणादायी वातावरण निर्माण होणार असून नव्या पिढीला कृषी क्षेत्राकडे आकर्षित करण्यास मदत होईल.

या महोत्सवाच्या आयोजनात कल्याणकर इव्हेंट मॅनेजमेंट चे श्री. प्रशांत कल्याणकर, सौ. सीमा प्रशांत कल्याणकर, श्री. ऋतुराज जवंजाळ यांचे विशेष सहकार्य लाभले आहे. तसेच पै. दत्तात्रय उर्फ आबा काळे सामाजिक प्रतिष्ठानचे समन्वयक श्री. बापू सोनवणे यांनी सर्व कार्यसंघाच्या वतीने उपस्थित मान्यवरांचे आभार मानले.

यशवंत कृषी महोत्सवामुळे शेतकऱ्यांना अत्याधुनिक शेती तंत्रज्ञान, कृषी उद्योग, पशुपालन व पर्यायी शेती उपक्रमांविषयी थेट मार्गदर्शन मिळणार असून यामुळे शेती व्यवसाय नफा मिळवणारा व रोजगारनिर्मिती करणारा ठरेल असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

एमपीसीबीने पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील 84 आरएमसी युनिट्सना बंद करण्याच्या नोटिसा बजावल्या आहेत. पुणे...

पुणे: महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने (MPCB) जानेवारी ते सप्टेंबर 2025 दरम्यान पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील 350 पैकी 84 रेडी मिक्स काँक्रिट (RMC) युनिट्सना बंद...

बारामती पोटनिवडणुकीत सुनेत्रा पवार 2.18 लाख मतांनी विजयी, राष्ट्रीय विक्रम; जवळच्या प्रतिस्पर्ध्याला फक्त 935...

सुनेत्रा 2.18L मतांनी विजयी, पक्षाला काम बोलू द्या असे सांगतात पुणे: उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी सहानुभूतीच्या लाटेवर स्वार होऊन सोमवारी बारामती पोटनिवडणूक 2,18,034...

त्रैमासिक प्रगती अहवाल अद्ययावत करण्यात अयशस्वी झाल्याबद्दल महारेरा 8,212 प्रकल्पांवर कारवाई करते. पुणे बातम्या

पुणे: महाराष्ट्र रिअल इस्टेट नियामक प्राधिकरणाने (महारेरा) राज्यभरातील ८,२१२ गृहनिर्माण प्रकल्पांना अनिवार्य तिमाही प्रगती अहवाल (क्यूपीआर) अपलोड करण्यात अयशस्वी झाल्याबद्दल कारणे दाखवा नोटीस बजावली...

पीए ते मंत्र्याच्या पत्नीचा पतीवर जीवे मारण्याचा आरोप, गुन्हा दाखल. पुणे बातम्या

पुणे: कोरेगाव पार्क पोलिसांनी 30 एप्रिल रोजी रात्री 8.30 च्या सुमारास कोरेगाव पार्कमधील क्वीन्स गार्डन येथील त्यांच्या राहत्या घरी गळा दाबण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप...

मोहम्मदवाडी, उंड्री येथील रहिवासी ओव्हरहेड टाकी पुरवठ्याबाबत अनिश्चित. पुणे बातम्या

पुणे: मोहम्मदवाडीतील एनआयबीएम ॲनेक्सी रोडवरील तीन ओव्हरहेड टाक्या वर्षांनंतर लवकरच पाण्याने भरू शकतील, परंतु आजूबाजूच्या गृहनिर्माण सोसायट्यांमधील रहिवाशांच्या घरापर्यंत पुरवठा कसा आणि कधी पोहोचेल...

error: Content is protected !!