प्रजासत्ताक दिनानिमित्त विविध उपक्रमांना उत्स्फूर्त प्रतिसाद
पुणे :
७६ व्या प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून श्री म्हसोबा प्रतिष्ठान व पृथ्वी युवा फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने विविध सामाजिक व शैक्षणिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाचे आयोजक श्री म्हसोबा प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री. सचिन भोसले होते. तर स्पर्धांचे आयोजन पृथ्वी युवा फाउंडेशनचे प्रतिनिधी श्री. रामदास गवते यांच्या वतीने करण्यात आले.
या उपक्रमांतर्गत नृत्य स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत लहान वयोगटातील विद्यार्थ्यांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग पाहायला मिळाला. त्याचप्रमाणे समाजप्रबोधनात्मक निबंध स्पर्धा देखील घेण्यात आली.
या निबंध स्पर्धेत शालेय विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
निबंध स्पर्धेचे विषय पुढीलप्रमाणे होते –
1. मोठमोठे डीजे व स्पीकर – फायदे व नुकसान
2. मोठमोठे फटाके – फायदे व नुकसान
या दोन्ही स्पर्धांना विद्यार्थ्यांकडून प्रचंड प्रतिसाद मिळाला. सहभागी विद्यार्थ्यांना बक्षीस स्वरूपात शालेय उपयोगी वस्तूंचे वाटप करण्यात आले.
यावेळी श्री म्हसोबा प्रतिष्ठान येथे ध्वजारोहणाचा कार्यक्रम संपन्न झाला. ध्वजारोहण प्रमुख पाहुणे मोनिका शर्मा, यास्मिन चरणिया, हरेश भारवानी, राजेश्वरी लखानी व संजय सूद यांच्या हस्ते करण्यात आले.

या कार्यक्रमाला साहिल भालेरा, रामदास पोळ, नीलिमा कांबळे, सनी राव, रितेश शेलार,अनिकेत गंगावणे,
कैलास गोंधळे, गोरक्षनाथ आढागळे, अक्षय राव, दीपक शिंदे, अनिल चिमटे, उवेश मनसुरी,विवेक भोसले,सुजित टाकले,राजू नाईक,अक्षय राव,सुमित आरू, यांच्यासह अनेक मान्यवर व नागरिक उपस्थित होते.
या उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये देशभक्ती, सामाजिक जाणीव व पर्यावरणाबाबतची जागरूकता वाढण्यास मदत झाली, असे मत आयोजकांनी व्यक्त केले.

नियम व अटी / Disclaimer:
वरील माहिती विविध ओपन सोर्स माध्यमांतून, सोशल मीडियातील चर्चांमधून तसेच उपलब्ध असलेल्या सार्वजनिक वाचन-सामग्रीवर आधारित आहे. “क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्युज” (Crime Maharashtra Live News) व त्याचे संपादक, प्रतिनिधी किंवा संबद्ध कर्मचारी या माहितीच्या संपूर्ण सत्यतेचा दावा करत नाहीत.ही माहिती केवळ जनहितार्थ, समाजजागृती व चर्चेसाठी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. कृपया वाचक/दर्शकांनी संबंधित अधिकृत यंत्रणांकडून खातरजमा करूनच कोणताही निर्णय घ्यावा. या माहितीमध्ये काही बाबी चुकीच्या, अपूर्ण किंवा कालांतराने बदललेल्या असू शकतात. त्यामुळे कोणतीही कायदेशीर अथवा प्रशासकीय कृती करण्यापूर्वी अधिकृत स्रोताची खात्री करणे अत्यावश्यक आहे.. तथापि, या बातम्यांमुळे उद्भवणाऱ्या कोणत्याही गैरसमज किंवा नुकसानीस Crime Maharashtra Live News जबाबदार राहणार नाही.> टीप: जर कोणाला आमच्या बातमीबाबत आक्षेप असल्यास, कृपया आम्हाला [crimemaharashtra.live@gmail.com] वर संपर्क करा.मोबाईल नंबर 7744808833























