अजित पवार विमान अपघात प्रकरणी दोषींवर तात्काळ कारवाईची मागणी
जय भीम संघटनेचे प्रदेशाध्यक्ष करण गायकवाड यांचे पुणे सीआयडीला निवेदन
पुणे :
राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातातील दोषींवर तात्काळ कारवाई करण्यात यावी, अशी ठाम मागणी जय भीम संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. जय भीम संघटनेचे प्रदेशाध्यक्ष करण गायकवाड यांनी पुणे गुन्हे अन्वेषण विभाग (सीआयडी), गणेश खिंड रोड, पुणे येथे याबाबत अधिकृत पत्र सादर केले आहे.
दिनांक 28 जानेवारी 2026 रोजी बारामती विमानतळावर मा. अजित पवार यांच्या चार्टर विमानाचा दुर्दैवी अपघात झाला होता. या भीषण दुर्घटनेत त्यांचा मृत्यू झाला असून ही घटना संपूर्ण राज्याला हादरवणारी आहे. सदर प्रकरणाचा तपास सध्या गुन्हे अन्वेषण विभाग मार्फत सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे.
या अपघातामागील सर्व कारणांचा सखोल, निष्पक्ष व पारदर्शक तपास करून दोषींना तात्काळ ओळखून त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी जय भीम संघटनेने केली आहे. तसेच, भविष्यात अशा प्रकारच्या घटना पुन्हा घडू नयेत यासाठी ठोस उपाययोजना राबवण्यात याव्यात, असेही या पत्रात नमूद करण्यात आले आहे.
प्रकरणाकडे गांभीर्याने लक्ष देऊन संबंधित यंत्रणांनी त्वरित व प्रभावी कार्यवाही करावी, अशी अपेक्षा जय भीम संघटनेचे प्रदेशाध्यक्ष करण गायकवाड यांनी व्यक्त केली आहे.

नियम व अटी / Disclaimer:
वरील माहिती विविध ओपन सोर्स माध्यमांतून, सोशल मीडियातील चर्चांमधून तसेच उपलब्ध असलेल्या सार्वजनिक वाचन-सामग्रीवर आधारित आहे. “क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्युज” (Crime Maharashtra Live News) व त्याचे संपादक, प्रतिनिधी किंवा संबद्ध कर्मचारी या माहितीच्या संपूर्ण सत्यतेचा दावा करत नाहीत.ही माहिती केवळ जनहितार्थ, समाजजागृती व चर्चेसाठी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. कृपया वाचक/दर्शकांनी संबंधित अधिकृत यंत्रणांकडून खातरजमा करूनच कोणताही निर्णय घ्यावा. या माहितीमध्ये काही बाबी चुकीच्या, अपूर्ण किंवा कालांतराने बदललेल्या असू शकतात. त्यामुळे कोणतीही कायदेशीर अथवा प्रशासकीय कृती करण्यापूर्वी अधिकृत स्रोताची खात्री करणे अत्यावश्यक आहे.. तथापि, या बातम्यांमुळे उद्भवणाऱ्या कोणत्याही गैरसमज किंवा नुकसानीस Crime Maharashtra Live News जबाबदार राहणार नाही.> टीप: जर कोणाला आमच्या बातमीबाबत आक्षेप असल्यास, कृपया आम्हाला [crimemaharashtra.live@gmail.com] वर संपर्क करा.मोबाईल नंबर 7744808833























