Homeताज्या बातम्याजागरूक नागरिक विकास मंचाच्या संस्थापक अध्यक्ष मा.सुनिल पवार मध्यस्थीने उपोषणाची सांगता; राष्ट्रवादी...

जागरूक नागरिक विकास मंचाच्या संस्थापक अध्यक्ष मा.सुनिल पवार मध्यस्थीने उपोषणाची सांगता; राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाचे अथर्व सोनवणे यांची मागण्या मान्य ..

पुणे : पुणे महानगरपालिकेसमोर रस्त्यावरचे विक्रेते, फुटपाथ हॉकर्स आणि स्टॉल धारकांच्या विविध प्रश्नांसाठी सुरू असलेल्या उपोषणाची अखेर जागरूक नागरिक विकास मंचाच्या मध्यस्थीने यशस्वी सांगता झाली. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाचे पुणे शहर पदाधिकारी अथर्व सोनवणे यांनी आंदोलनाच्या माध्यमातून मांडलेल्या मागण्यांवर पुणे महानगरपालिकेने सकारात्मक भूमिका घेत त्यातील महत्त्वाच्या मागण्या मान्य केल्यानंतर उपोषण मागे घेण्यात आले.
शहरातील रोडसाईड विक्रेते, फुटपाथ हॉकर्स आणि लघु स्टॉल धारकांना भेडसावणाऱ्या विविध समस्यांवर लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले होते. या आंदोलनात विक्रेत्यांवरील थकबाकी, दंड आणि व्याजामध्ये सवलत देणे तसेच त्यांना कायदेशीर चौकटीत व्यवसाय करण्यासाठी संधी देण्याच्या दृष्टीने अमनेस्टी (Amnesty) योजना लागू करण्याची मागणी प्रमुख होती.
दरम्यान, पुणे महानगरपालिकेच्या अतिक्रमण / अनधिकृत बांधकाम निर्मूलन विभागाकडून आंदोलनकर्त्यांना लेखी पत्र देण्यात आले. या पत्रामध्ये शहरातील रस्त्यावरच्या विक्रेत्यांबाबतचे प्रश्न शहर फेरीवाला समितीच्या बैठकीत चर्चेला घेऊन नियमांनुसार योग्य तो निर्णय घेतला जाईल, तसेच संबंधित मागण्यांवर सकारात्मक कार्यवाही करण्यात येईल, असे आश्वासन देण्यात आले.
या पार्श्वभूमीवर जागरूक नागरिक विकास मंचाचे संस्थापक अध्यक्ष सुनील पवार, पुणे जिल्हा अध्यक्ष ऋषिकेश सावंत, पुणे शहर कार्याध्यक्ष उमेर शेख तसेच पुणे शहर अध्यक्ष (अनुसूचित जाती-जमाती व पथारी सेल) यांच्या मध्यस्थीने आंदोलनकर्ते आणि प्रशासन यांच्यात सविस्तर चर्चा झाली. चर्चेनंतर प्रशासनाने आंदोलनकर्त्यांच्या मागण्यांबाबत सकारात्मक भूमिका घेतल्याने अथर्व सोनवणे यांनी समाधान व्यक्त करत उपोषण मागे घेण्याचा निर्णय घेतला.
या आंदोलनामुळे शहरातील हजारो रस्त्यावर व्यवसाय करणाऱ्या लघु विक्रेत्यांचे प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आले असून, महानगरपालिकेने घेतलेल्या निर्णयामुळे या व्यावसायिकांना मोठा दिलासा मिळण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
दरम्यान, या प्रकरणाकडे पुणे महानगरपालिकेचे प्रशासन, सामाजिक संघटना तसेच नागरिकांचे लक्ष लागले असून, भविष्यात शहरातील हॉकर्स आणि स्टॉल धारकांच्या प्रश्नांवर अधिक सकारात्मक आणि दीर्घकालीन उपाययोजना होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

लोहगड येथे सियाच्या उपस्थितीत पोलिस गुन्हेगारीचे दृश्य पुन्हा तयार करतात. पुणे बातम्या

पुणे : 18 जून रोजी लोहगड किल्ल्यावर मंगेतर सिया गोयल (20) आणि तिचा कथित प्रियकर चेतन चौधरी यांच्याकडून कथितपणे कथित कथित कथित...

नाशिक फाटा-खेड एलिव्हेटेड कॉरिडॉरसाठी आमदारांची जमीन निधीची मागणी. पुणे बातम्या

पुणे-नाशिक महामार्ग हा राज्यातील सर्वात वर्दळीचा आणि औद्योगिकदृष्ट्या महत्त्वाचा रस्ता आहे. पुणे : भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) प्रस्तावित नाशिक फाटा-खेड एलिव्हेटेड कॉरिडॉर...

DRDO नेक्स्ट-जनरेशन इन्फंट्री कॉम्बॅट व्हेईकलसाठी प्रगत कंपोझिट हल विकसित करते. पुणे बातम्या

चित्र केवळ प्रातिनिधिक हेतूसाठी पुणे : डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन (DRDO) शास्त्रज्ञ भारतीय सैन्यासाठी हलके, मजबूत आणि स्टिल्थियर रणांगण प्लॅटफॉर्म तयार करण्यासाठी...

पुण्याच्या काही भागांत कमी पावसानंतर आठवडाभरात पावसाची नोंद झाली. पुणे बातम्या

कोथरूडमध्ये रविवारी दुपारी पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या पुणे : मान्सूनच्या जवळपास आठवडाभराच्या मंद गतीनंतर पुणे आणि आसपासच्या भागात रविवारी मुसळधार पावसाने हजेरी लावली,...

केतन अग्रवाल मृत्यूच्या चौकशीदरम्यान सिया गोयलचा ‘सिंगापूर’मध्ये पार्टी करतानाचा आणखी एक व्हिडिओ ऑनलाइन समोर...

पुणे: केतन अग्रवाल हत्याकांडातील आरोपी सिया गोयलचा आणखी एक कथित व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला आहे, ज्यामध्ये ती सिंगापूरमध्ये एका खाजगी पार्टीत...

error: Content is protected !!