Homeताज्या बातम्याअल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमास लातूरमधून अटक; भारती विद्यापीठ पोलिसांची धडाकेबाज कारवाई

अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमास लातूरमधून अटक; भारती विद्यापीठ पोलिसांची धडाकेबाज कारवाई

पुणे: भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनच्या हद्दीत एका मुलीवर वारंवार जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवून तिचे अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देणाऱ्या आरोपीला पोलिसांनी लातूर जिल्ह्यातून बेड्या ठोकल्या आहेत.
​नेमकी घटना काय?
​मिळालेल्या माहितीनुसार, सन २०२४ पासून १६ मार्च २०२६ या कालावधीत आरोपीने फिर्यादीच्या मुलीशी तिच्या राहत्या घरी वारंवार जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले. पीडितेचे अश्लील व्हिडिओ आणि फोटो काढून ते सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी आरोपीने फिर्यादीला दिली होती. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनमध्ये काशिराम चंद्रकांत म्हस्कले (वय २२, रा. मांगडेवाडी, कात्रज, पुणे) याच्या विरोधात भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम ६४ (२) (एम), ११५ (२), आणि ३५१ (२) अन्वये गुन्हा (गु.र.नं. १११/२०२६) दाखल करण्यात आला होता.
​तांत्रिक तपासाच्या आधारे अटक
​गुन्हा दाखल झाल्यापासून आरोपी फरार होता. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक निलेश मोकाशी, पोलीस अंमलदार मंगेश पवार आणि मंगेश गायकवाड यांनी आरोपीच्या मोबाईल फोन आणि इंस्टाग्राम अकाउंटचे तांत्रिक विश्लेषण केले. तपासादरम्यान आरोपी लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यातील खरबवाडी येथे लपून बसल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. त्यानुसार पोलीस पथकाने तातडीने लातूर गाठून सापळा रचला आणि आरोपी काशिराम म्हस्कले याला ताब्यात घेऊन अटक केली.
​तपास पथक
​ही यशस्वी कामगिरी अपर पोलीस आयुक्त (पश्चिम प्रादेशिक विभाग) श्री. राजेश बनसोडे, पोलीस उप आयुक्त (परिमंडळ २) श्री. मिलिंद मोहीते, आणि सहाय्यक पोलीस आयुक्त (भारती विद्यापीठ विभाग) श्री. राहुल आवारे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
​या कारवाईत भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल खिलारे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) कैलास कोडग, सहाय्यक पोलीस निरीक्षक स्नेहल थोरात, पोलीस उपनिरीक्षक निलेश मोकाशी तसेच पोलीस अंमलदार मंगेश पवार, मंगेश गायकवाड, सागर बोरगे, महेश बारवकर, किरण साबळे, मितेश चोरमोले, निलेश खैरमोडे, अभिनय चौधरी, तुकाराम सुतार आणि संदीप आगळे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
​सध्या या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक स्नेहल थोरात करत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

​श्रीक्षेत्र थेऊर येथील ‘महाराजस्व समाधान शिबिराला’ नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; १००० पेक्षा जास्त नागरिकांनी घेतला...

सहसंपादक बापू सोनवणे थेऊर ​थेऊर: महाराष्ट्र शासनाची महत्त्वाकांक्षी योजना असलेल्या आणि महसूल विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या 'छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान' अंतर्गत थेऊर मंडल भागात भव्य...

पुणे पोलिसांची मोठी कारवाई: कोंढव्यातून २२ किलो गांजा जप्त, महिला आरोपीसह दोघांना अटक

पुणे: पुणे शहरातील अंमली पदार्थांच्या अवैध विक्रीवर लगाम लावण्यासाठी पुणे पोलीस आयुक्तालयाने विशेष मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेअंतर्गत अमली पदार्थ विरोधी पथकाने कोंढवा...

लोहगावमध्ये पादचारी महिलेला लुटणाऱ्या दोघांना ८ तासांत अटक; गुन्हे शाखा युनिट ७ ची धडाकेबाज...

पुणे: लोहगाव परिसरातील कलवड वस्ती येथे एका महिलेची सोन्याची चैन आणि मोबाईल चोरणाऱ्या दोन सराईत गुन्हेगारांना पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट ७ ने अवघ्या ८...

​मौजमजा करण्यासाठी मोबाईल हिसकावणारी टोळी गजाआड; येरवडा पोलिसांकडून १९ मोबाईलसह ४३ हँडसेट जप्त

प पुपुणे शहरातील नागरिकांच्या हातातील मोबाईल हिसकावून पळ काढणाऱ्या दोन सराईत गुन्हेगारांना येरवडा पोलिसांनी अत्यंत शिताफीने अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून एकूण ४३...

पुणे न्यायालयाने दरोड्याच्या गुन्ह्यात दोन ते सात वर्षांची शिक्षा सुनावली, संघटित गुन्हेगारीच्या आरोपातून त्यांची...

पुणे : शहरातील विशेष न्यायालयाने समीर हज्जू पठाण आणि राहुल गजेंद्र कांबळे यांना प्राणघातक शस्त्राचा वापर करून दरोडा टाकल्याप्रकरणी दोषी ठरवून सात वर्षांच्या कारावासाची...

error: Content is protected !!