Homeताज्या बातम्याविठ्ठलराव वरुडे पाटील यांना 'आदर्श समाजसेवक' पुरस्कार प्रदान

विठ्ठलराव वरुडे पाटील यांना ‘आदर्श समाजसेवक’ पुरस्कार प्रदान

पुणे: रुग्णसेवा आणि ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्यासाठी सातत्याने समर्पित भावनेने कार्य करणारे माय माउली केअर सेंटर व लायन्स क्लब ऑफ पुणे कात्रजचे संस्थापक अध्यक्ष विठ्ठलराव वरुडे पाटील यांना ‘आदर्श समाजसेवक’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. आंतरराष्ट्रीय व्यंगचित्रकार दिनानिमित्त युवा संवाद सामाजिक संस्थेच्या वतीने ‘दैनिक चालू वार्ता’ पुरस्कृत हा सोहळा बालगंधर्व रंगमंदिर येथील कला दालनात उत्साहात संपन्न झाला.
या सोहळ्याला राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील अनेक दिग्गज उपस्थित होते. यामध्ये पुणे महानगरपालिकेचे उपमहापौर मा.परशुराम वाडेकर, शिवसेना (उबाठा) उपनेत्या श्रीमती सुषमाताई अंधारे, नगरसेवक व स्थायी समिती सदस्य मा. संदीप बेलदरे, तसेच मा. दिलीप जगताप, मा. शशिकांत कांबळे, मा. बाळासाहेब धोका, युवा संवाद संस्थेचे अध्यक्ष मा. धनराज गरड, मा. किशोर शितोळे आणि मा. गौरव सर्जेराव यांचा समावेश होता. या मान्यवरांच्या हस्ते वरुडे पाटील यांना गौरवण्यात आले.
संस्थेचे अध्यक्ष धनराज गरड यांनी आपल्या मनोगतात विठ्ठलराव वरुडे पाटील यांच्या कार्याचा आढावा घेतला. गेल्या १५ वर्षांपासून वरुडे पाटील यांनी रुग्णसेवेच्या क्षेत्रात, विशेषतः वृद्धांच्या आरोग्यासाठी जे अखंड कार्य केले आहे, त्याचे त्यांनी विशेष कौतुक केले. याप्रसंगी विविध क्षेत्रांतील व्यंगचित्रकार, सामाजिक, राजकीय आणि शैक्षणिक क्षेत्रातील कार्यकर्त्यांचाही सन्मान करण्यात आला.
सत्काराला उत्तर देताना विठ्ठलराव वरुडे पाटील यांनी सांगितले की “अशा सन्मानांमुळे सामाजिक क्षेत्रात काम करण्यासाठी नवी ऊर्जा आणि प्रेरणा मिळते. यामुळे सामाजिक जबाबदारीची जाणीव अधिक प्रगल्भ होते. भविष्यातही समाजसेवेचे हे व्रत मी अधिक जोमाने पुढे नेईन. मला मिळालेला हा पुरस्कार मी आजवर सेवा केलेल्या सर्व ज्येष्ठ आणि वृद्धांना समर्पित करतो.”

या कार्यक्रमाला युवा संवाद सामाजिक संस्थेचे पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला प्रतिनिधी आणि विविध सेवाभावी संस्थांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

‘केतनने मला सांगितले की लग्न मोडण्यास उशीर झाला आहे’: पोलिसांनी म्हटले आहे की सिया...

चॅट्स सिया गोयलच्या विधानांच्या विरोधात आहेत, लोणावळा पोलिस म्हणतात लोणावळा: रियाल्टर केतन अग्रवालच्या कथित हत्येच्या तपासाला नवे वळण मिळाले आहे, पोलिसांनी दावा केला...

लोहगड किल्ला खून प्रकरण: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केतन अग्रवालच्या वडिलांची भेट घेतली, जलदगती...

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जलदगती न्यायालयाचे आदेश दिले असून धक्कादायक लोहगड किल्ला हत्याकांडप्रकरणी उज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती केली...

​कर्बलाच्या शहीदांच्या स्मरणार्थ एकतेची मिसाल: मोहरमच्या रात्री पुण्यात सरबतासाठी मोफत साखर वाटप

​पुणे, दि. २५ जून २०२६: मुस्लिम बांधवांचा पवित्र महिना 'मोहरम'च्या नवव्या दिवशी, म्हणजेच 'कत्तलची रात्र' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रात्री, 'पंजेतन पवित्र संघटना, महाराष्ट्र राज्य' यांच्या...

मुंबई लोकल हत्या: ‘सोशल मीडिया ट्रायल’मुळे आमच्या आयुष्यावर, नोकऱ्यांवर परिणाम; असे आरोपीच्या कुटुंबीयांचे म्हणणे...

सोशल मीडिया ट्रायलमुळे आमचे जीवन आणि नोकऱ्यांवर परिणाम होत आहे, असे मुंबई लोकल ट्रेनवर चाकूहल्ला करणाऱ्या आरोपीचे नातेवाईक म्हणतात मुंबई: मुंबई लोकल ट्रेनमध्ये...

सोनम रघुवंशी तुरुंगातून बाहेर आल्याने सिया गोयलने केतन अग्रवालची हत्या केली: राजाची आई. पुणे...

पुणे : पुण्यातील रिअल्टर केतन अग्रवालच्या कथित हत्येवर इंदूरचा खून झालेला व्यापारी राजा रघुवंशी यांच्या कुटुंबीयांनी प्रतिक्रिया व्यक्त केली असून, सोनम रघुवंशी...

error: Content is protected !!