पुणे:
चोरीच्या दुचाकी वाहनांचा वापर करून रत्यावर पायी चालणाऱ्या नागरिकांना लक्ष्य करणाऱ्या आणि जबरदस्तीने सोन्याचे दागिने हिसकावणाऱ्या दोन सराईत गुन्हेगारांना आंबेगाव पोलिसांनी अत्यंत शिताफीने जेरबंद केले आहे. आरोपींकडून गुन्ह्यात वापरलेल्या आणि चोरीच्या ३ दुचाकी तसेच १० ग्रॅम सोन्याचे दागिने असा एकूण २,४०,०००/- रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
नेमकी घटना काय?
दिनांक १३/०५/२०२६ रोजी रात्री ९:३० वाजेच्या सुमारास एक महिला फिर्यादी या आंबेगाव रोडने दत्तनगर येथून पायी आपल्या घराच्या दिशेने जात होत्या. त्या दरम्यान दत्तनगर चौकाकडून एका काळ्या रंगाच्या दुचाकीवरून दोन अनोळखी इसम आले. त्यांनी फिर्यादीच्या जवळ जाऊन त्यांच्या गळ्यातील ‘मिनी गंठण’ जबरदस्तीने हिसकावून घेतले आणि घटनास्थळावरून वेगाने पळून गेले. या धक्कादायक प्रकारानंतर फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरून आंबेगाव पोलीस ठाण्यात गु.र.नं. २०९/२०२६, भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ चे कलम ३०९ (४), ३ (५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
२५० सीसीटीव्ही फुटेज आणि गोपनीय माहितीच्या आधारे कारवाई
गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून आंबेगाव पोलीस स्टेशनच्या तपास पथकाने तात्काळ तपासाची चक्रे फिरवली. तपास पथकातील अंमलदारांनी परिसरातील तब्बल २०० ते २५० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज बारकाईने तपासून आरोपींची ओळख (निष्पन्न) पटवली.
दरम्यान, सदर गुन्ह्यातील आरोपी हे सासवड परिसरात लपून बसले असल्याची ठोस गोपनीय माहिती तपास पथकाचे पोलीस अंमलदार धनाजी धोत्रे, सचिन गाडे, ज्ञानेश्वर चित्ते व प्रमोद भोसले यांना मिळाली. ही माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. शरद झिने यांच्या आदेशानुसार, पोलीस उपनिरीक्षक युवराज शिंदे आणि तपास पथकाचे अंमलदार सासवड परिसरात दाखल झाले. तिथे सापळा रचून दोन्ही आरोपींना अत्यंत शिताफीने ताब्यात घेण्यात आले.
अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे:
१) रोहित राजु माने (वय २० वर्षे, रा. सध्या मु.पो. खंडोबानगर झोपडपट्टी, सासवड पुणे. पूर्वीचा पत्ता: बाबर प्लॉटींगजवळ, दत्तमंदिरमागे, खोपडेनगर, भारतनगर, गुजर निंबाळकरवाडी, कात्रज पुणे. व्यवसाय: काही नाही).
२) ओमकार विकास नाईक (वय २२ वर्षे, रा. लक्ष्मी वजन काटयाजवळ, नवीन सकाळ प्रेसच्या शेजारी, संभाजीनगर, वडकी पुणे).
पोलिसांनी त्यांची कसून चौकशी केली असता त्यांनी सदर गुन्ह्याची कबुली दिली. त्यानंतर त्यांना आंबेगाव पोलीस स्टेशन येथे आणून कायदेशीररीत्या अटक करण्यात आली. या आरोपींकडून चोरीच्या ३ दुचाकी व १० ग्रॅम सोने जप्त करण्यात आले असून, पुढील अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक युवराज शिंदे करीत आहेत.
या पोलीस पथकाने केली कामगिरी:
सदरची यशस्वी कामगिरी मा. अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग पुणे, श्री. राजेश बनसोडे, मा. पोलीस उपआयुक्त परिमंडळ-२ पुणे शहर, श्री. मिलींद मोहिते, मा. सहाय्यक पोलीस आयुक्त, स्वारगेट विभाग पुणे श्री. राहुल आवारे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
तसेच, वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. शरद झिने, पोलीस निरीक्षक (गुन्हे) चांगदेव सजगणे यांच्या थेट सूचनांनुसार, पोलीस उपनिरीक्षक युवराज शिंदे यांच्यासह पोलीस अंमलदार चेतन गोरे, हणमंत मासाळ, हरिश गायकवाड, निलेश जमदाडे, धनाजी धोत्रे, सचिन गाडे, ज्ञानेश्वर चित्ते, प्रमोद भोसले, नितीन कातुर्डे, शिवाजी पाटोळे, फिरोज शेख, अजय कामठे, सुभाष मोरे, योगेश जगदाळे, राकेश टेकवडे आणि अवधूत जमदाडे यांच्या पथकाने ही कौतुकास्पद कारवाई केली आहे.

(Grievance Redressal – IT Rules 2021)
क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्यूज (Crimemaharashtra.live) हे केंद्र सरकारच्या माहिती तंत्रज्ञान नियम, २०२१ (IT Rules 2021) च्या नियम १८ अंतर्गत नोंदणीकृत आणि नियमांचे पालन करणारे अधिकृत डिजिटल न्यूज पोर्टल आहे. आमच्या पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या कोणत्याही बातमी, लेख किंवा मजकुराबाबत आपल्याला काही आक्षेप किंवा तक्रार असल्यास, आपण आमच्या मुख्य तक्रार निवारण अधिकाऱ्यांकडे लेखी नोंदणी करू शकता.
कायदा आणि नियमांनुसार आपल्या तक्रारीची २४ तासांच्या आत दखल घेऊन १५ दिवसांच्या आत त्याचे निवारण केले जाईल.
📌 मुख्य तक्रार निवारण अधिकारी (Level 1):
अधिकारी: आमीर मोहम्मद शेख (Editor & Publisher)
वेबसाईट: https://crimemaharashtra.live
अधिकृत ईमेल: crimemaharashtra.live@gmail.com
Info@crimemaharashtra.live
कार्यालयीन पत्ता: पुणे, महाराष्ट्रIn accordance with Rule 11(2)(a) of the Information Technology (Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules, 2021, any person having a grievance regarding the content published on Crimemaharashtra.live may send their complaint to the designated Grievance Redressal Officer.
Grievance Officer: Amir Mohammad Shaikh (Editor & Publisher)
Website: https://crimemaharashtra.live
Official Email: crimemaharashtra.live@gmail.com
Address: Pune, Maharashtra, India.
Note: Please ensure that your complaint includes the specific URL of the news article, the date of publication, and a clear description of the grievance along with supporting documents. All grievances will be acknowledged within 24 hours and resolved within 15 days.,




















