पुणे, दिनांक २९ जून २०२६:
पुणे शहरातील संघटित गुन्हेगारीला वेसण घालण्यासाठी पुणे शहर पोलीस दलाने एक मोठी यशस्वी कारवाई केली आहे. कोंढवा बुद्रुक-येवलेवाडी पोलीस स्टेशनमध्ये दाखल असलेल्या गंभीर ‘मोका’ (मकोका) गुन्ह्यातील आणि गेल्या ६ महिन्यांपासून पोलिसांना हुलकावणी देणाऱ्या दोन पाहिजे/फरारी आरोपींना गुन्हे शाखा युनिट ५ च्या पथकाने अत्यंत शिताफीने जेरबंद केले आहे.
गुप्त माहितीच्या आधारे रचला सापळा
पुणे शहरातील विविध पोलीस स्टेशनच्या अभिलेखावरील पाहिजे व फरार आरोपींचा शोध घेऊन त्यांना तात्काळ ताब्यात घेण्याचे आदेश वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिले होते. या आदेशानुसार गुन्हे शाखा युनिट ५ चे पथक फरार आरोपींचा शोध घेत होते. या दरम्यान, कोंढवा बुद्रुक येवलेवाडी पोलीस स्टेशन गु.र.नं. ०२/२०२६ (भारतीय न्याय संहिता कलम १०३(०१), १८९(२), १९०, १९१(२), ६१(२) सह महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३७(१)(३) सह १३५ व महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम सन १९९९ (मकोका) चे कलम ३(१)(i), ३(२), ३(४)) या गंभीर गुन्ह्यातील दोन आरोपी वेगवेगळ्या ठिकाणी वावरत असल्याची गोपनीय माहिती पोलीस अंमलदार राहुल ढमढेरे यांना मिळाली.
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी आकाश मधुकर भोसले हा कोंढवा बुद्रुक भागात तर दुसरा आरोपी अथर्व सुरेश म्हस्के हा धाराशिव जिल्ह्यातील उमरगा येथे लपून राहिला होता.
पुणे आणि उमरगा (धाराशिव) येथून आरोपी अटकेत
खात्रीशीर माहिती मिळताच गुन्हे शाखा युनिट ५ च्या पथकाने तातडीने हालचाली करत पुण्यातील टिळेकरनगर, कोंढवा बुद्रुक येथे सापळा रचला. या कारवाईत पोलिसांनी आकाश मधुकर भोसले (वय २६ वर्षे, रा. लेन नंबर ०२, टिळेकर नगर (अ), कोंढवा बुद्रुक, पुणे) याला ताब्यात घेतले.
त्यानंतर, पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आकाश भोसले याच्याकडे कौशल्यपूर्वक तपास केला असता, त्याने दुसरा फरार आरोपी अथर्व म्हस्के याच्या ठावठिकाण्याबाबत माहिती दिली. या माहितीच्या आधारे पथकाने थेट धाराशिव गाठले आणि कुंभारपट्टी, उमरगा (ता. उमरगा, जि. धाराशिव) येथून अथर्व सुरेश म्हस्के (वय २१ वर्षे, रा. गल्ली नंबर ०२, शिक्षक सोसायटी, एस.बी.आय. बँकेच्या मागे, कात्रज कोंढवा रोड, पुणे) याला अत्यंत शिताफीने ताब्यात घेतले. पुढील कायदेशीर कारवाईसाठी दोन्ही आरोपींना कोंढवा बुद्रुक येवलेवाडी पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे.
कारवाई करणारे पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे पथक:
सदरची उल्लेखनीय आणि धडक कामगिरी मा. अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) श्रीमती तेजस्वी सातपुते, मा. पोलीस उप आयुक्त (गुन्हे) श्री. गौहर हसन, आणि मा. सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे २) श्री. राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
तसेच गुन्हे शाखा युनिट ०५, पुणे शहरचे पोलीस निरीक्षक श्री. संदीपान पवार व पोलीस निरीक्षक वाहीद पठाण यांच्या सूचनांनुसार, पोलीस उप निरीक्षक अभिजीत पवार, पोलीस अंमलदार राहुल ढमढेरे, अविनाश इंगळे, शहाजी काळे, अमर चव्हाण, परमेश्वर कदम, शशिकांत नाळे, विनोद शिवले, प्रताप गायकवाड, अकबर शेख, सुधीर सोनवणे, जयदेव भोसले, नासेर देशमुख तसेच महिला पोलीस अंमलदार स्वाती तुपे, नेत्रिका अडसुळ व मयुरी पालवे यांच्या संयुक्त पथकाने ही यशस्वी कामगिरी बजावली आहे.
या धडक कारवाईमुळे ६ महिन्यांपासून पोलिसांना चकवा देणाऱ्या दोन अट्टल गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यात पुणे पोलिसांना यश आले असून, परिसरात पोलिसांचे कौतुक होत आहे.

(Grievance Redressal – IT Rules 2021)
क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्यूज (Crimemaharashtra.live) हे केंद्र सरकारच्या माहिती तंत्रज्ञान नियम, २०२१ (IT Rules 2021) च्या नियम १८ अंतर्गत नोंदणीकृत आणि नियमांचे पालन करणारे अधिकृत डिजिटल न्यूज पोर्टल आहे. आमच्या पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या कोणत्याही बातमी, लेख किंवा मजकुराबाबत आपल्याला काही आक्षेप किंवा तक्रार असल्यास, आपण आमच्या मुख्य तक्रार निवारण अधिकाऱ्यांकडे लेखी नोंदणी करू शकता.
कायदा आणि नियमांनुसार आपल्या तक्रारीची २४ तासांच्या आत दखल घेऊन १५ दिवसांच्या आत त्याचे निवारण केले जाईल.
📌 मुख्य तक्रार निवारण अधिकारी (Level 1):
अधिकारी: आमीर मोहम्मद शेख (Editor & Publisher)
वेबसाईट: https://crimemaharashtra.live
अधिकृत ईमेल: crimemaharashtra.live@gmail.com
Info@crimemaharashtra.live
कार्यालयीन पत्ता: पुणे, महाराष्ट्रIn accordance with Rule 11(2)(a) of the Information Technology (Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules, 2021, any person having a grievance regarding the content published on Crimemaharashtra.live may send their complaint to the designated Grievance Redressal Officer.
Grievance Officer: Amir Mohammad Shaikh (Editor & Publisher)
Website: https://crimemaharashtra.live
Official Email: crimemaharashtra.live@gmail.com
Address: Pune, Maharashtra, India.
Note: Please ensure that your complaint includes the specific URL of the news article, the date of publication, and a clear description of the grievance along with supporting documents. All grievances will be acknowledged within 24 hours and resolved within 15 days.,























