Homeताज्या बातम्यावयोवृद्ध महिलेच्या देखभालीसाठी ठेवलेल्या मोलकरणीकडूनच दागिने चोरी; चंदननगर पोलिसांकडून ठाण्यातून आरोपीस अटक

वयोवृद्ध महिलेच्या देखभालीसाठी ठेवलेल्या मोलकरणीकडूनच दागिने चोरी; चंदननगर पोलिसांकडून ठाण्यातून आरोपीस अटक

पुणे:
वयोवृद्ध महिलेची देखभाल करण्यासाठी कामावर ठेवलेल्या महिलेनेच घरातील सोन्याचे दागिने चोरून पोबारा केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी चंदननगर पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण करून आरोपी महिलेला ठाणे (पश्चिम) येथून अटक केली असून, चोरीस गेलेला संपूर्ण मुद्देमाल हस्तगत केला आहे.
​नेमकी घटना काय?
दिनांक १३ जून २०२६ रोजी सकाळी ७:४५ च्या सुमारास वडगावशेरी येथील कृष्णाई बंगलो, साईनाथ हौसिंग सोसायटी येथे ही घटना घडली. फिर्यादी यांनी त्यांच्या वयोवृद्ध आई-वडिलांची देखभाल करण्यासाठी एका महिलेला कामावर ठेवले होते. मात्र, संबंधित महिलेने फिर्यादी यांच्या आईच्या अंगावरील अंदाजे ४ तोळे वजनाच्या सोन्याच्या पाटल्या आणि ५ ग्रॅम वजनाची सोन्याची कर्णफुले असा एकूण २ लाख ७० हजार रुपये किमतीचा ऐवज लबाडीने चोरून नेला. या प्रकरणी २८ जून २०२६ रोजी चंदननगर पोलीस स्टेशनमध्ये भा.न्या.सं. कलम ३०६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
​पोलिसांची धडाकेबाज कामगिरी
गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपी महिलेचे पूर्ण नाव आणि पत्ता उपलब्ध नसल्याने पोलिसांसमोर मोठे आव्हान होते. चंदननगर पोलीस स्टेशनच्या तपास पथकाने तांत्रिक विश्लेषणाचा वापर करून आरोपी महिला ‘स्वाती विजय मोरे’ (वय ३७, रा. फ्लॅट नं. ९१२, लोढा क्राऊन व्हीवा, माजीवाडा, ठाणे पश्चिम) हिचा शोध घेतला.
​दिनांक २ जुलै २०२६ रोजी पोलिसांनी तिला कापुरबावडी पोलीस स्टेशन, ठाणे येथून ताब्यात घेतले. तिच्याकडे केलेल्या सखोल चौकशीत तिने गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी तिच्याकडून चोरलेले ३८.२०० ग्रॅम वजनाच्या दोन सोन्याच्या बांगड्या (किंमत २ लाख ४० हजार रुपये) आणि ५.२०० ग्रॅम वजनाची सोन्याची दोन कर्णफुले (किंमत ३० हजार रुपये) असा एकूण २ लाख ७० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करून गुन्हा उघडकीस आणला आहे.
​मार्गदर्शन आणि तपास
सदरची कामगिरी अपर पोलीस आयुक्त (पूर्व प्रादेशिक विभाग) मनोज पाटील, पोलीस उपआयुक्त (परिमंडळ-७) अबिनाश कुमार आणि सहायक पोलीस आयुक्त (खराडी विभाग) सुनील दोरगे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अश्विनी जगताप आणि पोलीस निरीक्षक (गुन्हे) अमोल धस यांच्या सूचनेनुसार करण्यात आली. तपास पथकातील सहायक पोलीस निरीक्षक गणेश जगदाळे, तसेच पोलीस अंमलदार मेमाणे, घावटे, घुटे, लहाणे, पाटील, बेंद्रे, गायकवाड आणि महिला पोलीस अंमलदार बायसकर यांनी या कार्यवाहीत सहभाग घेतला होता. या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक गणेश जगदाळे करत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

शिक्षण प्रसारक मंडळीला नोंदणी व मुद्रांक विभाग आणि पुणे महापालिकेच्या नोटिसा; होर्डिंग करारप्रकरणी कारवाईची...

शिक्षण प्रसारक मंडळीला नोंदणी व मुद्रांक विभाग आणि पुणे महापालिकेच्या नोटिसा; होर्डिंग करारप्रकरणी कारवाईची प्रक्रिया सुरू पुणे | प्रतिनिधी पुणे शहरातील नामांकित शैक्षणिक संस्था शिक्षण प्रसारक...

महाराष्ट्रातील घाटात पावसाचा जोर कायम, महाबळेश्वरला दरड कोसळली. पुणे बातम्या

मुसळधार पावसामुळे महाबळेश्वरमध्ये वाहतूक मंदावली आहे. पुणे: महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये मुसळधार पाऊस सुरूच असून सह्याद्रीच्या घाटात मंगळवारी सकाळी 8. 30 वाजता संपलेल्या 24...

जयंत पाटील: राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी भाजप नेते विनोद तावडे यांची भेट...

जयंत पाटील (एल) आणि विनोद तावडे (नि.) यांच्या भेटीमुळे राष्ट्रवादी काँग्रेस (एसपी) एनडीएमध्ये सामील होण्याच्या अटकळांना तोंड फुटले. पुणे : राष्ट्रवादीचे माजी प्रदेशाध्यक्ष...

जिल्ह्यातील 72 भूस्खलन प्रवण गावांपैकी केवळ 44 गावांसाठी पुनर्स्थापना मंजूर. पुणे बातम्या

विसापूर किल्ल्याच्या पायथ्याशी पाटण येथे स्लाईड कोसळली ज्यात एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला. पुणे : पुणे जिल्ह्यात ओळखल्या गेलेल्या अनेक भूस्खलन प्रवण गावांचे...

खंडाळ्यातील भूस्खलनाच्या ढिगाऱ्यातून बचावकर्ते मृतदेह बाहेर काढत आहेत. पुणे बातम्या

पुणे : खंडाळा येथे भूस्खलनाच्या ढिगाऱ्याखाली सापडलेल्या एका व्यक्तीचा मृतदेह मंगळवारी दुपारी बाहेर काढण्यात आल्याची माहिती पुणे ग्रामीण पोलिसांनी दिली.पोलिस उपअधीक्षक गजानन...

error: Content is protected !!