शांतीनगर, येरवडा येथील पूरग्रस्त नागरिकांना महावितरणाच्या नियोजनशून्य कारभाराचा फटका; अन्यथा पुणे पँथर सेनेचा तीव्र आंदोलनाचा इशारा
पुणे | शांतीनगर, येरवडा
शांतीनगर, येरवडा येथील पूरग्रस्त भागात दरवर्षी पावसाळ्यात पूरस्थिती निर्माण होत असून नागरिकांना मोठ्या प्रमाणात हालअपेष्टा सहन कराव्या लागतात. यावर्षीही पूर ओसरल्यानंतर महावितरण (MSEDCL) विभागाने संपूर्ण परिसरातील वीजपुरवठा बंद ठेवल्यामुळे अनेक नागरिक संतप्त झाले आहेत.
महावितरणकडून सुरक्षिततेच्या कारणास्तव वीजपुरवठा बंद करण्यात आला असला, तरी ज्या घरांमध्ये पूराचे पाणी गेलेलेच नाही, त्या घरांचाही वीजपुरवठा बंद करण्यात आला आहे. त्यामुळे हजारो नागरिकांना विनाकारण त्रास सहन करावा लागत आहे.
याबाबत शांतीनगरमधील महिला आणि नागरिकांनी पुणे पँथर सेनेचे संस्थापक अध्यक्ष सचिन भोसले यांची भेट घेऊन तातडीने वीजपुरवठा सुरू करण्याची मागणी केली. त्यानंतर सचिन भोसले यांनी महावितरणच्या संबंधित अधिकाऱ्यांशी दूरध्वनीवर संपर्क साधून नागरिकांच्या अडचणी निदर्शनास आणून दिल्या.
महावितरणच्या अधिकाऱ्यांनी “अपघात टाळण्यासाठी वीजपुरवठा बंद ठेवण्यात आला आहे,” असे सांगितले. त्यावर सचिन भोसले यांनी स्पष्ट भूमिका मांडत सांगितले की, ज्या घरांमध्ये पूराचे पाणी शिरले आहे त्यांचा वीजपुरवठा वेगळा ठेवावा, मात्र ज्या घरांमध्ये पाणी गेलेले नाही त्यांचा वीजपुरवठा तात्काळ सुरू करावा. भविष्यात अशा भागांसाठी स्वतंत्र वीज लाईन किंवा स्वतंत्र कनेक्शनची व्यवस्था करावी, जेणेकरून सुरक्षितताही राहील आणि निष्पाप नागरिकांना त्रासही होणार नाही.
सचिन भोसले यांनी सांगितले की, मी स्वतः शांतीनगरचा स्थानिक रहिवासी असून माझ्याही घरातील वीजपुरवठा बंद आहे. त्यामुळे मोबाईल चार्जिंग, पिण्याचे पाणी भरणे, घरातील लहान मुलांची गैरसोय, दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांच्या अभ्यासात अडथळे तसेच घरातून (Work From Home) काम करणाऱ्या नागरिकांनाही मोठा फटका बसत आहे.
दरवर्षी पूरस्थिती निर्माण होत असतानाही महानगरपालिका आणि महावितरण यांनी कायमस्वरूपी उपाययोजना न केल्यामुळे नागरिकांना वारंवार त्रास सहन करावा लागत आहे.
पुणे पँथर सेनेची मागणी:
ज्या घरांमध्ये पूराचे पाणी गेलेले नाही, त्या घरांचा वीजपुरवठा तात्काळ सुरू करावा.
पूरग्रस्त आणि पूरमुक्त भागासाठी स्वतंत्र वीज लाईन किंवा स्वतंत्र कनेक्शनची व्यवस्था करावी.
महानगरपालिका व महावितरण यांनी संयुक्तपणे कायमस्वरूपी पूरनियंत्रण आणि वीजपुरवठ्याचे नियोजन करावे.
अन्यथा पुणे पँथर सेनेच्या वतीने महानगरपालिका आणि महावितरण कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा संस्थापक अध्यक्ष सचिन भोसले यांनी दिला आहे.
– सचिन भोसले
संस्थापक अध्यक्ष, पुणे पँथर सेना

(Grievance Redressal – IT Rules 2021)
क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्यूज (Crimemaharashtra.live) हे केंद्र सरकारच्या माहिती तंत्रज्ञान नियम, २०२१ (IT Rules 2021) च्या नियम १८ अंतर्गत नोंदणीकृत आणि नियमांचे पालन करणारे अधिकृत डिजिटल न्यूज पोर्टल आहे. आमच्या पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या कोणत्याही बातमी, लेख किंवा मजकुराबाबत आपल्याला काही आक्षेप किंवा तक्रार असल्यास, आपण आमच्या मुख्य तक्रार निवारण अधिकाऱ्यांकडे लेखी नोंदणी करू शकता.
कायदा आणि नियमांनुसार आपल्या तक्रारीची २४ तासांच्या आत दखल घेऊन १५ दिवसांच्या आत त्याचे निवारण केले जाईल.
📌 मुख्य तक्रार निवारण अधिकारी (Level 1):
अधिकारी: आमीर मोहम्मद शेख (Editor & Publisher)
वेबसाईट: https://crimemaharashtra.live
अधिकृत ईमेल: crimemaharashtra.live@gmail.com
Info@crimemaharashtra.live
कार्यालयीन पत्ता: पुणे, महाराष्ट्रIn accordance with Rule 11(2)(a) of the Information Technology (Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules, 2021, any person having a grievance regarding the content published on Crimemaharashtra.live may send their complaint to the designated Grievance Redressal Officer.
Grievance Officer: Amir Mohammad Shaikh (Editor & Publisher)
Website: https://crimemaharashtra.live
Official Email: crimemaharashtra.live@gmail.com
Address: Pune, Maharashtra, India.
Note: Please ensure that your complaint includes the specific URL of the news article, the date of publication, and a clear description of the grievance along with supporting documents. All grievances will be acknowledged within 24 hours and resolved within 15 days.,























