Homeताज्या बातम्या'मिशन क्रॅकडाऊन' अंतर्गत फुलगाव येथे अवैध दारूविक्रीवर छापा; लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त...

‘मिशन क्रॅकडाऊन’ अंतर्गत फुलगाव येथे अवैध दारूविक्रीवर छापा; लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त ​पुणे:

पुणे:
पुणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या मार्गदर्शनाखाली व पोलीस उप-आयुक्त परिमंडळ-७ चे श्री. अबिनाश कुमार (भा.पो.से.) यांच्या नेतृत्वाखाली झोन-७ मध्ये अवैध धंदे आणि बेकायदेशीर दारूविक्रीविरुद्ध धडक “मिशन क्रॅकडाऊन” मोहीम सुरू करण्यात आली आहे. या मोहिमेअंतर्गत झोन-७ च्या विशेष पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे लोणीकंद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मौजे फुलगाव (ता. हवेली) येथील हॉटेल जगदंबवर दिनांक १९ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी ४:४५ वाजता छापा टाकला.
​या कारवाईमध्ये राहुल सुरेश संदनशिव (वय ३६ वर्षे, रा. फुलगाव, ता. हवेली, जि. पुणे) हा हॉटेल जगदंब येथे विनापरवाना व बेकायदेशीररित्या देशी-विदेशी दारूचा मोठा साठा बाळगून विक्री करताना मिळून आला.
​जप्त करण्यात आलेला मुद्देमाल:
छाप्यादरम्यान पोलिसांनी विविध नामांकित ब्रँड्सचा एकूण ₹९५,८६०/- किमतीचा दारूसाठा जप्त केला:
​किंगफिशर स्ट्राँग: ५२ नग (₹१०,४००/-)
​टँगो पंच: १०७ नग (₹८,५६०/-)
​क्लासिक गोल्ड: ८९ नग (₹१३,३५०/-)
​टँगो ९०: ३० नग (₹३,२८०/-)
​इम्पेरियल ब्ल्यू: १०१ नग (₹२२,२२०/-)
​मॅकडोवेल नं. १: १०१ नग (₹२१,२१०/-)
​मॅकडोवेल रम: ४८ नग (₹९,८४०/-)
​हेवर्ड्स २०००: ४८ नग (₹६,०००/-)
​ट्यूबर्ग: ५ नग (₹१,०००/-)
​सदर आरोपी आणि जप्त केलेला मुद्देमाल पुढील कायदेशीर कार्यवाहीसाठी लोणीकंद पोलीस ठाण्याच्या अंमलदारांच्या ताब्यात देण्यात आला असून, कायद्यानुसार पुढील कारवाई सुरू आहे.
​कारवाई करणारे पोलीस पथक:
सदरची कौतुकास्पद कामगिरी पोलीस उप-आयुक्त श्री. अबिनाश कुमार (IPS) यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक (API) श्री. गोरक्षनाथ खरड, पोलीस उप-निरीक्षक (PSI) श्री. नितीन राठोड तसेच पोलीस हवालदार सुशिल बेंद्रे, विलास केदारी, गणेश इथापे आणि पोलीस शिपाई हरीप्रसाद पुंडे, शुभम चिनके, अमोल सरतापे व लालु कन्हे यांच्या पथकाने केली.
​’मिशन क्रॅकडाऊन’ सुरूच; नागरिकांना पोलिसांचे आवाहन:
परिमंडळ-७ अंतर्गत प्रतिबंधित गुटखा, अमली पदार्थ, अवैध दारू, जुगार व इतर बेकायदेशीर व्यवसायांविरुद्ध कठोर कारवाया पुढील काळात अधिक तीव्र करण्यात येणार आहेत. सुरक्षित आणि गुन्हेमुक्त पुण्यासाठी नागरिकांनी गुन्हेगारी टोळ्या, अमली पदार्थ, अवैध दारू किंवा शस्त्र बाळगण्याबाबतची माहिती खालील क्रमांकांवर निर्भयपणे कळवावी, माहिती देणाऱ्याचे नाव पूर्णपणे गोपनीय ठेवले जाईल:

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

जुन्नर तालुक्यात रात्रीच्या वेळी घरफोडी करणारी आंतरजिल्हा टोळी गजाआड; ३८ लाख ५० हजारांचा मुद्देमाल...

​पुणे : जुन्नर तालुक्यात आणि परिसरामध्ये रात्रीच्या वेळी घरफोड्या करून धुमाकूळ घालणाऱ्या एका आंतरजिल्हा टोळीला पुणे ग्रामीण एलसीबी (स्थानिक गुन्हे शाखा) आणि ओतूर पोलिसांनी...

खराडी पोलिसांची धडक कारवाई: वाहन चोरीचे ५ गुन्हे उघड; सराईत आरोपी अटकेत

पुणे: पुणे शहरातील वाहन चोरीच्या वाढत्या घटनांना आळा घालण्यासाठी पुणे पोलिसांच्या पथकाने अत्यंत महत्त्वाची कामगिरी बजावली आहे. खराडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडलेल्या वाहन चोरीच्या गुन्ह्याचा...

धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त बोपोडी येथे धम्मदीक्षा अनुकरण सोहळा उत्साहात संपन्न; भीमअनुयायांच्या उपस्थितीने परिसर धम्ममय!

धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त बोपोडी येथे धम्मदीक्षा अनुकरण सोहळा उत्साहात संपन्न; भीमअनुयायांच्या उपस्थितीने परिसर धम्ममय! पुणे (शशिकांत पाटोळे) : महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ऐतिहासिक...

खेड तालुक्यातील वाडा येथील भांबुर्डेकर ज्वेलर्स दुकानात चोरी करणारे दोन आरोपी जेरबंद; १० गुन्हे...

पुणे (ग्रामीण): खेड तालुक्यातील वाडा येथील भांबुर्डेकर ज्वेलर्स दुकानात डल्ला मारणाऱ्या दोन सराईत आरोपींना स्थानिक गुन्हे शाखा व खेड पोलीस स्टेशनच्या पथकाने गजाड केले आहे....

औंध नगर आणि विद्यापीठ भागात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विजयादशमी उत्सव उत्साहात संपन्न;

औंध नगर आणि विद्यापीठ भागात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विजयादशमी उत्सव उत्साहात संपन्न; पुणे (शशिकांत पाटोळे) : औंध नगर आणि विद्यापीठ भागातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा वार्षिक...

error: Content is protected !!