पुणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथक १ ने ड्रग्स तस्करांविरोधात मोठी कारवाई करत मेफेड्रॉन (एम.डी.) हा अंमली पदार्थाचा साठा विक्रीसाठी बाळगणाऱ्या एका इसमास जेरबंद केले आहे.
पुणे शहरात वाढत्या अंमली पदार्थांच्या तस्करीला आळा घालण्यासाठी गुन्हे शाखेचे पथक सातत्याने पेट्रोलिंग करत असते. दिनांक २८/०८/२०२६ रोजी अंमली पदार्थ विरोधी पथक १ कडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीमती तृप्ती सोनवणे व त्यांचे पथक हद्दीत गस्त घाालत असताना, पोलीस अंमलदार तुषार साळुंखे यांना गुप्त बातमीदारामार्फत एक अत्यंत महत्त्वाची माहिती मिळाली. आसिफ अब्दुल शेख (वय २६ वर्षे, रा. काशेवाडी, भवानी पेठ, पुणे) हा इसम विक्रीच्या उद्देशाने मेफेड्रॉन (एम.डी.) हा अंमली पदार्थ घेऊन परिसरात येणार असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली.
ही माहिती मिळताच वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी तातडीने कारवाईची दिशा ठरवली. त्यानुसार, दिनांक २७/०८/२०२६ रोजी रात्री २०:०० वाजल्यापासून ते दिनांक २८/०८/२०२६ रोजी पहाटेपर्यंत टाटा टेलिबिझनेस सर्व्हिसेस इमारतीसमोर, आंबेडकर रोड, संचेती चौक, शिवाजीनगर, पुणे या ठिकाणी पोलिसांनी सापळा रचला. ठरलेल्या वेळेनुसार आरोपी आसिफ अब्दुल शेख हा सुझुकी स्कुटरवरून त्या ठिकाणी आला असता, पोलिसांनी पहाटे ०५:२७ वाजता अत्यंत शिताफीने व कौशल्याने त्यास ताब्यात घेतले.
आरोपीची झडती घेतली असता त्याच्याकडून विक्रीसाठी आणलेला अंदाजे २७,६६०/- रुपये किंमतीचा ०९.२२ मिलीग्रॅम मेफेड्रॉन (एम.डी.) हा अंमली पदार्थ जप्त करण्यात आला. याशिवाय, गुन्ह्यासाठी वापरलेली सुझुकी कंपनीची बर्गमॅन मॉडेलची स्कुटर आणि विवो कंपनीचा मोबाईल फोन असा एकूण १,५२,६६०/- रुपये किंमतीचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे. या प्रकरणी आरोपीविरुद्ध शिवाजीनगर पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंद क्रमांक २३५/२०२६ अन्वये एन.डी.पी.एस. अॅक्ट कलम ८(क), २२ (ब), २९ प्रमाणे कायदेशीर कारवाई करत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर धडक कारवाई अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) श्रीमती तेजस्वी सातपुते, पोलीस उप आयुक्त (गुन्हे) श्री. हसन गौहर व सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे-३) श्री. शंकर खटके यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. यामध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीमती तृप्ती सोनवणे यांच्या सूचनांनुसार पोलीस उपनिरीक्षक योगेश कोतकर, सहायक पोलीस फौजदार विठ्ठल साळुंखे, तसेच पोलीस अंमलदार मद्देल क्षीरसागर, साळुंखे, सरडे, राजे व अक्षय शिर्के यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. पुणे पोलिसांच्या या कारवाईमुळे ड्रग्स तस्करांचे धाबे दणाणले आहेत.

(Grievance Redressal – IT Rules 2021)
क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्यूज (Crimemaharashtra.live) हे केंद्र सरकारच्या माहिती तंत्रज्ञान नियम, २०२१ (IT Rules 2021) च्या नियम १८ अंतर्गत नोंदणीकृत आणि नियमांचे पालन करणारे अधिकृत डिजिटल न्यूज पोर्टल आहे. आमच्या पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या कोणत्याही बातमी, लेख किंवा मजकुराबाबत आपल्याला काही आक्षेप किंवा तक्रार असल्यास, आपण आमच्या मुख्य तक्रार निवारण अधिकाऱ्यांकडे लेखी नोंदणी करू शकता.
कायदा आणि नियमांनुसार आपल्या तक्रारीची २४ तासांच्या आत दखल घेऊन १५ दिवसांच्या आत त्याचे निवारण केले जाईल.
📌 मुख्य तक्रार निवारण अधिकारी (Level 1):
अधिकारी: आमीर मोहम्मद शेख (Editor & Publisher)
वेबसाईट: https://crimemaharashtra.live
अधिकृत ईमेल: crimemaharashtra.live@gmail.com
Info@crimemaharashtra.live
कार्यालयीन पत्ता: पुणे, महाराष्ट्रIn accordance with Rule 11(2)(a) of the Information Technology (Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules, 2021, any person having a grievance regarding the content published on Crimemaharashtra.live may send their complaint to the designated Grievance Redressal Officer.
Grievance Officer: Amir Mohammad Shaikh (Editor & Publisher)
Website: https://crimemaharashtra.live
Official Email: crimemaharashtra.live@gmail.com
Address: Pune, Maharashtra, India.
Note: Please ensure that your complaint includes the specific URL of the news article, the date of publication, and a clear description of the grievance along with supporting documents. All grievances will be acknowledged within 24 hours and resolved within 15 days.,






















