पुणे शहरात अंमली पदार्थांची विक्री करण्यासाठी आलेल्या तस्करांवर गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथक-१ ने मोठी कारवाई केली आहे. मेफेड्रॉन (एम.डी.) हा अंमली पदार्थाचा साठा विक्रीकरिता जवळ बाळगणाऱ्या चार जणांना पोलिसांनी जेरबंद केले आहे.
दिनांक २९/०८/२०२६ रोजी अंमली पदार्थ विरोधी पथक-१, गुन्हे शाखेच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक तृप्ती सोनवणे व त्यांचे अधिकारी आणि पथक पुणे शहर हद्दीत गस्त घालत असताना, पोलीस अंमलदार अमोल सरडे यांना बातमीदारामार्फत गोपनीय माहिती मिळाली. समर्थ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ए.डी. कॅम्प चौक, खाकसार मस्जिदजवळ काही इसम मेफेड्रॉन (एम.डी.) हा अंमली पदार्थ विक्रीसाठी घेऊन येणार असल्याची माहिती मिळताच, वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी नमूद ठिकाणी सापळा रचला.
ए.डी. कॅम्प चौकाकडून आईना व खाकसार मस्जिदकडे जाणाऱ्या रोडवर, मि. बिलोबो यांच्या वाड्याच्या भिंतीजवळ, नाना पेठ, पुणे येथे पोलिसांनी सातपैकी चार जणांना ताब्यात घेतले.
ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींची नावे व पत्ते:
१) नासिर रसूल शेख (वय-२२ वर्षे, रा. मोहम्मद अली रोड, गल्ली नं. १४ ए मोहम्मदवाडी, सय्यदनगर, हडपसर, पुणे).
२) जावेद हसन शेख (वय-२४ वर्षे, रा. गल्ली नं. १८ शिवनेरीनगर, कोंढवा, पुणे).
३) फराज नजिर शेख (वय-२४ वर्षे, रा. गल्ली नं. २८ सय्यदनगर, आशियाना हॉटेलजवळ, हडपसर, पुणे).
४) तसेच या कारवाईत एक विधिसंघर्षित बालक यालाही ताब्यात घेण्यात आले आहे.
आरोपींच्या कब्जातून ७१.८० मिलीग्रॅम वजनाचा मेफेड्रॉन (एम.डी.) हा अंमली पदार्थ हस्तगत करण्यात आला. तसेच गुन्हा करण्यासाठी वापरण्यात आलेल्या २,००,००० रुपये किमतीच्या तीन गाड्या आणि २५,००० रुपये किमतीचा एक विवो कंपनीचा मोबाईल असा एकूण ४,४०,४०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सदर इसमांविरुद्ध समर्थ पोलीस स्टेशन येथे गु.र.नं. २९५/२०२६ एन.डी.पी.एस. अॅक्ट कलम ८ (क), २२ (क), २९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) श्रीमती तेजस्वी सातपुते, पोलीस उप-आयुक्त (गुन्हे) श्री. हसन गौहर, आणि सहायक पोलीस आयुक्त, गुन्हे-३ श्री. शंकर खटके यांच्या मार्गदर्शनाखाली; अंमली पदार्थ विरोधी पथक-१ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीमती तृप्ती सोनवणे यांच्या सूचनांनुसार पोलीस उपनिरीक्षक योगेश कोतकर, सहायक पोलीस फौजदार विठ्ठल साळुंखे, आशा भिंगारे, पोलीस अंमलदार मद्देल, अमोल सरडे, क्षीरसागर, साळुंखे, राजे, गुंड व अक्षय शिर्के यांनी पार पाडली आहे

(Grievance Redressal – IT Rules 2021)
क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्यूज (Crimemaharashtra.live) हे केंद्र सरकारच्या माहिती तंत्रज्ञान नियम, २०२१ (IT Rules 2021) च्या नियम १८ अंतर्गत नोंदणीकृत आणि नियमांचे पालन करणारे अधिकृत डिजिटल न्यूज पोर्टल आहे. आमच्या पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या कोणत्याही बातमी, लेख किंवा मजकुराबाबत आपल्याला काही आक्षेप किंवा तक्रार असल्यास, आपण आमच्या मुख्य तक्रार निवारण अधिकाऱ्यांकडे लेखी नोंदणी करू शकता.
कायदा आणि नियमांनुसार आपल्या तक्रारीची २४ तासांच्या आत दखल घेऊन १५ दिवसांच्या आत त्याचे निवारण केले जाईल.
📌 मुख्य तक्रार निवारण अधिकारी (Level 1):
अधिकारी: आमीर मोहम्मद शेख (Editor & Publisher)
वेबसाईट: https://crimemaharashtra.live
अधिकृत ईमेल: crimemaharashtra.live@gmail.com
Info@crimemaharashtra.live
कार्यालयीन पत्ता: पुणे, महाराष्ट्रIn accordance with Rule 11(2)(a) of the Information Technology (Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules, 2021, any person having a grievance regarding the content published on Crimemaharashtra.live may send their complaint to the designated Grievance Redressal Officer.
Grievance Officer: Amir Mohammad Shaikh (Editor & Publisher)
Website: https://crimemaharashtra.live
Official Email: crimemaharashtra.live@gmail.com
Address: Pune, Maharashtra, India.
Note: Please ensure that your complaint includes the specific URL of the news article, the date of publication, and a clear description of the grievance along with supporting documents. All grievances will be acknowledged within 24 hours and resolved within 15 days.,






















