पुणे शहरातील बाजारपेठेत गर्दीचा गैरफायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्रे व रोख रक्कम चोरी करणाऱ्या मध्य प्रदेश येथील ६ महिलांच्या आंतरराज्यीय टोळीला लक्ष्मीनगर पोलीस स्टेशनच्या तपास पथकाने गजाआड केले आहे.
लक्ष्मीनगर पोलीस स्टेशनमध्ये दाखल गु.र.नं. १७३/२०२६ (भा.न्या.सं. कलम ३०३,३ (५)) आणि गु.र.नं. १७४/२०२६ (भा.न्या.सं. कलम ३१९ (४), ३०९, ३ (५)) या गुन्ह्यांचा तपास करत असताना चोरीला गेलेला माल व अनोळखी महिलांचा शोध घेण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. या अनुषंगाने वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. रविंद्र कदम यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकातील सहायक पोलीस निरीक्षक निखिल पवार, दत्तात्रय लिगाडे तसेच पोलीस अंमलदार सुरज ओंबासे, किरण भागीत आणि अतुल जाधव यांनी घटनास्थळासह पुणे शहर व पिंपरी चिंचवड भागातील ५० किलोमीटर परिसरातील १५० पेक्षा जास्त सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या फुटेजचे तांत्रिक विश्लेषण केले.
मिळालेल्या माहितीच्या आधारे तपास पथकाने दिनांक २७/०८/२०२६ रोजी संगमवाडी पार्किंग नं. ०३ येथे मध्य प्रदेश येथे पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या खालील ६ महिलांना महिला पोलीस हवालदार साबळे, तळेकर व बनसोडे यांच्या मदतीने ताब्यात घेतले:
निशा शंतनू सिसोदिया (वय ३० वर्षे, रा. आळंदी देवाची, ता. खेड, जि. पुणे; मूळ पत्ता: कडिया गाव, थाना बोडा, तहसील पचौर, जि. राजगड, भोपाळ, मध्य प्रदेश)
प्रिया वाईफ ऑप आसिक सिसोदिया (वय ३४ वर्षे, रा. कडिया गाव, थाना बोडा, तहसील पचौर, जि. राजगड, भोपाळ, मध्य प्रदेश)
पुनम प्रदिप सिसोदिया (वय २७ वर्षे, रा. कडिया गाव, थाना बोडा, तहसील पचौर, जि. राजगड, भोपाळ, मध्य प्रदेश)
वर्षा कमल सिसोदिया (वय ३५ वर्षे, रा. गुलखेडी, थाना बोडा, तहसील पचौर, जि. राजगड, भोपाळ, मध्य प्रदेश)
आसना रघुवीर सिसोदिया (वय ३२ वर्षे, रा. गुलखेडी, थाना बोडा, तहसील पचौर, जि. राजगड, भोपाळ, मध्य प्रदेश)
सोनिका निरोत्तम सिसोदिया (वय ३७ वर्षे, रा. जाटखेडी, गुलखेडी, थाना बोडा, तहसील पचौर, जि. राजगड, भोपाळ, मध्य प्रदेश)
जप्त मुद्देमाल व उघडकीस आलेले गुन्हे
अटक करण्यात आलेल्या महिलाঁकडून सोन्याचे दागिने, रोख रक्कम आणि १० मोबाईल फोन असा एकूण ७,००,०००/- रुपये किमतीचा मुद्देमाल पंचनाम्याने जप्त करण्यात आला असून, याद्वारे एकूण ६ गुन्हे उघडकीस आले आहेत. या गुन्ह्यांचा पुढील तपास स.पो.नि. दत्तात्रय लिगाडे व पोलीस अंमलदार श्रीनाथ कांबळे करीत आहेत.
उघडकीस आलेले गुन्हे खालीलप्रमाणे आहेत:
लक्ष्मीनगर पोलीस स्टेशन, पुणे शहर (गु.र.नं. १७३/२०२६, भा.न्या.सं. कलम ३०३(२), ३(५))
लक्ष्मीनगर पोलीस स्टेशन, पुणे शहर (गु.र.नं. १७४/२०२६, भा.न्या.सं. कलम ३१८(४), ३०९, ५)
विश्रामबाग पोलीस स्टेशन, पुणे शहर (गु.र.नं. ३१६/२०२६, भा.न्या.सं. कलम ३०३(२))
विश्रामबाग पोलीस स्टेशन, पुणे शहर (गु.र.नं. ३१८/२०२६, भा.न्या.सं. कलम ३०३(२))
विश्रांतवाडी पोलीस स्टेशन, पुणे शहर (गु.र.नं. ४०९/२०२६, भा.न्या.सं. कलम ३०३(२))
लष्कर पोलीस स्टेशन, पुणे शहर (गु.र.नं. १८५/२०२६, भा.न्या.सं. कलम ३०३(२))
मार्गदर्शन व तपास पथक
सदर यशस्वी कामगिरी अप्पर पोलीस आयुक्त (पूर्व प्रादेशिक विभाग) श्री. मनोज पाटील, पोलीस उप-आयुक्त (परिषेत्र ०४) श्री. चिलुमुला रजनिकांत, आणि सहायक पोलीस आयुक्त (येरवडा विभाग) श्री. सुनील जैतापुरकर यांच्या मार्गदर्शनाखाली लक्ष्मीनगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. रविंद्र कदम, पोलीस निरीक्षक (गुन्हे) निळकंठ जगताप, तपास पथकाचे अधिकारी स.पो.नि. निखिल पवार, स.पो.नि. दत्तात्रय लिगाडे तसेच पोलीस अंमलदार श्रीनाथ कांबळे, गणेश लोखंडे, किरण भागीत, मयूर सूर्यवंशी, सुरज ओंबासे, अतुल जाधव, राहुल परदेशी, भीमराव कांबळे, कादिर शेख, अमोल गायकवाड, दत्तात्रय शिंदे, नितीन धायगुडे, अमोल वायाळ, अक्षय शिंदे, सचिन कुचेकर आणि महिला पोलीस अंमलदार धनश्री साबळे, वर्षा तळेकर, ऐश्वर्या बनसोडे यांनी पार पाडली आहे.

(Grievance Redressal – IT Rules 2021)
क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्यूज (Crimemaharashtra.live) हे केंद्र सरकारच्या माहिती तंत्रज्ञान नियम, २०२१ (IT Rules 2021) च्या नियम १८ अंतर्गत नोंदणीकृत आणि नियमांचे पालन करणारे अधिकृत डिजिटल न्यूज पोर्टल आहे. आमच्या पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या कोणत्याही बातमी, लेख किंवा मजकुराबाबत आपल्याला काही आक्षेप किंवा तक्रार असल्यास, आपण आमच्या मुख्य तक्रार निवारण अधिकाऱ्यांकडे लेखी नोंदणी करू शकता.
कायदा आणि नियमांनुसार आपल्या तक्रारीची २४ तासांच्या आत दखल घेऊन १५ दिवसांच्या आत त्याचे निवारण केले जाईल.
📌 मुख्य तक्रार निवारण अधिकारी (Level 1):
अधिकारी: आमीर मोहम्मद शेख (Editor & Publisher)
वेबसाईट: https://crimemaharashtra.live
अधिकृत ईमेल: crimemaharashtra.live@gmail.com
Info@crimemaharashtra.live
कार्यालयीन पत्ता: पुणे, महाराष्ट्रIn accordance with Rule 11(2)(a) of the Information Technology (Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules, 2021, any person having a grievance regarding the content published on Crimemaharashtra.live may send their complaint to the designated Grievance Redressal Officer.
Grievance Officer: Amir Mohammad Shaikh (Editor & Publisher)
Website: https://crimemaharashtra.live
Official Email: crimemaharashtra.live@gmail.com
Address: Pune, Maharashtra, India.
Note: Please ensure that your complaint includes the specific URL of the news article, the date of publication, and a clear description of the grievance along with supporting documents. All grievances will be acknowledged within 24 hours and resolved within 15 days.,






















