Homeताज्या बातम्याट्रान्सफॉर्मर (डीपी) चोरी करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश; तिघांना अटक, १२ लाख ७३...

ट्रान्सफॉर्मर (डीपी) चोरी करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश; तिघांना अटक, १२ लाख ७३ हजारांचा मुद्देमाल जप्त

पुणे:
पुणे शहर पोलीस आयुक्तालय तसेच आसपासच्या परिसरात वाढत्या ट्रान्सफॉर्मर (डी.पी.) चोरीच्या घटनांच्या अनुषंगाने गुन्हे शाखा युनिट-७ चे पथक गस्त घालत असताना, वाडेगाव (ता. हवेली, जि. पुणे) येथे काही ट्रान्सफॉर्मर चोरी करणारे इसम येणार असल्याची गोपनीय माहिती पोलीस अंमलदार विनायक साळवे यांना मिळाली. या माहितीच्या आधारे युनिट-७ चे पोलीस निरीक्षक वाहिद पठाण यांच्या आदेशानुसार पोलीस उप-निरीक्षक राहुल कोळपे व पथकाने वाडेगाव येथे सापळा रचून एका संशयित मालवाहू टेम्पोसह (क्र. MH-12-GT-6675) तीन जणांना ताब्यात घेतले.
​तपासामध्ये उघड झालेली माहिती:
चौकशी दरम्यान त्यांनी आपली नावे १) मोहम्मद साहेबजान मंगरेखान (वय ३०, रा. गोटेमाळ, सासवड, ता. पुरंदर, जि. पुणे), २) आदर्श चंद्रप्रकाश पांडे (वय २२), आणि ३) चंद्रसेन शिवरतन धारीया (वय २८, दोघेही मूळ रा. उत्तर प्रदेश) असल्याचे सांगितले. त्यांनी गेल्या ५ ते ६ महिन्यांत लोणीकंद पोलीस स्टेशन हद्दीतील वाडेगाव, आष्टापूर, सांगवी सांडस, न्हावी सांडस व हिंगणगाव येथून एकूण ०८ डीपी/ट्रान्सफॉर्मरमधील तांब्याच्या धातूच्या तारा चोरल्याची कबुली दिली आहे.
​उघडकीस आलेले गुन्हे व जप्त मुद्देमाल:
या कारवाईमुळे लोणीकंद पोलीस स्टेशन येथे भारतीय न्याय संहितेच्या कलम ३२४(४) आणि भारतीय विद्युत अधिनियम कलम १३६ अन्वये दाखल असलेले एकूण ०८ गुन्हे उघडकीस आले आहेत. पोलिसांनी आरोपींकडून अंदाजे १२,७३,०००/- रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला असून, त्यांना दिनांक ०६/०९/२०२६ रोजी अटक करण्यात आली आहे.
​मार्गदर्शन व पोलीस पथक:
सदरची उल्लेखनीय कामगिरी अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) श्रीमती तेजस्वी सातपुते, पोलीस उप-आयुक्त (गुन्हे) श्री. गौहर हसन, आणि सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे) श्री. राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली युनिट-७ चे पोलीस निरीक्षक श्री. वाहिद पठाण, पोलीस उप-निरीक्षक राहुल कोळपे तसेच अंमलदार विनायक साळवे, सारंग दळे, प्रशांत कापुरे, निलेश साळवे, भरत उकिर्डे, अमोल ढोणे, विकास कदम, निर्णय लांडे, गिरीष नाणेकर, सुहास तांबेकर, किरण पलांडे, नेहा तापकीर, बाळासाहेब तनपुरे, समाधान पाटील, भरत गुंडवाड, प्रतिक्षा पानसरे आणि सोनाली नरवडे यांच्या पथकाने केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

लोहार समाज हक्काच्या मागण्यांसाठी आक्रमक; मागण्या मान्य न झाल्यास पंढरपुरात सकल लोहार समाजाचे आमरण...

लोहार समाज हक्काच्या मागण्यांसाठी आक्रमक; मागण्या मान्य न झाल्यास पंढरपुरात सकल लोहार समाजाचे आमरण उपोषण पंढरपूर | प्रतिनिधी : लोहार समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी विविध शासकीय...

मुंढवा पोलीस ठाण्याची अमली पदार्थ विरोधी उल्लेखनीय कामगिरी: तडीपार महिलेच्या ताब्यातून १ किलो ४३५...

मुंढवा पोलीस ठाण्याच्या हद्दीत गायरान वस्ती येथे अमली पदार्थ गुन्ह्यातील तडीपार महिला नामे निकीता राकेश गारुंगे, वय ३१ वर्षे, रा. गायरान वस्ती, केशवनगर मुंढवा...

स्नॅपचॅटवर ‘प्रिन्सिका’ बनून मैत्री, क्रिप्टोमध्ये दीड लाखांची फसवणूक; मुलीच्या आवाजामागचा ‘तो’ सायबर पोलिसांच्या ताब्यात

पुणे: पुणे शहर सायबर पोलीस स्टेशन येथे दाखल असलेल्या गु.र.नं. १०९/२०२६ नुसार भारतीय न्याय संहितेच्या कलमे ३१९(२), ३१८(४) आणि माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० च्या...

राज्य माहिती आयोगाच्या पुणे खंडपीठात पारदर्शकता व सन्मानासाठी ‘खुर्ची सोडा’ आंदोलन यशस्वी; विविध संघटनांचा...

राज्य माहिती आयोगाच्या पुणे खंडपीठात पारदर्शकता व सन्मानासाठी ‘खुर्ची सोडा’ आंदोलन यशस्वी; विविध संघटनांचा उत्स्फूर्त सहभाग ​पुणे, दि. १ सप्टेंबर २०२६: माहितीचा अधिकार अधिक प्रभावीपणे...

कोंढवा पोलीस ठाण्याची धडाकेबाज कारवाई: अवघ्या ४८ तासांत दोन गुन्हे दाखल, ८ लाखांहून अधिकचे...

पुणे: कोंढवा पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध अंमली पदार्थविरोधी मोहिमेअंतर्गत पोलिसांनी अत्यंत कठोर पावले उचलत अवघ्या ४८ तासांत दोन स्वतंत्र गुन्हे दाखल केले आहेत. या धडाकेबाज...

error: Content is protected !!