पुणे:
पुणे शहर पोलीस आयुक्तांच्या अंतर्गत येणाऱ्या भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत गांजा तस्करी करणाऱ्या आणि मागील तब्बल सहा महिन्यांपासून पोलिसांना सतत गुंगारा देणाऱ्या एका कुख्यात मुख्य सूत्रधारास अटक करण्यात पुणे पोलिसांना मोठे यश आले आहे. या कारवाईमुळे अंमली पदार्थ तस्करी करणाऱ्या रॅकेटला मोठा सुरुंग लागला आहे.
गुन्ह्याची पार्श्वभूमी व मुख्य आरोपी:
भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन येथे दाखल असलेल्या गुन्ह्यात आरोपी नामे १. चारुदत्त काळुराम चव्हाण, २. अजय पोपटराव पाडूळे यांच्याविरुद्ध एकूण ३५.०७६ किलो ग्रॅम वजनाचा व्यावसायिक स्वरूपाचा गांजा विक्रीकरता जवळ बाळगल्याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर २३९/२०२६, एन.डी.पी.एस. अॅक्ट कलम ८ (क), २०(ब)(ii)(क), २९ अन्वये गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्याच्या तपासामध्ये पाहिजे असलेला आरोपी अजय पोपटराव पाडूळे हा पुणे शहरामध्ये गांजा विक्री करणाऱ्या व्यवसायाचा मुख्य सूत्रधार असल्याचे निष्पन्न झाले होते.
सापळा रचून अटक:
दाखल गुन्ह्यातील मुख्य पाहिजे असलेला आरोपी अजय पोपटराव पाडूळे (वय ३० वर्षे, रा. नवी म्हाडा कॉलनी, बिल्डींग नंबर ११, फ्लॅट नंबर १०९, हडपसर, पुणे) हा पुणे शहरातून आपले अस्तित्व लपवून महाराष्ट्र राज्यातून पसार झाला होता. त्याचा शोध घेण्यासाठी भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुदर्शन गायकवाड यांच्या मार्गदर्शन व सूचनांप्रमाणे तपास पथकाचे अधिकारी निलेश मोकाशी, पोलीस अंमलदार किरण साबळे, मंगेश गायकवाड, तुकाराम सुतार, मंगेश पवार, संदीप आगळे हे कसून शोध घेत होते.
दरम्यान, आरोपी अजय पोपटराव पाडूळे हा त्याचे आई व बहिणीस भेटण्यासाठी पुरंदर चौक, नवी म्हाडा कॉलनी, हडपसर, पुणे येथे येणार असल्याची खात्रीशीर बातमी पोलिसांना मिळाली. त्यानुसार नमूद अधिकारी व अंमलदार यांनी तात्काळ त्या ठिकाणी जाऊन सापळा रचला. आरोपी हा आई व बहिणीस भेटण्यासाठी आला असताना त्यास शिताफीने ताब्यात घेण्यात आले आणि दिनांक ०५/०९/२०२६ रोजी त्यास अटक करण्यात आली. या पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक निलेश मोकाशी हे करीत आहेत.
इतर गुन्ह्यांची माहिती:
सदर आरोपी हा केवळ एकाच गुन्ह्यात नव्हे, तर खालीलप्रमाणे इतर पोलीस ठाण्यांमधील गांजा विक्रीच्या गुन्ह्यांमध्येही हवा होता: अ.क्र.पोलीस ठाणे व गुन्हा रजिस्टर नंबरकायदेकलम
१भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन गु.रं.नं. १९६/२०२६एन.डी.पी.एस. अॅक्ट क. ८ (क), २०(ब)(ii)(अ)
२लोणी काळभोर पोलीस स्टेशन गु.रं.नं. ६९/२०२६एन.डी.पी.एस. अॅक्ट क. ८ (क), २०(ब)(ii)(क)
३वानवडी पोलीस स्टेशन गु.रं.नं. ४१९/२०२६एन.डी.पी.एस. अॅक्ट कलम ८ (क), २०(ब)(ii)(क)मार्गदर्शन व यशस्वी पोलीस पथक:
सदरची उल्लेखनीय कामगिरी मा. पोलीस उप आयुक्त परिमंडळ, पुणे शहर, श्री. मिलींद मोहीते, मा. सहाय्यक पोलीस आयुक्त, भारती विद्यापीठ विभाग, पुणे शहर श्री. राहुल आवारे यांच्या मार्गदर्शनाखाली, भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनकडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. सुदर्शन गायकवाड, पोलीस निरीक्षक (गुन्हे) संतोष जाधव यांच्या सूचनांप्रमाणे खालील पोलीस अंमलदार व अधिकारी यांच्या पथकाने पार पाडली आहे:
पोलीस उपनिरीक्षक: निलेश मोकाशी
पोलीस अंमलदार: किरण साबळे, मंगेश गायकवाड, मंगेश पवार, तुकाराम सुतार, संदीप आगळे, मितेश चोरमोले, अभिनय चौधरी, सागर बोरगे, सोहम शेंडकर, सचिन सरपाले, निलेश खैरमोडे.

(Grievance Redressal – IT Rules 2021)
क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्यूज (Crimemaharashtra.live) हे केंद्र सरकारच्या माहिती तंत्रज्ञान नियम, २०२१ (IT Rules 2021) च्या नियम १८ अंतर्गत नोंदणीकृत आणि नियमांचे पालन करणारे अधिकृत डिजिटल न्यूज पोर्टल आहे. आमच्या पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या कोणत्याही बातमी, लेख किंवा मजकुराबाबत आपल्याला काही आक्षेप किंवा तक्रार असल्यास, आपण आमच्या मुख्य तक्रार निवारण अधिकाऱ्यांकडे लेखी नोंदणी करू शकता.
कायदा आणि नियमांनुसार आपल्या तक्रारीची २४ तासांच्या आत दखल घेऊन १५ दिवसांच्या आत त्याचे निवारण केले जाईल.
📌 मुख्य तक्रार निवारण अधिकारी (Level 1):
अधिकारी: आमीर मोहम्मद शेख (Editor & Publisher)
वेबसाईट: https://crimemaharashtra.live
अधिकृत ईमेल: crimemaharashtra.live@gmail.com
Info@crimemaharashtra.live
कार्यालयीन पत्ता: पुणे, महाराष्ट्रIn accordance with Rule 11(2)(a) of the Information Technology (Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules, 2021, any person having a grievance regarding the content published on Crimemaharashtra.live may send their complaint to the designated Grievance Redressal Officer.
Grievance Officer: Amir Mohammad Shaikh (Editor & Publisher)
Website: https://crimemaharashtra.live
Official Email: crimemaharashtra.live@gmail.com
Address: Pune, Maharashtra, India.
Note: Please ensure that your complaint includes the specific URL of the news article, the date of publication, and a clear description of the grievance along with supporting documents. All grievances will be acknowledged within 24 hours and resolved within 15 days.,























