Homeक्राईममुंढवा पोलिसांची धडक कारवाई; ५०,५१८ रुपयांचा प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थ आणि विनापरवाना गॅस...

मुंढवा पोलिसांची धडक कारवाई; ५०,५१८ रुपयांचा प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थ आणि विनापरवाना गॅस विक्री करणाऱ्यावर गुन्हा दाखल!

​पुणे: मुंढवा पोलीस ठाण्याच्या हद्दीत प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थ आणि विनापरवाना गॅसची बेकायदेशीर विक्री करणाऱ्या इसमावर मुंढवा पोलिसांनी धडक कारवाई केली आहे. या कारवाईत एकूण ५०,५१८/- रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, आरोपीविरुद्ध मुंढवा पोलीस ठाण्यात विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
​कारवाईची सविस्तर माहिती:
​दिनांक १५ सप्टेंबर २०२६ रोजी रात्री २१:०० वाजण्याच्या सुमारास सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश पिंगुवाले, पोलीस हवालदार साळुंके, पोलीस शिपाई ऋषीकेश टिळेकर, जराड, रासकर आणि अत्तार हे गस्तीवर (पेट्रोलिंग) होते. यादरम्यान पोलीस शिपाई ऋषीकेश टिळेकर व जराड यांना गोपनिय बातमीदारा मार्फत माहिती मिळाली की, पििंगळे वस्ती (पासपोर्ट ऑफिस शेजारी, लेबर कॅम्प, गायकवाड यांच्या पार्किंगची मोकळी जागा) येथील ‘महेश्वर किराणा स्टोअर्स’मध्ये एक इसम स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी शासनाकडून प्रतिबंधित केलेले जन आरोग्यास असुरक्षित असलेले तंबाखूजन्य पदार्थ, गुटखा, तंबाखू, पान मसाला यांचा साठा करून विक्री करत आहे. तसेच याच ठिकाणी विनापरवाना बेकायदेशीर गॅसची विक्री केली जात असल्याची माहिती देखील मिळाली.
​सदर बातमीची खात्री करून वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी तात्काळ त्या ठिकाणी छापा टाकला. कारवाईदरम्यान महेश्वर बिन्देश्वरी साह या इसमाला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून एकूण ५०,५१८/- रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
​गुन्हा दाखल:
​शासनाने जन आरोग्याच्या दृष्टीने तंबाखूजन्य पदार्थांच्या उत्पादन, साठा, वितरण, वाहतूक व विक्रीवर प्रतिबंध घातलेला असतानाही त्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी आणि विनापरवाना गॅस विक्री केल्याप्रकरणी आरोपी महेश्वर बिन्देश्वरी साह याच्याविरुद्ध मुंढवा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा रजिस्टर नंबर ३१६/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १२३, १२५, २२३, २७४, २५, २८७ तसेच अन्न सुरक्षा मानदे कायदा २००६ चे कलम २६(२)(i), २६(२)(iv) सह वाचन ३(१)(zz) चे उल्लंघन केल्याप्रकरणी कलम ५९ नुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
​पोलीस पथकाचे उल्लेखनीय योगदान:
​सदर धडक कारवाई पुणे पोलीस आयुक्तालय व परिमंडळ ६ च्या वरिष्ठ अधिकारयांच्या मार्गदर्शनाखाली पार पाडली:
​मार्गदर्शन: पोलीस आयुक्त श्री. अमितेश कुमार, पोलीस सह आयुक्त श्री. संजय दराडे, अपर पोलीस आयुक्त श्री. मनोज पाटील, पोलीस उपआयुक्त (परिमंडळ ६) श्री. जीवन बेनिवाल, सहाय्यक पोलीस आयुक्त श्री. अतुलकुमार नवगिरे.
​कार्यवाही: मुंढवा पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीमती स्मिता वासनिक, पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्री. सागर गोडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. गणेश पिंगुवाले, पो.हवा. साळुंके, पो.शि. ऋषीकेश टिळेकर, जराड, रासकर आणि अत्तार यांच्या पथकाने ही कामगिरी फत्ते केली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

सार्वजनिक ठिकाणी मद्यप्राशन करणाऱ्या तब्बल २६ जणांवर मुंढवा पोलिसांची कायदेशीर कारवाई

पुणे: पुण्यातील मुंढवा पोलीस ठाण्याच्या हद्दीत सार्वजनिक ठिकाणी मद्यप्राशन करणाऱ्या एकूण २६ जणांवर पोलिसांनी कायदेशीर कारवाई केली आहे. ​सप्टेंबर महिन्यामध्ये सोशल मीडियावरील ‘इन्स्टाग्राम’ (Instagram) माध्यमातून मुंढवा...

​बाणेरच्या ९०० ते १२०० कोटींच्या वक्फ जमिनीचा ९.५१ कोटींचा व्यवहार अखेर रद्द; वक्फ मंडळाचा...

पुणे : बाणेर येथील हजरत उडणशाह वली दर्गा आणि बाणेर मशिदीशी संबंधित ७ हेक्टर ३४ आर, म्हणजेच १८ एकरांहून अधिक बहुमूल्य वक्फ जमिनीच्या वादात...

बाणेर वक्फ जमीन विवाद: वक्फ बोर्डाच्या निर्णयाचे ‘मिस फरहा चॅरिटेबल फाऊंडेशन’कडून स्वागत

​पुणे: बाणेर येथील बहुचर्चित वक्फ जमिनीच्या प्रकरणात महाराष्ट्र राज्य वक्फ बोर्डाने दिलेल्या ऐतिहासिक निर्णयाचे 'मिस फरहा चॅरिटेबल फाऊंडेशन' (Miss Farha Charitable Foundation) ने स्वागत...

मोक्का गुन्ह्यातील १ वर्षापासून पसार असलेला आरोपी बेंगळुरु येथून जेरबंद

पुणे, १५ सप्टेंबर २०२६: पुणे शहर पोलीस दल आणि खराडी पोलीस स्टेशनच्या पथकाने एक मोठी कारवाई करत मोक्का (MCOCA) गुन्ह्याखाली मागील एक वर्षापासून फरारी असलेल्या...

विश्रामबाग पोलीस स्टेशनची मोठी कारवाई: १० लाख रुपये किंमतीच्या १४ मोटार सायकली हस्तगत

​पुणे शहरातील विश्रामबाग पोलीस स्टेशनच्या तपास पथकाने विधीसंघर्षीत बालक आणि त्याच्या साथीदारांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून पुणे व इतर ठिकाणांहून चोरी केलेल्या एकूण १० लाख...

error: Content is protected !!