पुणे:
खराडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत इंस्टाग्राम व टेलिग्रामवरील बनावट खात्यांच्या माध्यमातून तरुणाला खोट्या ड्रग्जच्या गुन्ह्यात अडकविण्याची भीती दाखवून वारंवार ब्लॅकमेल केले. तसेच त्याच्याकडून १,७७,००० रुपयांची ऑनलाईन खंडणी उकळून त्यास आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या दोन सायबर आरोपींना पुणे शहर पोलिसांनी बिहार राज्यातून शिताफीने अटक केली आहे.
घटनेची पार्श्वभूमी व गुन्हा दाखल:
खराडी पोलीस ठाणे हद्दीतील २२ वर्षीय तरुण फिर्यादी यांचा मुलगा दि. ३०/०९/२०२६ रोजी घरातून निघून गेल्याने खराडी पोलीस स्टेशन येथे गु.र.नं. ३३५/२०२६, भारतीय न्यायसंहिता (भा.न्या.सं.) कलम १४० (३) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान, दि. ०१/१०/२०२६ रोजी सकाळी ०६:३० वाजण्याच्या सुमारास मयत तरुणाने खराडी येथील रिव्हरडेल सूट सोसायटीच्या इमारतीच्या २७ व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली.
या प्रकरणी मयताचे वडिलांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांच्या मुलास ‘अजयकुमार भाटिया’ या नावाने फोन करून ड्रग्जच्या खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची भीती दाखवून धमकावण्यात आले व मानसिक त्रास दिल्यामुळे त्याने आत्महत्या केल्याचे स्पष्ट झाले. त्यावरून खराडी पोलीस स्टेशन येथे गु.र.नं. ३५६/२०२६, भा.न्या.सं. कलम १०८, ३०८ (६), ३५१ (४), ३ (५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. तपासादरम्यान यामध्ये आयटी ॲक्ट कलम ६६ (डी), भा.न्या.सं. ६१ (२), २०४ कलमांची वाढ करण्यात आली.
घटनास्थळ भेट व तांत्रिक तपास:
गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन परिमंडळ ७ चे पोलीस उपआयुक्त श्री. अबिनाश कुमार, गुन्हे शाखा पोलीस उपआयुक्त श्री. गौहर हसन आणि खराडी विभागाचे सहायक पोलीस आयुक्त श्री. सुनील दोरगे यांनी घटनास्थळाला भेट दिली. तसेच खराडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. संजय चव्हाण आणि तपास पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक श्री. रविंद्र गोडसे यांना गुन्हा लवकरात लवकर उघडकीस आणण्याच्या सूचना दिल्या.
तपास पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक श्री. रविंद्र गोडसे, पोलीस उपनिरीक्षक श्री. संतोष म्हेत्रे आणि तांत्रिक विश्लेषक पोलीस अंमलदार श्री. सुरज जाधव यांनी आरोपींच्या मोबाईल लोकेशन व तांत्रिक विश्लेषणाद्वारे आरोपी बिहारमधील गोपालगंज व दानापूर (पाटणा) परिसरात असल्याची माहिती निष्पन्न केली.
बिहारमध्ये सापळा रचून अटक व जप्त मुद्देमाल:
पोलीस उपनिरीक्षक श्री. संतोष म्हेत्रे, पोलीस अंमलदार महेश नाणेकर व गणेश गिरी यांच्या पथकाने दि. २०/१०/२०२६ रोजी पाटणा शहर, बिहार येथे सापळा रचून खालील दोन आरोपींना ताब्यात घेतले:
१. आकाशकुमार संजय सिंग (वय १८ वर्षे २ महिने, रा. गौरी, ता. कुंठपूर, जि. गोपालगंज, बिहार)
२. राजकुमार संपूर्ण आनंद सिंग (वय २२ वर्षे, रा. बिरण गड, ता. बाराहाट, जि. बांका, बिहार)
चौकशीत गुन्ह्या Is सहभाग निष्पन्न झाल्याने दि. २१/१०/२०२६ रोजी त्यांना दानापूर पोलीस ठाणे, पाटणा येथे अटक करण्यात आली. आरोपींकडून ७ वेगवेगळ्या कंपन्यांचे मोबाईल फोन, १ लॅपटॉप, १ टॅब असा एकूण २,२२,०००/- रुपये किमतीचा इलेक्ट्रॉनिक मुद्देमाल जप्त करण्यात आला.
त्यानंतर न्यायालयाकडून ५ दिवसांचा ट्रान्झिट रिमांड मिळवून दि. २३/१०/२०२६ रोजी दोन्ही आरोपींना शिवाजीनगर न्यायालय, पुणे येथे हजर केले असता, न्यायालयाने त्यांना दि. ३०/१०/२०२६ पर्यंत ८ दिवसांची पोलीस कोठडी मंजूर केली आहे.
गुन्ह्याची कार्यपद्धत (Modus Operandi) आणि आर्थिक तपास:
वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. संजय चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक श्री. रविंद्र गोडसे व पथकाने केलेल्या तांत्रिक तपासात धक्कादायक माहिती समोर आली. आरोपींनी ‘RVCJ INSTA’ या इंस्टाग्राम पेजला फॉलो करणाऱ्या मुलींच्या नावाने बनावट इंस्टाग्राम खाती तयार करून मयत शिखर सक्सेना याच्याशी संपर्क साधला. त्यानंतर त्यास टेलिग्रामवर बोलावून व्हिडिओ कॉलद्वारे मुलीचा आक्षेपार्ह व्हिडिओ दाखवून त्याचे रेकॉर्डिंग केले.
सदर रेकॉर्डिंगच्या आधारे मयतास ब्लॅकमेल करून व ड्रग्जच्या खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची भीती दाखवून ५ वेगवेगळ्या बँक खात्यांवर एकूण १,७७,०००/- रुपये ऑनलाईन खंडणी उकळल्याचे निष्पन्न झाले. पोलीस उपनिरीक्षक श्री. गणेश घुले व सायबर पथकातील पोलीस अंमलदार श्री. विकास लांबकाने, श्री. मयुर गजरमल यांनी मनी ट्रेल तपासून खंडणीच्या रकमेपैकी १,१४,४९८/- रुपये एवढी रक्कम वेळीच होल्ड करण्यात यश मिळवले आहे.
पुढील तपास व सहकाऱ्यांचा शोध:
अटक आरोपींच्या चौकशीतून त्यांचा साथीदार अनिकेत गुप्ता (रा. लुधियाना, पंजाब) आणि खंडणीची रक्कम स्वीकारणारे बँक खातेधारक क्रिश कुमार (रा. अरुणाचल प्रदेश) तसेच इतर संबंधित आरोपींचा शोध सुरू आहे. खराडी पोलीस या गुन्ह्यातील बनावट सोशल मीडिया खाती, बँक खात्यांचे व्यवहार आणि इतर आरोपींच्या सहभागाबाबत अधिक कसून तपास करत आहेत. गुन्ह्याचा पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. संजय चव्हाण करीत आहेत.
पोलिसांचे नागरिकांना आवाहन:
सोशल मीडियावर अनोळखी व्यक्तींकडून येणाऱ्या फ्रेंड रिक्वेस्ट, व्हिडिओ कॉल, तसेच अश्लील व्हिडिओ प्रसारित करण्याची किंवा खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची धमकी देऊन पैशांची मागणी करणाऱ्या व्यक्तींना नागरिकांनी बळी पडू नये. अशाप्रकारचे ब्लॅकमेलिंग किंवा ऑनलाईन खंडणीची मागणी झाल्यास घाबरून न जाता नजीकच्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा किंवा राष्ट्रीय सायबर हेल्पलाईन क्रमांक १९३० वर तक्रार नोंदवावी, असे आवाहन खराडी पोलिसांनी केले आहे.
पोलीस पथक व मार्गदर्शन:
सदरची यशस्वी कामगिरी पोलीस आयुक्त श्री. अमितेशकुमार, पोलीस सह आयुक्त श्री. संजय दराडे, अपर पोलीस आयुक्त (पुर्व प्रादेशिक विभाग) श्री. मनोजकुमार पाटील, पोलीस उपआयुक्त (परिमंडळ ७) श्री. अबिनाश कुमार, पोलीस उपआयुक्त (गुन्हे) श्री. गौहर हसन आणि सहायक पोलीस आयुक्त (खराडी विभाग) श्री. सुनील दोरगे यांच्या मार्गदर्शनखाली खालील अधिकाऱ्यांच्या व अंमलदारांच्या पथकाने केली आहे:
अधिकारी: वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. संजय चव्हाण, पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्री. चंद्रसेन पालकर, तपास पथकाचे प्रभारी अधिकारी तथा सहायक पोलीस निरीक्षक श्री. रविंद्र गोडसे, सहायक पोलीस निरीक्षक श्री. संतोष म्हेत्रे, सायबर पोलीस उपनिरीक्षक श्री. गणेश घुले.
पोलीस अंमलदार: महेश नाणेकर, मनोज खरपुडे, श्रीकांत शेंडे, नवनाथ वाळके, संतोष लवटे, सुरज जाधव, गणेश गिरी, अशोक केदार, श्रीकांत कोद्रे, विलास केदारी, कमलेश पाटील, अमित छडीदार, महेश बोराडे.
तांत्रिक मदत विशेष कामगिरी: परिमंडळ ७ कार्यालयातील तांत्रिक विश्लेषक पोलीस अंमलदार श्री. सुनील गुंडाळ व श्री. मंगेश शेळके.

(Grievance Redressal – IT Rules 2021)
क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्यूज (Crimemaharashtra.live) हे केंद्र सरकारच्या माहिती तंत्रज्ञान नियम, २०२१ (IT Rules 2021) च्या नियम १८ अंतर्गत नोंदणीकृत आणि नियमांचे पालन करणारे अधिकृत डिजिटल न्यूज पोर्टल आहे. आमच्या पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या कोणत्याही बातमी, लेख किंवा मजकुराबाबत आपल्याला काही आक्षेप किंवा तक्रार असल्यास, आपण आमच्या मुख्य तक्रार निवारण अधिकाऱ्यांकडे लेखी नोंदणी करू शकता.
कायदा आणि नियमांनुसार आपल्या तक्रारीची २४ तासांच्या आत दखल घेऊन १५ दिवसांच्या आत त्याचे निवारण केले जाईल.
📌 मुख्य तक्रार निवारण अधिकारी (Level 1):
अधिकारी: आमीर मोहम्मद शेख (Editor & Publisher)
वेबसाईट: https://crimemaharashtra.live
अधिकृत ईमेल: crimemaharashtra.live@gmail.com
Info@crimemaharashtra.live
कार्यालयीन पत्ता: पुणे, महाराष्ट्रIn accordance with Rule 11(2)(a) of the Information Technology (Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules, 2021, any person having a grievance regarding the content published on Crimemaharashtra.live may send their complaint to the designated Grievance Redressal Officer.
Grievance Officer: Amir Mohammad Shaikh (Editor & Publisher)
Website: https://crimemaharashtra.live
Official Email: crimemaharashtra.live@gmail.com
Address: Pune, Maharashtra, India.
Note: Please ensure that your complaint includes the specific URL of the news article, the date of publication, and a clear description of the grievance along with supporting documents. All grievances will be acknowledged within 24 hours and resolved within 15 days.,























