Homeताज्या बातम्याकेंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर अण्णा मोहोळ यांच्या वाढदिवसानिमित्त औंधमध्ये भव्य रक्तदान शिबिर; जनसंपर्क...

केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर अण्णा मोहोळ यांच्या वाढदिवसानिमित्त औंधमध्ये भव्य रक्तदान शिबिर; जनसंपर्क कार्यालयाचेही उत्साहात उद्घाटन

केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर अण्णा मोहोळ यांच्या वाढदिवसानिमित्त औंधमध्ये भव्य रक्तदान शिबिर; जनसंपर्क कार्यालयाचेही उत्साहात उद्घाटन

पुणे, औंध-बोपोडी दि.५ (शशिकांत पाटोळे) : केंद्रीय राज्यमंत्री नामदार मुरलीधर अण्णा मोहोळ यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून औंधरोड येथील ‘गणेश सेवा चॅरिटेबल ट्रस्ट’च्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या सामाजिक उपक्रमाला नागरिकांनी आणि कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. वाढदिवसाचा बडेजाव न करता सामाजिक बांधिलकी जपत राबवलेल्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

केंद्रीय राज्यमंत्री नामदार मुरलीधर (अण्णा) मोहोळ यांनी या रक्तदान शिबिराला सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांनी स्वतः रक्तदात्यांशी संवाद साधत त्यांच्या या अमूल्य योगदानाचे कौतुक केले व त्यांचे आभार मानले. शिबिरात सहभागी झालेल्या सर्व रक्तदात्यांना सन्मानपत्र (सर्टिफिकेट) देऊन गौरविण्यात आले.

“रक्तदान हे केवळ दान नसून गरजू रुग्णांना जीवनदान देणारे महान कार्य आहे,” असे मनोगत यावेळी व्यक्त करत ना. मोहोळ यांनी सर्व रक्तदात्यांचे व आयोजकांचे अभिनंदन केले.

जनसंपर्क कार्यालयाचे शानदार उद्घाटन
याच सुवर्णक्षणाचे औचित्य साधून मा. सपनाताई छाजेड नगरसेविका यांच्या नवीन ‘जनसंपर्क कार्यालयाचे’ उद्घाटन केंद्रीय राज्यमंत्री ना. मुरलीधर अण्णा मोहोळ यांच्या शुभहस्ते अत्यंत उत्साहात संपन्न झाले. नागरिकांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी आणि स्थानिक विकासाला गती देण्यासाठी हे कार्यालय हक्काचे व्यासपीठ ठरेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

मान्यवरांची मांदियाळी
या दुहेरी सोहळ्याला पुण्याचे उपमहापौर मा. परशुराम वाडेकर, नगरसेवक मा. सन्नीदादा निम्हण, नगरसेविका मा. भक्तीताई गायकवाड, माजी नगरसेवक मा. आनंद छाजेड, नगरसेविका मा. सपनाताई छाजेड, तसेच गणेश सेवा चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष मा. वैभव प्रभाकर, मा. सचिन वाडेकर आणि सामाजिक कार्यकर्ते मा. राज निर्भवणे, मा. बाळासाहेब सोरटे यांच्यासह परिसरातील अनेक स्थानिक पदाधिकारी, छाजेड कुटुंबीय आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

रक्तदानाचा सामाजिक संदेश आणि जनसंपर्क कार्यालयाच्या माध्यमातून जनसेवेचा नवा संकल्प अशा दुहेरी उद्देशाने संपन्न झालेल्या या सोहळ्यामुळे औंध-बोपोडी परिसरात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल, मुंबईतील ब्रीच कँडीमध्ये उपचार सुरू; सुप्रिया सुळे

शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल, मुंबईतील ब्रीच कँडीमध्ये उपचार सुरू; सुप्रिया सुळे मुंबई, दि.५ (शशिकांत पाटोळे) : राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ...

स्वराज्य डॉक्टर्स असोसिएशनचा पदग्रहण सोहळा उत्साहात संपन्न २०० डॉक्टरांची उपस्थिती; डॉ. परवेझ ग्रँट यांना...

स्वराज्य डॉक्टर्स असोसिएशनचा पदग्रहण सोहळा उत्साहात संपन्न २०० डॉक्टरांची उपस्थिती; डॉ. परवेझ ग्रँट यांना प्रथम ‘स्वराज्य आरोग्यभूषण पुरस्कार २०२६’ वाघोली : स्वराज्य डॉक्टर्स असोसिएशनचा २०२६–२०२८ या...

पुणे ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई: दरोडा, घरफोडी व वाहन चोरी करणाऱ्या सराईत गुन्हेगारांना बेड्या;...

पुणे ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई: दरोडा, घरफोडी व वाहन चोरी करणाऱ्या सराईत गुन्हेगारांना बेड्या; १२ गुन्हे उघडकीस! ​पुणे (दि. ४ नोव्हेंबर २०२६) - पुणे ग्रामीण...

​मा. न्यायालयाच्या कक्षात दंगा व धक्काबुकी करणाऱ्या आरोपींवर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल; न्यायालयाने...

​मा. न्यायालयाच्या कक्षात दंगा व धक्काबुकी करणाऱ्या आरोपींवर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल; न्यायालयाने केला दंड ​पुणे: मा. न्यायालयाच्या कक्षात दंगा करून, शांततेस बाधा निर्माण करत...

आंतरराज्यातील घरफोडी करणारे दोन आरोपी २४ तासांत जेरबंद; ७ लाख ७ हजार ३६० रुपयांचा...

कोथरुड पोलीस स्टेशनची मोठी कारवाई: आंतरराज्यातील घरफोडी करणारे दोन आरोपी २४ तासांत जेरबंद; ७ लाख ७ हजार ३६० रुपयांचा मुद्देमाल जप्त ​पुणे: पुणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या...

error: Content is protected !!