Homeताज्या बातम्यादुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी चंद्रकांतदादांचा अनोखा पुढाकार! समुत्कर्ष ग्राहक पेठेच्या माध्यमातून ५० टक्के सवलतीत...

दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी चंद्रकांतदादांचा अनोखा पुढाकार! समुत्कर्ष ग्राहक पेठेच्या माध्यमातून ५० टक्के सवलतीत धान्य उपलब्ध करून देणार

दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी चंद्रकांतदादांचा अनोखा पुढाकार!
समुत्कर्ष ग्राहक पेठेच्या माध्यमातून ५० टक्के सवलतीत धान्य उपलब्ध करून देणार

*दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी कोथरुडकरांना लोकसहभागाचे आवाहन*

पुणे; दि १३ (शशिकांत पाटोळे) : राज्यातील दुष्काळग्रस्त नागरिकांना मदतीचा हात देण्यासाठी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी अनोखा पुढाकार घेतला आहे. दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी लोकसहभाग वाढविण्याच्या उद्देशाने कोथरूडमधील समुत्कर्ष ग्राहक पेठेच्या माध्यमातून ५० टक्के सवलतीच्या दरात धान्य उपलब्ध करून देण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. या उपक्रमात कोथरुडकरांनी सहभागी व्हावे, असे आवाहन चंद्रकांतदादा पाटील यांनी केले आहे.

एल निनोचा प्रभाव आणि पावसातील तूट यामुळे राज्यातील अनेक भागांत दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. या संकटाचा सामना करण्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. मात्र, शासनाच्या प्रयत्नांना लोकसहभागाची जोड मिळाल्यास दुष्काळग्रस्त नागरिकांना अधिक प्रभावीपणे मदत करता येईल, असा विश्वास चंद्रकांतदादा पाटील यांनी व्यक्त केला.

या उपक्रमांतर्गत कोथरूडमधील स्वयंसेवी संस्था, गृहनिर्माण सोसायट्या आणि मदत करू इच्छिणाऱ्या नागरिकांनी निधी संकलित करावा. या संकलित निधीतून समुत्कर्ष ग्राहक पेठेच्या माध्यमातून ५० टक्के सवलतीच्या दरात धान्य उपलब्ध करून दिले जाणार आहे.

कोविडच्या संकटात ज्या पद्धतीने लोकसहभागातून आपण एकत्रितपणे परिस्थितीवर मात केली, त्याचप्रमाणे दुष्काळाच्या संकटातही समाजातील प्रत्येक घटकाने पुढाकार घेण्याची गरज आहे. शहरी भागातील नागरिकांनी दुष्काळग्रस्त बांधवांच्या मदतीसाठी योगदान द्यावे. या सामाजिक कार्यासाठी समुत्कर्ष ग्राहक पेठेच्या माध्यमातून सर्वतोपरी सहकार्य केले जाईल, अशी ग्वाही चंद्रकांतदादा पाटील यांनी दिली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

खडक पोलीस ठाण्याची धडाकेबाज कामगिरी: २५ दिवसांत १०,००० किमीहून अधिक प्रवास करून उत्तर प्रदेशातून...

पुणे: पुणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या खडक पोलीस स्टेशन हद्दीत घडलेल्या अपहाराच्या गुन्ह्याचा तपास करत पुणे पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. अपहार केलेल्या मालमत्तेचा शोध घेण्यासाठी...

आळंदी नगर परिषद परिसरात रक्तरंजित थरार; दोन हल्लेखोरांकडून तरुणावर हल्ला

पुणे; दि. १३ (शशिकांत पाटोळे) : विद्येचं माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुणे शहर दिवसेंदिवस रक्तरंजित ठरत आहे. पुण्यातील कोयता गँगची दहशत सगळ्यांनाच माहित आहे....

पुण्यातील विमाननगर परिसरात फटाके वाजवण्यावरून झालेल्या वादातून अमन समीर शेख (वय २२) या तरुणाचा...

पुण्यातील विमाननगर परिसरात फटाके वाजवण्यावरून झालेल्या वादातून अमन समीर शेख (वय २२) या तरुणाचा बेदम मारहाणीत मृत्यू झाला आहे. या प्रकरणी विमानतळ पोलिसांनी खुनाचा...

पुण्यात फटाक्यांच्या वादातून रक्तरंजित थरार; वडिलांना वाचवण्यासाठी धावलेल्या २१ वर्षीय तरुणीच्या डोक्यात वर्मी वार...

Pune Crime News पुणे; दि.१२ (शशिकांत पाटोळे) : पुण्यातील नाना पेठ परिसरात फटाके वाजवण्यावरून झालेल्या किरकोळ वादाचे रूपांतर जीवघेण्या हल्ल्यात झाल्याची धक्कादायक घटना समोर आली...

सणस मैदानावर फक्त २० प्रशिक्षकांनाच प्रवेश! दरमहा १५ हजार भाडे, ३ वर्षांची नियुक्ती |...

पुणे; दि.१३ (शशिकांत पाटोळे) : सारसबागेजवळील कै. बाबुराव सणस मैदानावरील ४०० मीटर, ८ लेन सिंथेटिक ट्रॅक आणि अॅथलेटिक्स मैदान कोण, कसे आणि किती शुल्कात...

error: Content is protected !!