Miss Farha Charitable Foundation च्या मागणीला मान — ईद-ए-मिलादची सुट्टी ५ सप्टेंबरऐवजी ८ सप्टेंबर मुंबई व उपनगरात जाहीर
दिनांक : ४ सप्टेंबर २०२५
स्थळ : पुणे
महाराष्ट्र शासनाने आज जाहीर केले आहे की मुंबई आणि मुंबई उपनगर विभागात ईद-ए-मिलादची सार्वजनिक सुट्टी ५ सप्टेंबरऐवजी ८ सप्टेंबर २०२५ रोजी होईल. इतर सर्व जिल्ह्यांमध्ये सुट्टी ५ सप्टेंबर रोजीच राहणार आहे.

हा महत्वाचा निर्णय Miss Farha Charitable Foundation, पुणे तर्फे डॉ. फरहा अन्वर हुसेन शेख (अध्यक्ष) आणि अन्वर शेख (संचालक) यांनी केलेल्या मागणीच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आला आहे.
या संदर्भात फाउंडेशनकडून मुख्यमंत्र्यांना मेल पाठविण्यात आला होता, ज्यावर माननीय मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांनी तत्काळ संबंधित विभागाकडे फॉरवर्ड करून कार्यवाही करण्याचे निर्देश दिले. यानंतर प्रशासनाने त्यावर विचार करून आज अधिकृत उत्तर दिले आहे.
संस्थेने अधोरेखित केले होते की यावर्षी ५ सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशीचे गणेश विसर्जन आणि ईद-ए-मिलाद हे दोन्ही मोठे उत्सव एकाच दिवशी आल्याने वाहतूक कोंडी, कायदा-सुव्यवस्था आणि नागरिकांना गैरसोयीची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवरच ईद-ए-मिलादची सुट्टी ८ सप्टेंबरला द्यावी अशी मागणी करण्यात आली होती.
Miss Farha Charitable Foundation ने शासनाने दिलेल्या या सकारात्मक प्रतिसादाचे स्वागत केले असून, शासन, मुख्यमंत्री कार्यालय आणि सर्व संबंधित विभागांचे मनःपूर्वक आभार मानले आहेत. हा निर्णय सामंजस्य, शांतता आणि नागरिकांच्या सोयीच्या दृष्टीने ऐतिहासिक पाऊल असल्याचे फाउंडेशनने नमूद केले आहे.

नियम व अटी / Disclaimer:
वरील माहिती विविध ओपन सोर्स माध्यमांतून, सोशल मीडियातील चर्चांमधून तसेच उपलब्ध असलेल्या सार्वजनिक वाचन-सामग्रीवर आधारित आहे. “क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्युज” (Crime Maharashtra Live News) व त्याचे संपादक, प्रतिनिधी किंवा संबद्ध कर्मचारी या माहितीच्या संपूर्ण सत्यतेचा दावा करत नाहीत.ही माहिती केवळ जनहितार्थ, समाजजागृती व चर्चेसाठी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. कृपया वाचक/दर्शकांनी संबंधित अधिकृत यंत्रणांकडून खातरजमा करूनच कोणताही निर्णय घ्यावा. या माहितीमध्ये काही बाबी चुकीच्या, अपूर्ण किंवा कालांतराने बदललेल्या असू शकतात. त्यामुळे कोणतीही कायदेशीर अथवा प्रशासकीय कृती करण्यापूर्वी अधिकृत स्रोताची खात्री करणे अत्यावश्यक आहे.. तथापि, या बातम्यांमुळे उद्भवणाऱ्या कोणत्याही गैरसमज किंवा नुकसानीस Crime Maharashtra Live News जबाबदार राहणार नाही.> टीप: जर कोणाला आमच्या बातमीबाबत आक्षेप असल्यास, कृपया आम्हाला [crimemaharashtra.live@gmail.com] वर संपर्क करा.मोबाईल नंबर 7744808833























