Homeताज्या बातम्याअश्विनी नवले यांची ‘पुरोगामी संघर्ष परिषद’च्या महिला आघाडीच्या राज्य सचिवपदी निवड

अश्विनी नवले यांची ‘पुरोगामी संघर्ष परिषद’च्या महिला आघाडीच्या राज्य सचिवपदी निवड

📍 सातारा (ता. माण) :
पुरोगामी संघर्ष परिषदेच्या महिला आघाडीच्या राज्य सचिवपदी अश्विनी संदेश नवले (रा. पांढरवाडी, ता. माण) यांची निवड झाली आहे. संघटनेच्या सांगली येथे पार पडलेल्या राज्यस्तरीय बैठकीत ही निवड करण्यात आली.

या बैठकीत राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष संघर्षनायक डॉ. प्रा. सुभाष वायदंडे यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम पार पडला. महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा डॉ. सुनिता खटावकर यांनी अश्विनी नवले यांना निवडीचे पत्र देऊन सत्कार केला.

अश्विनी नवले यांनी यापूर्वी पश्चिम महाराष्ट्र महिला आघाडीच्या अध्यक्षपदाची जबाबदारी समर्थपणे सांभाळली आहे. त्यांच्या प्रभावी कार्याची दखल घेत त्यांना राज्य सचिवपदाची महत्त्वपूर्ण जबाबदारी देण्यात आली आहे.

कार्यक्रमास वरिष्ठ प्रदेशाध्यक्ष डॉ. प्राचार्य बाळासाहेब साठे, वरिष्ठ राज्य उपाध्यक्ष दादासाहेब कांबळे, राज्य कार्याध्यक्ष उदयसिंह बागावपाटील, महासचिव अर्चना घोरपडे, गुलाबराव साळवे, युवक प्रदेशाध्यक्ष मनोज भिसे, पश्चिम महाराष्ट्र महिला आघाडीच्या अध्यक्षा कोमल पवार, पश्चिम महाराष्ट्र सरचिटणीस नंदिनी वाघमारे, उपाध्यक्षा सुजाता कांबळे, सांगली जिल्हा अध्यक्षा मंगल हाताळे आदी मान्यवर उपस्थित होते.

या निवडीमुळे माण तालुक्यातून प्रथमच महिला आघाडीच्या राज्यस्तरीय सचिवपदावर नेमणूक झाल्याने तालुक्यातून व पांढरवाडी गावातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

हजरत शाहदावल बाबा र.है. दर्गाह येथे रोशन बेग कर्नाटक मंत्री यांची भेट

पुणे प्रतिनिधी इरफान सय्यद पुण्यातील सुप्रसिद्ध 812 वर्ष पूर्व ऐतिहासिक नवसाला पावणाऱ्या हजरत शाहादावल बाबा रहमतुल्लाह अलैह दर्गाह शरीफ येरवडा पुणे येथे माननीय...

डिजिटल अटक फसवणूक प्रकरणात ज्येष्ठ नागरिकाचे 18 लाख रुपयांचे नुकसान. पुणे बातम्या

पुणे: काळेपडळ येथील ६४ वर्षीय रहिवासी या वर्षी ८ ते १५ एप्रिल दरम्यान डिजिटल अटक फसवणुकीत सायबर गुन्हेगारांकडून १८ लाख रुपये गमावले.याबाबत ज्येष्ठ नागरिकाने...

मॅट्रिमोनियल साईटवर बनावट प्रोफाइलद्वारे लाखोंची फसवणूक; सराईत आरोपी अटकेत

पुणे : येरवडा पोलीस स्टेशनच्या हद्दीत मॅट्रिमोनियल वेबसाईटवर बनावट प्रोफाइल तयार करून महिलांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या सराईत आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणात...

पुण्याच्या आयएलएस लॉ कॉलेजच्या अधिक विद्यार्थ्यांनी ‘जादा फी’चा परतावा मागितला आहे. पुणे बातम्या

पुणे: कथित जादा शुल्क वसुलीच्या निषेधार्थ बुधवारी सलग तिसऱ्या दिवशी आयएलएस विधी महाविद्यालयातील आणखी विद्यार्थ्यांनी अनधिकृत शुल्काचा परतावा मिळावा यासाठी अर्ज सादर...

error: Content is protected !!