कोथरुड पोलीस स्टेशनची मोठी कारवाई: आंतरराज्यातील घरफोडी करणारे दोन आरोपी २४ तासांत जेरबंद; ७ लाख ७ हजार ३६० रुपयांचा मुद्देमाल जप्त
पुणे:
पुणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या अंतर्गत येणाऱ्या कोथरुड पोलीस स्टेशनच्या पथकाने उत्कृष्ट कामगिरी करत, घरफोडी करणाऱ्या आंतरराज्यातील दोन आरोपींना अवघ्या २४ तासांच्या आत अटक केली आहे. त्यांच्याकडून गुन्ह्यात चोरीस गेलेला एकूण ७,०७,३६०/- रुपये किमतीचा कॉपर वायरचा मुद्देमाल यशस्वीरित्या हस्तगत करण्यात आला आहे.
घटनेची पार्श्वभूमी:
दिनांक २५/१०/२०२६ रोजी फिर्यादी यांनी कोथरुडमधील उजवी भुसारी कॉलनी येथील एका नवीन बांधकामाच्या साईटवरील बिल्डिंगमधील फ्लॅट फोडून कोणीतरी अज्ञात चोराने ७,०७,३६०/- रुपये किमतीची कॉपर वायर चोरून नेल्याबाबत तक्रार दाखल केली होती. या तक्रारीवरून कोथरुड पोलीस स्टेशन येथे गु.रं.नं. ४२२/२०२६, भारतीय न्यायसंहिता (भा.न्या.सं.) कलम ३०५ (५), ३३१ (३), ३३१ (४) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.
कसून तपासादरम्यान मिळालेली गोपनिय बातमी आणि कारवाई:
गुन्हा दाखल झाल्यानंतर लागलीच कोथरुड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. अरुण घोडके यांनी आरोपींचा शोध घेऊन गुन्हा लवकरात लवकर उघडकीस आणण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक मोहन चव्हाण व त्यांचा स्टाफ गुन्ह्याच्या अनुषंगाने पेट्रोलिंग करत होते.
दरमान, कोथरुड पोलीस स्टेशनचे चौकी अंमलदार योगेश सुळ यांना त्यांच्या गोपनिय बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की, सदर गुन्ह्यातील चोरीस गेलेला मुद्देमाल विक्री करण्यासाठी दोन संशयित इसम डुक्कर खिंड सर्व्हिस रोड, कोथरुड, पुणे येथे येणार आहेत. त्यांनी ही महत्त्वाची माहिती तत्काळ पोलीस उपनिरीक्षक मोहन चव्हाण यांना दिली. चव्हाण यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरुण घोडके यांना याची माहिती दिली असता, त्यांनी तातडीने खात्री करून योग्य ती कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश दिले.
पोलिसांच्या पथकाने नमूद ठिकाणी छापा टाकून दोन्ही संशयितांना ताब्यात घेतले. त्यांना विश्वासात घेऊन नाव-पत्ता विचारला असता त्यांनी त्यांची खालीलप्रमाणे नावे सांगितली:
१) अहमद रजा इसरार अहमद खान (वय २२ वर्षे, रा. गाव हरैय्या चंन्द्रासी, ता. तुलशीपुर, जि. बलरामपूर, उत्तर प्रदेश)
२) फैय्याज मेराज शहा (वय २० वर्षे, रा. गाव सिशानिया घोपलापुर, राम नगर, ता. तुलशीपुर, जि. बलरामपूर, उत्तर प्रदेश)
त्यांच्याकडे असणाऱ्या एका पांढऱ्या रंगाच्या गोणीमध्ये कॉपर वायर मिळून आली. त्याबाबत कसून चौकशी केली असता, त्यांनी ही कॉपर वायर कोथरुडच्या उजवी भुसारी कॉलनी येथील नवीन बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणाहूनच चोरी केल्याची कबुली दिली. त्यानंतर पोलिसांनी त्यांना गुन्ह्यात अटक करून त्यांच्याकडून संपूर्ण ७,०७,३६०/- रुपये किमतीची चोरीस गेलेली कॉपर वायर जप्त केली. सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मोहन चव्हाण हे करत आहेत.
मार्गदर्शक व तपास पथक:
सदरची ही यशस्वी कामगिरी मा. अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग, श्री. राजेश बनसोडे, मा. पोलीस उपायुक्त परिमंडळ ३ डॉ. सागर कवडे, मा. सहायक पोलीस आयुक्त, कोथरुड विभाग, श्रीमती सुजाता तानवडे यांचे मार्गदर्शनखाली कोथरुड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. अरुण घोडके, पोलीस निरीक्षक (गुन्हे) अनिल माने, पोलीस निरीक्षक श्री. सुनिल कारोटे, सहायक पोलीस निरीक्षक संदीप घुले, पोलीस उपनिरीक्षक मोहन चव्हाण, तसेच पोलीस अंमलदार योगेश सुळ, गौतम पवार, विशाल मंडले, अजय पवार, प्रदिप जवादे, सुरज कदम आणि उमेश राऊत यांच्या पथकाने पार पाडली आहे.

(Grievance Redressal – IT Rules 2021)
क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्यूज (Crimemaharashtra.live) हे केंद्र सरकारच्या माहिती तंत्रज्ञान नियम, २०२१ (IT Rules 2021) च्या नियम १८ अंतर्गत नोंदणीकृत आणि नियमांचे पालन करणारे अधिकृत डिजिटल न्यूज पोर्टल आहे. आमच्या पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या कोणत्याही बातमी, लेख किंवा मजकुराबाबत आपल्याला काही आक्षेप किंवा तक्रार असल्यास, आपण आमच्या मुख्य तक्रार निवारण अधिकाऱ्यांकडे लेखी नोंदणी करू शकता.
कायदा आणि नियमांनुसार आपल्या तक्रारीची २४ तासांच्या आत दखल घेऊन १५ दिवसांच्या आत त्याचे निवारण केले जाईल.
📌 मुख्य तक्रार निवारण अधिकारी (Level 1):
अधिकारी: आमीर मोहम्मद शेख (Editor & Publisher)
वेबसाईट: https://crimemaharashtra.live
अधिकृत ईमेल: crimemaharashtra.live@gmail.com
Info@crimemaharashtra.live
कार्यालयीन पत्ता: पुणे, महाराष्ट्रIn accordance with Rule 11(2)(a) of the Information Technology (Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules, 2021, any person having a grievance regarding the content published on Crimemaharashtra.live may send their complaint to the designated Grievance Redressal Officer.
Grievance Officer: Amir Mohammad Shaikh (Editor & Publisher)
Website: https://crimemaharashtra.live
Official Email: crimemaharashtra.live@gmail.com
Address: Pune, Maharashtra, India.
Note: Please ensure that your complaint includes the specific URL of the news article, the date of publication, and a clear description of the grievance along with supporting documents. All grievances will be acknowledged within 24 hours and resolved within 15 days.,























