Homeताज्या बातम्याओव्हरहेड केबल्स कारवाईवर शिवसेना आक्रमक; नियमावली होईपर्यंत कारवाई स्थगित करण्याची मागणी

ओव्हरहेड केबल्स कारवाईवर शिवसेना आक्रमक; नियमावली होईपर्यंत कारवाई स्थगित करण्याची मागणी

ओव्हरहेड केबल्स कारवाईवर शिवसेना आक्रमक; नियमावली होईपर्यंत कारवाई स्थगित करण्याची मागणी
पुणे, प्रतिनिधी :
पुणे महानगरपालिकेकडून शहरातील ओव्हरहेड केबल्सवर सुरू असलेल्या कारवाईमुळे पुणेकरांना मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागत असल्याची बाब समोर आली आहे. इंटरनेट सेवा विस्कळीत झाल्याने विद्यार्थी, आयटी कर्मचारी, व्यावसायिक तसेच स्टार्टअप्स यांचे दैनंदिन कामकाज ठप्प होत असून, शहराच्या डिजिटल प्रगतीवर याचा गंभीर परिणाम होत आहे.
या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने आज पुणे महानगरपालिका आयुक्तांना निवेदन देत सदर कारवाई तात्काळ स्थगित करण्याची मागणी केली आहे.
पुणे शहर शिक्षण, आयटी आणि उद्योग क्षेत्रात देशात अग्रस्थानी असताना नियोजनशून्य आणि एकतर्फी कारवाई शहराच्या प्रतिमेलाच धक्का देणारी असल्याची भावना नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे. केंद्र सरकारच्या “Digital India” उपक्रमाच्या पार्श्वभूमीवर इंटरनेट ही अत्यावश्यक सेवा बनली असताना अशा प्रकारचे अडथळे निर्माण होणे चिंताजनक असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.
यावेळी शिवसेना (उ.बा.ठा.) पक्षाचे
संजय मोरे (शहरप्रमुख), गजानन थरकुडे (शहरप्रमुख) आणि अनंत घरत (प्रसिद्धी प्रमुख) यांनी आयुक्तांना निवेदन सादर केले.
📌 मुख्य मागण्या :
• ओव्हरहेड केबल्स संदर्भात स्पष्ट व पारदर्शक नियमावली तात्काळ तयार करावी
• नियमावली लागू होईपर्यंत सध्याची कारवाई स्थगित करावी
• लहान व मध्यम इंटरनेट सेवा पुरवठादारांसाठी सुलभ परवाना प्रक्रिया राबवावी
• कारवाईमागील हितसंबंध सार्वजनिक करावेत
• सर्व कंपन्यांवर समान निकषांनुसार पारदर्शक कारवाई करावी
🗣️ प्रतिक्रिया :
यावेळी प्रसिद्धी प्रमुख अनंत घरत यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करताना म्हटले की,
“इंटरनेट ही आजच्या काळातील अत्यावश्यक सेवा आहे. कोणतीही स्पष्ट नियमावली किंवा पूर्वतयारी न करता अशा प्रकारची अतिरेकी कारवाई करणे हे प्रशासनाचे दुटप्पी धोरण दर्शवते. या प्रकरणावरून महापौर आणि स्थायी समिती अध्यक्षांमध्ये वाद होत असल्याची चर्चा आहे. जर असेच भांडण ड्रेनेज आणि नालेसफाईसारख्या मूलभूत प्रश्नांवर झाले असते, तर पुणे शहर तुंबले नसते.”
सदर प्रकारामुळे नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले असून प्रशासनाने तातडीने समन्वय साधत लोकहिताचा ठोस निर्णय घ्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
“स्मार्ट सिटी”च्या दिशेने वाटचाल करताना नागरिकांच्या मूलभूत गरजांचा विचार करूनच धोरणे आखली पाहिजेत, अन्यथा विकास प्रक्रियेलाच अडथळा निर्माण होईल, असेही पदाधिकाऱ्यांनी नमूद केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

विनाअनुदानित महाविद्यालये खाजगी विद्यापीठांमध्ये रूपांतरित करण्यासाठी धोरण तयार करण्यासाठी तज्ञांची समिती. पुणे बातम्या

पुणे : अधिक स्वायत्तता आणि गती मिळावी यासाठी विनाअनुदानित सरकारी महाविद्यालयांचे खाजगी विद्यापीठांमध्ये रूपांतर करण्यासाठी सर्वसमावेशक धोरण तयार करण्यासाठी महाराष्ट्र उच्च व तंत्रशिक्षण विभागाने...

पुण्यात रेल्वेची वाहतूक पूर्वपदावर, रुळावरून घसरल्याच्या चौकशी अहवालाला महिनाभर लागू शकतो. पुणे बातम्या

पुणे : सोमवारी सायंकाळी सीएसएमटी-सोलापूर वंदे भारत एक्स्प्रेस रुळावरून घसरल्याने २४ तासांच्या विस्कळीत झालेल्या पुणे रेल्वे स्थानकावरील रेल्वे वाहतूक बुधवारी पूर्वपदावर आली.रुळावरून घसरलेला वंदे...

वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने रावेत, किवळे रहिवासी, नगरसेवक महावितरणच्या अधिकाऱ्यांना भेटले. पुणे बातम्या

पुणे : रावेत आणि किवळे येथील रहिवाशांनी स्थानिक नगरसेविका ऐश्वर्या तरस यांच्यासह बुधवारी महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड (महावितरण कंपनी लिमिटेड) च्या अधिकाऱ्यांची...

पुण्यातील जलशुद्धीकरण प्रकल्पातून क्लोरीन वायूची गळती; 24 रूग्णालयात दाखल पुणे न्यूज

प्रतिमा केवळ प्रातिनिधिक उद्देशासाठी वापरली जाते पुणे : पुण्यातील कोंढवा परिसरात गुरुवारी क्लोरीन वायू गळती झाल्याने २४ जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले, अशी...

चांगल्या नफ्यासाठी ऑनलाइन शेअर-ट्रेडिंगचे आमिष टेकनी 2.3cr | पुणे बातम्या

पुणे: हडपसरजवळील शेवाळवाडी येथील एका ३६ वर्षीय सॉफ्टवेअर अभियंत्याने २६ जानेवारी ते ११ मार्चदरम्यान ऑनलाइन शेअर-ट्रेडिंग घोटाळ्यात जास्त परताव्याच्या आमिषाला बळी पडून २.३ कोटी...

error: Content is protected !!