कारचा सांगडाच उरला, २ महिलांसह चिमुरड्याचा जागीच मृत्यू, इंदापूरमधील अपघाताचे भीषण
पुणे (शशिकांत पाटोळे) | दि; २६ फेब्रुवारी २०२६ : पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर एक विचित्र अपघात घडला आहे. पंक्चर काढण्यासाठी रस्त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या ट्रकवर भरधाव मारुती सुझुकीची इको कार आदळली. या अपघातात दोन महिलाा आणि एक चिमुरड्याचा जागीच मृत्यू झाला आहे. तर या अपघातात ३ जण जखमी झाले आहे. जखमींना तातडीने नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. 
मिळालेल्या माहितीनुसार, पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर डाळज नंबर २ तालुका इंदापूर इथं संध्याकाळच्या सुमारास ही घटना घडली. पुण्याच्या दिशेनं जाणाऱ्या मार्गावर पंक्चर काढण्यासाठी एक ट्रक उभा होता.

त्याचवेळी पाठीमागून भरधाव वेगात आलेल्या इको कार ट्रकवर आदळली. या अपघातात आदिती अमर हातेकर (वय २५) आणि त्यांच्या मुलगा जय अमर हातेकर (वय २) आणि सखुबाई ईश्वर गेजगे (वय ६० वर्ष ) यांचा मृत्यू झाला. हे सगळं जण सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यातील राहणारे होते.
मारुती सुझुकी कंपनीची इको गाडी क्रमांक एम एच १२ एक्स ई ८८१६ मधून ७ जण पुण्याच्या दिशेनं जात होते. आयशर ट्रक एम. एच १३ सीयू ५१६३ हा पंक्चर झाला होता. त्यामुळे पुण्याकडे जाणाऱ्या महामार्गावर रस्त्याच्या बाजूला उभा होता. हा ट्रॅक धोकादायक परिस्थितीत उभा होता.
त्याचवेळी पाठीमागून आलेल्या भरधाव वेगात मारुती सुझुकी इकोच्या चालकाला समोर उभा असलेला ट्रक दिसला. पण, वेग जास्त असल्यामुळे नियंत्रण सुटलं आणि इको कार थेट ट्रकवर आदळली. हा अपघात इतका भीषण होता की, इको कारचा चुराडा झाला.
इको कार डाव्याबाजूने ट्रकवर आदळली. या भीषण अपघातात ३ जणांचा जागीच मृत्यू झाला. तर इको गाडी चालक कबीरदास ईश्वर गेजगे (वय ५०) हे गंभीर जखमी झालेले आहेत.
तर त्यांच्या पत्नी स्वाती कबीरदास गेजगे (वय ३४) आणि मुलगी समृद्धी कबीरदास गेजगे (वय १०) हे किरकोळ जखमी झाले आहे.
अपघातग्रस्त ट्रक हा धोकादायक स्थितीत अर्धवट महामार्गावर उभा होता. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात येत असल्याची माहिती भिगवण पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद महांगडे यांनी दिली.

(Grievance Redressal – IT Rules 2021)
क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्यूज (Crimemaharashtra.live) हे केंद्र सरकारच्या माहिती तंत्रज्ञान नियम, २०२१ (IT Rules 2021) च्या नियम १८ अंतर्गत नोंदणीकृत आणि नियमांचे पालन करणारे अधिकृत डिजिटल न्यूज पोर्टल आहे. आमच्या पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या कोणत्याही बातमी, लेख किंवा मजकुराबाबत आपल्याला काही आक्षेप किंवा तक्रार असल्यास, आपण आमच्या मुख्य तक्रार निवारण अधिकाऱ्यांकडे लेखी नोंदणी करू शकता.
कायदा आणि नियमांनुसार आपल्या तक्रारीची २४ तासांच्या आत दखल घेऊन १५ दिवसांच्या आत त्याचे निवारण केले जाईल.
📌 मुख्य तक्रार निवारण अधिकारी (Level 1):
अधिकारी: आमीर मोहम्मद शेख (Editor & Publisher)
वेबसाईट: https://crimemaharashtra.live
अधिकृत ईमेल: crimemaharashtra.live@gmail.com
Info@crimemaharashtra.live
कार्यालयीन पत्ता: पुणे, महाराष्ट्रIn accordance with Rule 11(2)(a) of the Information Technology (Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules, 2021, any person having a grievance regarding the content published on Crimemaharashtra.live may send their complaint to the designated Grievance Redressal Officer.
Grievance Officer: Amir Mohammad Shaikh (Editor & Publisher)
Website: https://crimemaharashtra.live
Official Email: crimemaharashtra.live@gmail.com
Address: Pune, Maharashtra, India.
Note: Please ensure that your complaint includes the specific URL of the news article, the date of publication, and a clear description of the grievance along with supporting documents. All grievances will be acknowledged within 24 hours and resolved within 15 days.,























