खड्ड्यांनी हैराण नागरिक – वंचित बहुजन आघाडीचे आंदोलन, 15 दिवसांत रस्ते दुरुस्त न झाल्यास आयुक्तांना घेरावाचा इशारा!
पुणे – पर्वती विधानसभा प्रभाग क्रमांक 37 मधील बिबवेवाडी – कात्रज मार्गावरील शेळके वस्ती रिक्षा स्थानकाजवळ प्रभागातील खराब रस्त्यांच्या विरोधात वंचित बहुजन आघाडीच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात आले.
यावेळी वंचितच्या कार्यकर्त्यांनी प्रशासन आणि शासनावर सडक स्थितीबाबत निष्क्रियतेचा आरोप करत खड्ड्यांत बोट घालत आंदोलन केले. आंदोलनकर्त्यांनी सांगितले की, “केंद्रीय गृहमंत्री मा. अमित शहा यांच्या दौऱ्यानिमित्त तात्पुरत्या डांबरीकरणाच्या नावाखाली केलेल्या दिखाऊ कामांमुळे काही दिवसांतच रस्त्यांवर पुन्हा खड्डे पडले आहेत.”
वंचित बहुजन आघाडीतर्फे स्पष्ट इशारा देण्यात आला की, पंधरा दिवसांत जर रस्त्यांची योग्य दुरुस्ती झाली नाही, तर पुणे महानगरपालिकेचे आयुक्त यांना त्यांच्या कार्यालयात घेराव घालण्यात येईल.
या आंदोलनात वंचित बहुजन आघाडीचे विश्वास गदादे, सागर आल्हाट, श्याम गोरे, संदीप चौधरी, पी. बि. सावळे, जॉर्ज मदनकर, हरी वाघमारे, जिवन रोकडे, सतीश साबळे, अरुण इंगळे, संतोष पटेकर, बिपीन लोंढे, तौसीफ पठाण, सारिकाताई भोसले, शोभाताई गायकवाड यांच्यासह अनेक पदाधिकारी व स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

नियम व अटी / Disclaimer:
वरील माहिती विविध ओपन सोर्स माध्यमांतून, सोशल मीडियातील चर्चांमधून तसेच उपलब्ध असलेल्या सार्वजनिक वाचन-सामग्रीवर आधारित आहे. “क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्युज” (Crime Maharashtra Live News) व त्याचे संपादक, प्रतिनिधी किंवा संबद्ध कर्मचारी या माहितीच्या संपूर्ण सत्यतेचा दावा करत नाहीत.ही माहिती केवळ जनहितार्थ, समाजजागृती व चर्चेसाठी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. कृपया वाचक/दर्शकांनी संबंधित अधिकृत यंत्रणांकडून खातरजमा करूनच कोणताही निर्णय घ्यावा. या माहितीमध्ये काही बाबी चुकीच्या, अपूर्ण किंवा कालांतराने बदललेल्या असू शकतात. त्यामुळे कोणतीही कायदेशीर अथवा प्रशासकीय कृती करण्यापूर्वी अधिकृत स्रोताची खात्री करणे अत्यावश्यक आहे.. तथापि, या बातम्यांमुळे उद्भवणाऱ्या कोणत्याही गैरसमज किंवा नुकसानीस Crime Maharashtra Live News जबाबदार राहणार नाही.> टीप: जर कोणाला आमच्या बातमीबाबत आक्षेप असल्यास, कृपया आम्हाला [crimemaharashtra.live@gmail.com] वर संपर्क करा.























