Homeताज्या बातम्यागणेश विसर्जन मिरवणुकीत मोबाईल चोरी करून दरोड्याच्या तयारीतील ११ जण जेरबंद; ६३...

गणेश विसर्जन मिरवणुकीत मोबाईल चोरी करून दरोड्याच्या तयारीतील ११ जण जेरबंद; ६३ मोबाईलसह ३० लाखांहून अधिकचा मुद्देमाल हस्तगत

पुणे:
पुण्यातील शिवाजीनगर पोलीस स्टेशन हद्दीत गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान गर्दीचा फायदा घेऊन गणेश भक्तांचे मोबाईल फोन चोरणाऱ्या आणि दरोड्याच्या तयारीत असणाऱ्या तब्बल ११ जणांच्या टोळीला शिवाजीनगर पोलिसांनी जेरबंद केले आहे. या कारवाईत पोलिसांनी ६३ वेगवेगळ्या कंपन्यांचे मोबाईल फोन आणि एक शेवरलेट क्रुझ कार असा एकूण ३०,५७,०५० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
​घटनेची पार्श्वभूमी आणि कारवाई:
दिनांक २६ सप्टेंबर २०२६ रोजी रात्री १२:०० ते सकाळी ६:३० या वेळेत पुणे शहरातील मध्यवर्ती भागात (जंगली महाराज रोड, फर्ग्युसन कॉलेज रोड, झांशीची राणी चौक, पुणे महानगरपालिका परिसर, लक्ष्मी रोड) गणेश विसर्जन मिरवणूक बघण्यासाठी मोठ्या प्रमाणात भाविक आले होते.
​त्यादरम्यान, शिवाजीनगर पोलीस स्टेशनच्या निगराणी पथकाचे पोलीस उपनिरीक्षक अरविंद शिंदे यांना खबऱ्यामार्फत गुप्त बातमी मिळाली की, खुडे ब्रिज नदीपात्रा लगत ७ ते ८ इसम हत्यारानिशी दरोडा टाकण्याच्या तयारीने थांबले आहेत. सदरची माहिती वरिष्ठांना कळविल्यानंतर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीशकुमार दिघावकर आणि पोलीस निरीक्षक (गुन्हे) अमर काळंगे यांनी पोलीस उपनिरीक्षक अरविंद शिंदे व पोलीस उपनिरीक्षक मनिषा वलसे यांना मिरवणुकीत गर्दीचा गैरफायदा घेऊन मोबाईल चोरी करणाऱ्यांचा शोध घेण्याबाबत महत्त्वाच्या सूचना व मार्गदर्शन केले.
​त्यानंतर, पोलीस निरीक्षक (गुन्हे) अमर काळंगे आणि निगराणी पथकाचे पोलीस उपनिरीक्षक अरविंद शिंदे यांनी आपल्या स्टाफच्या मदतीने दिनांक २६/०९/२०२६ रोजी सकाळी ५:१५ वाजता आरोपींना संशयास्पदरीत्या हेरले आणि सकाळी ६:५० वाजण्याच्या सुमारास त्यांना दरोड्याच्या तयारीत असताना ताब्यात घेतले.
​अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे:
१. अब्दुल कादीर नुर मोहम्मद (वय २८ वर्षे, रा. गुलशेर नगर गल्ली नंबर ७, मालेगाव, नाशिक)
२. अब्दुल मालीक अब्दुल खालीक (वय २२ वर्षे, रा. गुलशेर नगर गल्ली नंबर १४, मालेगाव, नाशिक)
३. जीयाऊ रहेमान शौकत हुसेन (वय २६ वर्षे, रा. प्लॉट नंबर १२, स.नं. १०३/१, हीरा पुरा, जैतून अब्दूल कदीर मस्जिद, मालेगाव, नाशिक)
४. मोहम्मद अस्वद मोहम्मद अजमल (वय ३१ वर्षे, रा. सालेम मुनशी नगर, गल्ली नंबर २, सर्वे नंबर २१४, घर नंबर ८९, मालेगाव, नाशिक)
५. फैसल अजीज खान (वय २४ वर्षे, रा. प्लॉट नंबर ३३/४२, सर्वे नंबर १२०/२ अ, हिरापुरा, मालेगाव, जि. नाशिक)
६. हुजेफा अंजुम मोहमंद साजीद (वय ३० वर्षे, रा. घर नंबर २३४/२८८/२, रसूल्पुअर रविवार वार्ड, मालेगाव, ता. मालेगाव, जि. नाशिक)
७. जुबेर अहमद मुख्तार अहमद (वय ३५ वर्षे, रा. गल्ली नंबर ९, गुलशेर नगर, मालेगाव, ता. मालेगाव, जि. नाशिक)
८. अझर अहेमद अल्लाफ अहेमद मोमीन (वय ३० वर्षे, रा. गुलशर नगर, गल्ली नंबर २, मालेगाव, ता. मालेगाव, जि. नाशिक)
९. नावेद अख्तार शफीक अहमद अन्सारी (वय ३३ वर्षे, रा. गिरणारोड, हिरापुरा, प्लॉट नंबर ६०, मालेगाव, जि. नाशिक)
१०. अतहर अहमद एजाज अहमद (वय २३ वर्षे, रा. गल्ली नंबर ५, स.नं. १५९, प्लॉट नंबर १६, मुस्लीम नगर बी, मालेगाव, जि. नाशिक)
११. अतुल मारोती इंगळे (वय २४ वर्षे, रा. मु.पो. गिरोली मनोरा, वाशीम)
​हस्तगत करण्यात आलेला मुद्देमाल:
आरोपींच्या ताब्यातून एकूण ६३ नग वेगवेगळ्या कंपनीचे मोबाईल फोन, शेवरलेट कंपनीची क्रुझ कार, दोन सुऱ्या, कटर आणि लाल मिरची पावडर असा एकूण ३०,५७,०५०/- रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
​गुन्हा दाखल:
सदर आरोपींविरोधात शिवाजीनगर पोलीस स्टेशन येथे गु.र.नं. २५३/२०२६ नुसार भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलम ३९०(८), ३१०(२), ३०९(८), तसेच आर्म अॅक्ट कलम ४, २५ आणि महाराष्ट्र पोलीस कायद्याच्या कलम ३७(१)(३), १३५ अन्वये गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अरविंद शिंदे करीत आहेत.
​मार्गदर्शन आणि कामगिरी करणारे पथक:
सदरची ही यशस्वी कामगिरी पुणे शहरचे पोलीस आयुक्त अमितेशकुमार, पोलीस सह आयुक्त संजय दराडे, अपर पोलीस आयुक्त राजेश बनसोडे, पोलीस उपायुक्त (परिमंडळ १) ऋषिकेश रावले आणि साहाय्यक पोलीस आयुक्त (विश्रामबाग विभाग) श्रीमती अनुजा देशमाने यांच्या मार्गदर्शनाखाली
वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीशकुमार दिघावकर, पोलीस निरीक्षक (गुन्हे) अमर काळंगे, पोलीस उपनिरीक्षक अरविंद शिंदे, पोलीस उपनिरीक्षक मनिषा वलसे, सपोफौ प्रदिप खळदकर, आणि पोलीस अंमलदार गणेश चोबे, तेजस चोपडे, बिडे, वालकोळी, गणेश जाधवर, सावके, वाघ, बेडवाल, भोसले, चोपडे, येसणपुरे यांच्या पथकाने पार पाडली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

खेड तालुक्यातील वाडा येथील भांबुर्डेकर ज्वेलर्स दुकानात चोरी करणारे दोन आरोपी जेरबंद; १० गुन्हे...

पुणे (ग्रामीण): खेड तालुक्यातील वाडा येथील भांबुर्डेकर ज्वेलर्स दुकानात डल्ला मारणाऱ्या दोन सराईत आरोपींना स्थानिक गुन्हे शाखा व खेड पोलीस स्टेशनच्या पथकाने गजाड केले आहे....

औंध नगर आणि विद्यापीठ भागात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विजयादशमी उत्सव उत्साहात संपन्न;

औंध नगर आणि विद्यापीठ भागात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विजयादशमी उत्सव उत्साहात संपन्न; पुणे (शशिकांत पाटोळे) : औंध नगर आणि विद्यापीठ भागातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा वार्षिक...

बाणेरमध्ये जबरी चोरी करणाऱ्या पाच जणांच्या टोळीला पोलिसांकडून जेरबंद; सोन्याचे दागिने व रोकड हस्तगत

पुणे: पुण्यातील बाणेर परिसरात रात्रीच्या सुमारास नागरिकाला अडवून मारहाण करत सोन्याचे दागिने आणि ऑनलाईन पैसे जबरदस्तीने ट्रान्सफर करून लूटमार करणाऱ्या पाच जणांच्या टोळीला बाणेर पोलीस...

बोपोडीतील वादग्रस्त ‘अॅनिमल इन्सिनरेटर’ प्रकल्प: नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न आणि तीव्र रोष

पुणे महानगरपालिकेच्या (PMC) मनमानी कारभाराचा आणि नियोजनाचा फटका आता पुन्हा एकदा उपनगरांना बसू लागला आहे. बावधन येथील तीव्र विरोधामुळे रखडलेला मृत प्राण्यांच्या दहनाचा प्रकल्प...

“७ अनाधिकृत होर्डिंग्ज नक्की कोण वाचवत आहे.? तक्रारीनंतरही आकाशचिन्ह विभाग मौन की मूक पाठिंबा?”

पुणे:- पुणे शहरातील शेकडो अनधिकृत होर्डिंग्जचा विषय पुणे महानगरपालिकेसाठी तापदायक ठरत असतानाच, प्रशासनाकडून काही ठराविक प्रकरणांमध्ये कारवाईबाबत जाणीवपूर्वक मौन धारण करण्यात येत असल्याचे गंभीर प्रकार...

error: Content is protected !!