Homeताज्या बातम्याचोरीच्या गाड्या वापरून चेन स्नॅचिंग करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; आंबेगाव पोलिसांकडून दोन आरोपींना...

चोरीच्या गाड्या वापरून चेन स्नॅचिंग करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; आंबेगाव पोलिसांकडून दोन आरोपींना सासवडमधून अटक

पुणे:
चोरीच्या दुचाकी वाहनांचा वापर करून रत्यावर पायी चालणाऱ्या नागरिकांना लक्ष्य करणाऱ्या आणि जबरदस्तीने सोन्याचे दागिने हिसकावणाऱ्या दोन सराईत गुन्हेगारांना आंबेगाव पोलिसांनी अत्यंत शिताफीने जेरबंद केले आहे. आरोपींकडून गुन्ह्यात वापरलेल्या आणि चोरीच्या ३ दुचाकी तसेच १० ग्रॅम सोन्याचे दागिने असा एकूण २,४०,०००/- रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
​नेमकी घटना काय?
​दिनांक १३/०५/२०२६ रोजी रात्री ९:३० वाजेच्या सुमारास एक महिला फिर्यादी या आंबेगाव रोडने दत्तनगर येथून पायी आपल्या घराच्या दिशेने जात होत्या. त्या दरम्यान दत्तनगर चौकाकडून एका काळ्या रंगाच्या दुचाकीवरून दोन अनोळखी इसम आले. त्यांनी फिर्यादीच्या जवळ जाऊन त्यांच्या गळ्यातील ‘मिनी गंठण’ जबरदस्तीने हिसकावून घेतले आणि घटनास्थळावरून वेगाने पळून गेले. या धक्कादायक प्रकारानंतर फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरून आंबेगाव पोलीस ठाण्यात गु.र.नं. २०९/२०२६, भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ चे कलम ३०९ (४), ३ (५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
​२५० सीसीटीव्ही फुटेज आणि गोपनीय माहितीच्या आधारे कारवाई
​गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून आंबेगाव पोलीस स्टेशनच्या तपास पथकाने तात्काळ तपासाची चक्रे फिरवली. तपास पथकातील अंमलदारांनी परिसरातील तब्बल २०० ते २५० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज बारकाईने तपासून आरोपींची ओळख (निष्पन्न) पटवली.
​दरम्यान, सदर गुन्ह्यातील आरोपी हे सासवड परिसरात लपून बसले असल्याची ठोस गोपनीय माहिती तपास पथकाचे पोलीस अंमलदार धनाजी धोत्रे, सचिन गाडे, ज्ञानेश्वर चित्ते व प्रमोद भोसले यांना मिळाली. ही माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. शरद झिने यांच्या आदेशानुसार, पोलीस उपनिरीक्षक युवराज शिंदे आणि तपास पथकाचे अंमलदार सासवड परिसरात दाखल झाले. तिथे सापळा रचून दोन्ही आरोपींना अत्यंत शिताफीने ताब्यात घेण्यात आले.
​अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे:
​१) रोहित राजु माने (वय २० वर्षे, रा. सध्या मु.पो. खंडोबानगर झोपडपट्टी, सासवड पुणे. पूर्वीचा पत्ता: बाबर प्लॉटींगजवळ, दत्तमंदिरमागे, खोपडेनगर, भारतनगर, गुजर निंबाळकरवाडी, कात्रज पुणे. व्यवसाय: काही नाही).
२) ओमकार विकास नाईक (वय २२ वर्षे, रा. लक्ष्मी वजन काटयाजवळ, नवीन सकाळ प्रेसच्या शेजारी, संभाजीनगर, वडकी पुणे).
​पोलिसांनी त्यांची कसून चौकशी केली असता त्यांनी सदर गुन्ह्याची कबुली दिली. त्यानंतर त्यांना आंबेगाव पोलीस स्टेशन येथे आणून कायदेशीररीत्या अटक करण्यात आली. या आरोपींकडून चोरीच्या ३ दुचाकी व १० ग्रॅम सोने जप्त करण्यात आले असून, पुढील अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक युवराज शिंदे करीत आहेत.
​या पोलीस पथकाने केली कामगिरी:
​सदरची यशस्वी कामगिरी मा. अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग पुणे, श्री. राजेश बनसोडे, मा. पोलीस उपआयुक्त परिमंडळ-२ पुणे शहर, श्री. मिलींद मोहिते, मा. सहाय्यक पोलीस आयुक्त, स्वारगेट विभाग पुणे श्री. राहुल आवारे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
​तसेच, वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. शरद झिने, पोलीस निरीक्षक (गुन्हे) चांगदेव सजगणे यांच्या थेट सूचनांनुसार, पोलीस उपनिरीक्षक युवराज शिंदे यांच्यासह पोलीस अंमलदार चेतन गोरे, हणमंत मासाळ, हरिश गायकवाड, निलेश जमदाडे, धनाजी धोत्रे, सचिन गाडे, ज्ञानेश्वर चित्ते, प्रमोद भोसले, नितीन कातुर्डे, शिवाजी पाटोळे, फिरोज शेख, अजय कामठे, सुभाष मोरे, योगेश जगदाळे, राकेश टेकवडे आणि अवधूत जमदाडे यांच्या पथकाने ही कौतुकास्पद कारवाई केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

दरेगाव: मुगाच्या शेंगा तोडताना विषारी सर्पदंशाने शेतकरी महिलेचा मृत्यू; उपचारापूर्वीच प्राणज्योत मालवली

विशेष प्रतिनिधी / नायगाव नायगाव तालुक्यातील दरेगाव येथे शेतात मुगाच्या शेंगा तोडत असताना विषारी सर्पदंश झाल्यामुळे एका ४८ वर्षीय शेतकरी महिलेचा मृत्यू झाल्याची अत्यंत दुर्दैवी...

पावसाअभावी शेतकऱ्यांचे स्वप्न करपले; मराठवाड्यात तात्काळ कोरडा दुष्काळ जाहीर करा – खासदार रवींद्र चव्हाण...

पावसाअभावी शेतकऱ्यांचे स्वप्न करपले; मराठवाड्यात तात्काळ कोरडा दुष्काळ जाहीर करा - खासदार रवींद्र चव्हाण यांची मुख्यमंत्र्यांकडे आक्रमक मागणी मराठवाड्यात पावसाने पाठ फिरवल्यामुळे भीषण दुष्काळी परिस्थिती...

पुणे पोलिसांची मोठी कामगिरी: समर्थ पोलीस ठाण्यातर्फे १५ लाख रुपयांचे सोन्याचे दागिने जप्त; जळगावच्या...

​पुणे: पुणे शहरातील समर्थ पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडलेल्या चोरीच्या एका गंभीर गुन्ह्याचा यशस्वी उलगडा करण्यात समर्थ पोलीस ठाण्याच्या तपास पथकाला यश आले आहे. पोलिसांनी सराईत...

भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याची मोठी कारवाई: मागील सहा महिन्यांपासून पोलिसांना गुंगारा देणारा गांजा तस्करीतील...

पुणे: पुणे शहर पोलीस आयुक्तांच्या अंतर्गत येणाऱ्या भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत गांजा तस्करी करणाऱ्या आणि मागील तब्बल सहा महिन्यांपासून पोलिसांना सतत गुंगारा देणाऱ्या एका...

मुंढवा पोलीस स्टेशनची मोठी कारवाई: अटक दोन आरोपींकडून २ लाख २७ हजार रुपयांचे १४...

पुणे: पुणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या अंतर्गत येणाऱ्या मुंढवा पोलीस स्टेशनच्या तपास पथकातील अधिकारी व अंमलदारांनी कौशल्यपूर्ण तपास करून एका गुन्ह्यात महत्त्वाची कामगिरी केली आहे. मुंढवा...

error: Content is protected !!