Homeताज्या बातम्याजागतिक पर्यावरण दिनानिमित्त मोफत वृक्षवाटप; झाडांचे संगोपन करणाऱ्यांना बक्षीस

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त मोफत वृक्षवाटप; झाडांचे संगोपन करणाऱ्यांना बक्षीस

पुणे, विश्रांतवाडी (प्रतिनिधी): जागतिक पर्यावरण दिनानिमित्त ५ जून २०२६ रोजी मुकुंदराव आंबेडकर चौक, विश्रांतवाडी येथे पर्यावरण संरक्षण बहुउद्देशीय संस्था, महाराष्ट्र यांच्या वतीने “झाडे लावा, झाडे जगवा” जनजागृती अभियान राबविण्यात आले. यावेळी नागरिकांना मोफत वृक्षांचे वाटप करण्यात आले. तसेच दिलेल्या वृक्षाचे एक वर्ष संगोपन करणाऱ्या नागरिकांना बक्षीस देण्यात येणार असल्याची घोषणा संस्थेचे संस्थापक राहुल बनसोडे यांनी केली.
कार्यक्रमाला पॅंथर सेनेचे सामाजिक कार्यकर्ते व संस्थापक अध्यक्ष सचिन भोसले प्रमुख उपस्थित होते. यावेळी बोलताना त्यांनी पर्यावरण संवर्धनाच्या विषयावर तीव्र चिंता व्यक्त केली.
सचिन भोसले म्हणाले की, “झाडे लावा, झाडे जगवा” अशा घोषणा ट्रक, बस तसेच विविध शासकीय मोहिमांमध्ये दिसतात. पुणे महानगरपालिका देखील अशा घोषणा करते, मात्र झाडांच्या संगोपनाकडे दुर्लक्ष होत आहे. काही वर्षांपूर्वी पुण्याचे हवामान आल्हाददायक व संतुलित होते. मात्र वाढते शहरीकरण आणि मोठ्या प्रमाणात होणारी वृक्षतोड यामुळे शहराचे तापमान वाढत आहे.
त्यांनी आरोप केला की, नदी सुधार प्रकल्प (RFD) तसेच इतर विकासकामांमुळे हजारो झाडांची कत्तल करण्यात आली आहे. मागील चार ते पाच वर्षांत पुणे शहरात सुमारे दहा हजार झाडे तोडण्यात आल्याने प्रदूषण वाढले असून हवामान बदलाचे गंभीर परिणाम नागरिकांना भोगावे लागत आहेत. याचा सर्वाधिक फटका लहान मुलांच्या भविष्यास बसणार असल्याचे त्यांनी सांगितले.
प्लास्टिक प्रदूषणावर भाष्य करताना त्यांनी प्लास्टिक पिशव्यांना पर्याय म्हणून कापडी पिशव्यांचा वापर वाढविण्याचे आवाहन केले. कोविड-१९ काळात नागरिकांना ऑक्सिजनसाठी मोठी किंमत मोजावी लागली होती. त्यावेळी झाडांचे महत्त्व सर्वांना समजले. झाडे नागरिकांना मोफत ऑक्सिजन देतात, मात्र त्यांचे संवर्धन करण्याकडे दुर्लक्ष होत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.
प्रत्येक नागरिकाने किमान एक झाड लावून त्याचे संगोपन करावे आणि संस्थेच्या वृक्षसंवर्धन स्पर्धेत सहभागी व्हावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
कार्यक्रमास परिसरातील नागरिक, पर्यावरणप्रेमी आणि सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

राज्य मोठ्या प्रमाणात डिझेल वापरकर्त्यांना थेट OMCs कडून खरेदी करण्यास सांगतो, किरकोळ पंप नाही....

इंधन केंद्रांसाठी, वाहनांना प्रथम प्राधान्य दिले जाते पुणे : शुक्रवारी जारी केलेल्या राज्य सरकारच्या परिपत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे की मोठ्या प्रमाणात इंधनाची...

गारपिटीमुळे पुणे जिल्ह्यातील १०० हेक्टरवरील फळबागा भुईसपाट झाल्या. पुणे बातम्या

पुण्यातील पिकांचे नुकसान झालेल्या भागाची अधिकारी पाहणी करतात पुणे : गेल्या काही दिवसांपासून जोरदार वारे, गारपीट आणि मान्सूनपूर्व पावसामुळे फळ पिकांचे मोठ्या प्रमाणात...

कारच्या धडकेत पेंटिंग कामगाराचा मृत्यू. पुणे बातम्या

पुणे : एका 48 वर्षीय पेंटिंग कामगाराचा त्याच्यावर उलटणारी कार गेल्याने मृत्यू झाला. बुधवारी सायंकाळी आंबेगाव येथील दत्तनगर येथे पीडित महिला कारच्या...

डिसेंबरपर्यंत ७०% फ्लीट टेक स्नॅग-मुक्त होईल: MSRTC | पुणे बातम्या

पुण्यातील स्वारगेट बस स्थानकावर एमएसआरटीसीच्या बसेस पुणे : नवीन बसेसचा समावेश आणि जुनी वाहने स्क्रॅप केल्याने MSRTC च्या कार्यक्षमतेत लक्षणीय सुधारणा होईल, असे...

LPG सिलिंडरच्या स्फोटात 35 वर्षीय वृद्धाचा मृत्यू, पुण्याच्या वाघोलीमध्ये वृद्ध आई-वडिलांचा मृत्यू | पुणे...

पांडुरंग स्वयंपाकघरात रिकामा एलपीजी सिलेंडर बदलत होता. प्रक्रियेदरम्यान गॅसची गळती होऊन सिलिंडरचा स्फोट झाला असावा असा अग्निशमन अधिकाऱ्यांना संशय आहे.खांडवेनगर येथील गित्ते यांच्या...

error: Content is protected !!