Homeताज्या बातम्याथेऊरच्या अजय विजय वाघमारे यांची व्हिएतनाममधील आंतरराष्ट्रीय नृत्य स्पर्धेसाठी निवड

थेऊरच्या अजय विजय वाघमारे यांची व्हिएतनाममधील आंतरराष्ट्रीय नृत्य स्पर्धेसाठी निवड

थेऊर, प्रतिनिधी :
थेऊर येथील युवा कलाकार अजय विजय वाघमारे यांनी कला क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन करत खुल्या गटातील नृत्य स्पर्धेत तृतीय क्रमांक तर एकपात्री अभिनय स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकावला आहे. त्यांच्या या उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर त्यांची व्हिएतनाम येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय नृत्य स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

अजय यांना नृत्य क्षेत्रात नटराज डान्स अकादमीचे प्रमुख सुयश सुरवसे यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच एकपात्री अभिनयासाठी संध्यादीप, पुणे येथील संदीप पंडित सर यांनी विशेष प्रशिक्षण व मार्गदर्शन केले. त्यांच्या मार्गदर्शनामुळे अजय यांनी राज्यस्तरीय व्यासपीठावर उल्लेखनीय यश मिळविले.

ही स्पर्धा अखिल लोककला कल्चरल ऑर्गनायझेशन यांच्या वतीने आयोजित करण्यात आली होती. संस्थेचे सचिव डॉ. प्रमोद ननावरे गेल्या दहा वर्षांपासून या स्पर्धेचे यशस्वी आयोजन करत आहेत. पाच दिवस चालणाऱ्या या स्पर्धेत देशाच्या कानाकोपऱ्यातील हजारो कलाकार सहभागी होतात. नृत्य, नाटक, संगीत, गायन यांसारख्या विविध कलांचा संगम या व्यासपीठावर अनुभवायला मिळतो.

स्पर्धेचा भव्य बक्षीस वितरण समारंभ कोथरूड येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृह येथे उत्साहात पार पडला. यावेळी इंडियाज बेस्ट डान्सर पर्व ३ चे विजेते समर्पण लामा यांची प्रमुख उपस्थिती होती.

अजय वाघमारे यांच्या या यशाबद्दल संध्यादीप परिवारासह सर्व स्पर्धकांनी त्यांचे अभिनंदन केले असून, व्हिएतनाम येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. थेऊर परिसरातूनही त्यांच्या यशाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

दुबई कनेक्शनसह ऑनलाइन गेमिंग घोटाळ्याचा पोलिसांनी पर्दाफाश केला; पिस्तूल, काडतुसे जप्त. पुणे बातम्या

पुणे : हडपसर आणि मुंढवा पोलिसांनी संयुक्त कारवाईत हडपसर, फुरसुंगी आणि भेकराईनगर येथील चार ठिकाणी छापे टाकले आणि कॉल सेंटर्सद्वारे चालवल्या जाणाऱ्या...

सहकाऱ्याच्या आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या तीन आरोपींमध्ये हिंजवडी आयटी फर्मच्या दोन महिला अधिकाऱ्यांचा समावेश आहे....

कंपनीने शुक्रवारी एका निवेदनात म्हटले आहे की त्यांनी दोन कर्मचाऱ्यांवरील आरोपांची दखल घेतली आहे आणि तथ्ये तपासत आहेत. पुणे : भोसरी पोलिसांनी हिंजवडी...

आळंदीजवळ जमीन विकासकाची ४ लाख रुपयांची सोनसाखळी लुटली | पुणे बातम्या

पुणे : दोन अज्ञातांनी 50 वर्षीय जमीन विकासकाला धारदार शस्त्राने जखमी करून मंगळवारी रात्री उशिरा चार लाख रुपये किमतीची सोनसाखळी लुटून नेली.आळंदीजवळील...

वाडेबोल्हाई रोड अपघातात 14 वर्षीय मुलीचा मृत्यू | पुणे बातम्या

पुणे : बुधवारी दुपारी वाडेबोल्हाई येथील वाडेगाव रोडवर पिकअप ट्रकने मोटरसायकलला धडक दिल्याने दहावीच्या विद्यार्थिनीचा मृत्यू झाला तर तिची मैत्रिण किरकोळ जखमी...

पुण्यात बनावट कॉल सेंटरवर पोलिसांचा मोठा छापा; बेकायदेशीर ऑनलाईन गेमिंगद्वारे लाखो रुपयांची फसवणूक करणारे...

पिस्तूल व सहा जिवंत कारतूस जप्त; ३ ठिकाणांवर १८ तास छापेमारी करून १२० कर्मचाऱ्यांचा गैरप्रकार उघड ​पुणे (प्रतिनिधी): पुणे शहरातील हडपसर आणि फुरसुंगी भागातील नामांकित मॉल...

error: Content is protected !!