Homeताज्या बातम्यापुणे शहर गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथक १ ची धडक कारवाई:...

पुणे शहर गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथक १ ची धडक कारवाई: मेफेड्रॉन बाळगणारा इसम जेरबंद

पुणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथक १ ने ड्रग्स तस्करांविरोधात मोठी कारवाई करत मेफेड्रॉन (एम.डी.) हा अंमली पदार्थाचा साठा विक्रीसाठी बाळगणाऱ्या एका इसमास जेरबंद केले आहे.
​पुणे शहरात वाढत्या अंमली पदार्थांच्या तस्करीला आळा घालण्यासाठी गुन्हे शाखेचे पथक सातत्याने पेट्रोलिंग करत असते. दिनांक २८/०८/२०२६ रोजी अंमली पदार्थ विरोधी पथक १ कडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीमती तृप्ती सोनवणे व त्यांचे पथक हद्दीत गस्त घाालत असताना, पोलीस अंमलदार तुषार साळुंखे यांना गुप्त बातमीदारामार्फत एक अत्यंत महत्त्वाची माहिती मिळाली. आसिफ अब्दुल शेख (वय २६ वर्षे, रा. काशेवाडी, भवानी पेठ, पुणे) हा इसम विक्रीच्या उद्देशाने मेफेड्रॉन (एम.डी.) हा अंमली पदार्थ घेऊन परिसरात येणार असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली.
​ही माहिती मिळताच वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी तातडीने कारवाईची दिशा ठरवली. त्यानुसार, दिनांक २७/०८/२०२६ रोजी रात्री २०:०० वाजल्यापासून ते दिनांक २८/०८/२०२६ रोजी पहाटेपर्यंत टाटा टेलिबिझनेस सर्व्हिसेस इमारतीसमोर, आंबेडकर रोड, संचेती चौक, शिवाजीनगर, पुणे या ठिकाणी पोलिसांनी सापळा रचला. ठरलेल्या वेळेनुसार आरोपी आसिफ अब्दुल शेख हा सुझुकी स्कुटरवरून त्या ठिकाणी आला असता, पोलिसांनी पहाटे ०५:२७ वाजता अत्यंत शिताफीने व कौशल्याने त्यास ताब्यात घेतले.
​आरोपीची झडती घेतली असता त्याच्याकडून विक्रीसाठी आणलेला अंदाजे २७,६६०/- रुपये किंमतीचा ०९.२२ मिलीग्रॅम मेफेड्रॉन (एम.डी.) हा अंमली पदार्थ जप्त करण्यात आला. याशिवाय, गुन्ह्यासाठी वापरलेली सुझुकी कंपनीची बर्गमॅन मॉडेलची स्कुटर आणि विवो कंपनीचा मोबाईल फोन असा एकूण १,५२,६६०/- रुपये किंमतीचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे. या प्रकरणी आरोपीविरुद्ध शिवाजीनगर पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंद क्रमांक २३५/२०२६ अन्वये एन.डी.पी.एस. अॅक्ट कलम ८(क), २२ (ब), २९ प्रमाणे कायदेशीर कारवाई करत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
​सदर धडक कारवाई अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) श्रीमती तेजस्वी सातपुते, पोलीस उप आयुक्त (गुन्हे) श्री. हसन गौहर व सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे-३) श्री. शंकर खटके यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. यामध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीमती तृप्ती सोनवणे यांच्या सूचनांनुसार पोलीस उपनिरीक्षक योगेश कोतकर, सहायक पोलीस फौजदार विठ्ठल साळुंखे, तसेच पोलीस अंमलदार मद्देल क्षीरसागर, साळुंखे, सरडे, राजे व अक्षय शिर्के यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. पुणे पोलिसांच्या या कारवाईमुळे ड्रग्स तस्करांचे धाबे दणाणले आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

खराडी पोलिसांची धडक कारवाई: वाहन चोरीचे ५ गुन्हे उघड; सराईत आरोपी अटकेत

पुणे: पुणे शहरातील वाहन चोरीच्या वाढत्या घटनांना आळा घालण्यासाठी पुणे पोलिसांच्या पथकाने अत्यंत महत्त्वाची कामगिरी बजावली आहे. खराडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडलेल्या वाहन चोरीच्या गुन्ह्याचा...

धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त बोपोडी येथे धम्मदीक्षा अनुकरण सोहळा उत्साहात संपन्न; भीमअनुयायांच्या उपस्थितीने परिसर धम्ममय!

धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त बोपोडी येथे धम्मदीक्षा अनुकरण सोहळा उत्साहात संपन्न; भीमअनुयायांच्या उपस्थितीने परिसर धम्ममय! पुणे (शशिकांत पाटोळे) : महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ऐतिहासिक...

खेड तालुक्यातील वाडा येथील भांबुर्डेकर ज्वेलर्स दुकानात चोरी करणारे दोन आरोपी जेरबंद; १० गुन्हे...

पुणे (ग्रामीण): खेड तालुक्यातील वाडा येथील भांबुर्डेकर ज्वेलर्स दुकानात डल्ला मारणाऱ्या दोन सराईत आरोपींना स्थानिक गुन्हे शाखा व खेड पोलीस स्टेशनच्या पथकाने गजाड केले आहे....

औंध नगर आणि विद्यापीठ भागात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विजयादशमी उत्सव उत्साहात संपन्न;

औंध नगर आणि विद्यापीठ भागात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विजयादशमी उत्सव उत्साहात संपन्न; पुणे (शशिकांत पाटोळे) : औंध नगर आणि विद्यापीठ भागातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा वार्षिक...

बाणेरमध्ये जबरी चोरी करणाऱ्या पाच जणांच्या टोळीला पोलिसांकडून जेरबंद; सोन्याचे दागिने व रोकड हस्तगत

पुणे: पुण्यातील बाणेर परिसरात रात्रीच्या सुमारास नागरिकाला अडवून मारहाण करत सोन्याचे दागिने आणि ऑनलाईन पैसे जबरदस्तीने ट्रान्सफर करून लूटमार करणाऱ्या पाच जणांच्या टोळीला बाणेर पोलीस...

error: Content is protected !!