Homeताज्या बातम्यापुणे शहरात मुलींसाठी मोफत HPV लसीकरण मोहिमेचा शुभारंभ

पुणे शहरात मुलींसाठी मोफत HPV लसीकरण मोहिमेचा शुभारंभ

पुणे | प्रतिनिधी
दिनांक २ मार्च २०२६ रोजी पुणे महानगरपालिका तर्फे कर्करोग प्रतिबंधासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले. मा. महापौर श्रीमती मंजुषा नागपुरे यांच्या शुभहस्ते आणि मा. अतिरिक्त महापालिका आयुक्त (ज) श्रीमती पवनीत कौर यांच्या प्रमुख उपस्थितीत शरदचंदजी पवार अकॅडमी ऑफ ई लर्निंग, सिंहगड रोड, वडगाव बुद्रुक येथे विशेष HPV (सर्व्हायकल कॅन्सर प्रतिबंधक) लसीकरण कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.
९ ते १३ वयोगटातील मुलींना मोफत लस
पुणे महानगरपालिका आणि जीविका फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने पुणे शहरातील ९ ते १३ वयोगटातील मुलींना सर्व्हायकल कॅन्सर प्रतिबंधक लसीची एक मात्रा पूर्णतः मोफत देण्यात येणार आहे. यासाठी दोन्ही संस्थांदरम्यान करारनामा करण्यात आला असून, सदर लस सामाजिक दायित्व योजना (CSR) अंतर्गत उपलब्ध करून दिली जाणार आहे.
गर्भाशय मुखाच्या कर्करोगाविरुद्ध संरक्षण कवच
या उपक्रमाबाबत बोलताना मान्यवरांनी सांगितले की,
“राष्ट्रीय मिशनला पूरक आणि अधिक बळकटी देण्यासाठी पुणे महानगरपालिका, जीविका फाउंडेशन आणि CSR भागीदार यांच्या सहकार्याने आम्ही एक पाऊल पुढे टाकत आहोत. मोफत HPV लसीकरणामुळे ९ ते १३ वयोगटातील सर्व मुलींना सर्वसमावेशक संरक्षण मिळेल आणि पुणे शहरात गर्भाशय मुखाच्या कर्करोगाविरुद्ध मजबूत संरक्षण कवच उभे राहील. हा उपक्रम मुलींच्या आरोग्याचे आणि त्यांच्या उज्ज्वल भविष्याचे रक्षण करणारे ऐतिहासिक पाऊल आहे.”
मान्यवरांची उपस्थिती
कार्यक्रमास मा. उपमहापौर श्री. परशुराम वाडेकर, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षनेते श्री. सोपान चव्हाण, शहर सुधारणा समिती अध्यक्षा श्रीमती स्मिता वस्ते, महिला व बालकल्याण समिती अध्यक्षा श्रीमती अल्पना वर्षे, नाव समिती अध्यक्षा श्रीमती पल्लवी जावळे, शिक्षण समिती अध्यक्ष श्री. अरुण राजवाडे, स्थानिक नगरसेविका मा. ज्योती गोसावी, स्थानिक नगरसेवक मा. सचिन मोरे, तसेच मा. श्रीकांत जगताप आदी मान्यवर उपस्थित होते.
दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाचे प्रायोगिक तत्वावर उद्घाटन करण्यात आले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

‘फक्त एक सिग्नल नाही’: लोहगडच्या कड्यावर केतनच्या शेवटच्या पोहोचण्यापासून सिया गोयलचे संरक्षण करण्यासाठी पोलिसांनी...

सिया गोयल (20) आणि चेतन चौधरी (22) यांना 18 जून रोजी पुणे जिल्ह्यातील लोहगड किल्ल्यावरील 25 वर्षीय केतन अग्रवालला ठार मारण्याचा कट रचल्याप्रकरणी...

केतन अग्रवाल हत्या प्रकरणातील आरोपी सिया गोयल, चेतन चौधरी यांना ३ जुलैपर्यंत पोलीस कोठडी...

आरोपी सिया आणि चेतन यांना ३ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पुणे : व्यापारी केतन अग्रवाल यांच्या हत्येप्रकरणी आरोपी सिया गोयल आणि...

पुणे पोलिसांची मोठी कारवाई: ‘मोका’ गुन्ह्यातील ६ महिन्यांपासून फरार असलेल्या दोन अट्टल आरोपींना गुन्हे...

​पुणे, दिनांक २९ जून २०२६: पुणे शहरातील संघटित गुन्हेगारीला वेसण घालण्यासाठी पुणे शहर पोलीस दलाने एक मोठी यशस्वी कारवाई केली आहे. कोंढवा बुद्रुक-येवलेवाडी पोलीस स्टेशनमध्ये...

केतन अग्रवाल खून प्रकरण: चेतन चौधरी स्कूटरवरून लोहगड किल्ल्यापर्यंत ९० किमी चालला – त्याने...

तपासकर्त्यांच्या म्हणण्यानुसार, चेतन (एल) यांनी 18 जून रोजी पुण्याहून प्रवासासाठी जाणूनबुजून स्कूटर निवडली कारण त्याला टोल प्लाझा रेकॉर्डवरून कार सापडण्याची भीती होती. पुणे:...

3 वर्षीय मुलीवर बलात्कार आणि खून केल्याप्रकरणी 65 वर्षीय वृद्धाला पुण्यातील न्यायालयाने फाशीची शिक्षा...

सर्वोच्च न्यायालयाने परिभाषित केल्यानुसार हे प्रकरण "दुर्मिळातील दुर्मिळ" श्रेणीत येते, असे न्यायालयाने नमूद केले. पुणे - भोर तालुक्यातील नसरापूर गावात 1 मे रोजी...

error: Content is protected !!