Homeक्राईमबनावट नोटा छापणा-या टोळीचा शिवाजीनगर पोलीस स्टेशनकडील सायबर पथकाकडुन पर्दाफाश. मोठ्या प्रमाणात...

बनावट नोटा छापणा-या टोळीचा शिवाजीनगर पोलीस स्टेशनकडील सायबर पथकाकडुन पर्दाफाश. मोठ्या प्रमाणात बनावट नोटा व नोटा छापण्याचे साहित्य जप्त.

बनावट नोटा छापणा-या टोळीचा शिवाजीनगर पोलीस स्टेशनकडील सायबर पथकाकडुन पर्दाफाश. मोठ्या प्रमाणात बनावट नोटा व नोटा छापण्याचे साहित्य जप्त.

पुणे:: शिवाजीनगर पोलीस स्टेशन पुणे शहर येथे दि १७/०४/२०२५ रोजी कोटक महिंद्रा बँकेंचे मनेजर यांनी फिर्याद दिली की, त्याचे बँकेचे सीडीएम मशिन मध्ये २०० रूपये दराच्या ५५ बनावट नोटा जमा करण्यात आले आहेत. अशा फिर्याद वरून शिवाजीनगर पोलीस स्टेशन येथे गु.र. नं. ५९/२०२५ भा.न्या.स कलम १७८, १७९, १८० नुसार गुन्हा दाखल करण्यात आला सदरचा गुन्हा दाखल होताच पोलीस तपास पथक गठीत करून त्वरीत तांत्रिक विश्लेषण कले. आरोपीताचा शोध घेवून आरोपी नामे मनिषा स्वप्निल ठाणेकर, नागपुर चाळ, येरवडा, पुणे, भारती तानाजी गवंडरा मोर्या गोसावी, राजपाल सी १०, केशवनगर, चिचवड, सचिन रामचंद्र यमगर, वय ३५, रा गहुंजे, पुणे, यांना दिं- १८/०४/२०२५ रोजी अटक करण्यात आले. अटक आरोपीताकडे कसून तपास केला असता नमुद आरोपीतांनी सदरच्या नोटा कोल्हे नावाच्या व्यक्तीकडून प्राप्त केले असल्याचे समजले. कोल्हे नावाच्या इसमाबाबत अधिक माहिती प्राप्त केले असता त्याचे नाव नरेश भिमप्पा शेटटी रा लोहगाव, पुणे असे असल्याचे निष्पन्न झाले असता सदर इसमाचे घरी छापा टाकला असता त्याचे घरामध्ये २००/- रुपये दराचे बनावट नोटांचे २० बंडल ज्याचे बजारातील मुल्य ४,००,०००/- रुपये, ख-या नोटा २,०४,०००/- रुपये, नोटा छापण्याचे प्रिटंर, ५००/- रुपये दराच्या ए४ साईजचे १.११६ कागदांवर प्रत्येक कागदावर ४ नोटा या प्रमाणे एकुण २,२३२ प्रिंट केलेल्या नोटा ज्याचे बाजाराती मुल्य २२,३२,०००/- रुपये, नोटा प्रिंट करण्यास वापरण्यात येणारी शाई, नोटा छापण्याचे कोरे कागद व इतर साहित्य तसेच नमुद आरोपीचे कार क्रं एमएच १२ डब्ल्यु के ३७६१ मधुन बनावट २००/- दाराच्या ६४८ नोटा व तसेच ५०० रुपये ३ बनावट नोटा ज्यांची बाजारातील किंमत १,३९,१००/- रुपये जप्त केले.

या गुन्हयातील इतर आरोपी नामे भारती गवंड यांच्या कडून २००/- रुपये दराच्या ६०,०००/- रुपये किंमतीच्या नोटा आरोपी मनिषा ठाणेकर (पाटील) यांचे कडून बनावट २००/- दराच्या २०,०००/- रुपयांच्या नोटा, सचिन यमगर यांचे कडुन २००/- दराच्या २०,०००/- रुपयांच्या नोटा, असे साहित्य जप्त केले. आरोपी नामे नरेश शेटटी यांचे अधिक तपास केले असता सदर गुन्हयामध्ये त्यास आरोपी प्रभू गुगलजेडडी याने मदत केली असल्याचे तांत्रिक विश्लेषनावरून त्यास देखिल अटक करण्यात आली. सदर आरोपी कडून २००/- दराच्या ३,०००/- रुपये किंमतीच्या बनावट नोटा जप्त करण्यात आलेले आहे. सदर गुन्हयातील सर्व आरोपीतांचा दि-२९/०४/२०२५ पर्यंत पोलीस कोठडी रिंमाड घेण्यात आले असून आज पर्यंत गुन्हयातील सर्व आरोपीताकडून एकुण २८,६६,१००/- रुपयांचे २०० व ५०० रुपयांचे बनावट नोटा व २,०४,०००/- रुपर्याच्या ख-या नोटा व इतर साहित्य गुन्हयात वापरलेल्या कारसह जप्त करण्यात आले आहे. गुन्हयातील नोटा छापण्यास वापरण्यात आलेले लॅपटॉपमालक व तसेच इतर आरोपीतांचे नावे निष्पन्न झाले असून त्यांचा कसोशीने शोध सुरू आहे.

सदरची कामगिरी मा.पोलीस आयुक्त सो, श्री. अमितेशकुमार, मा. सह पोलीस आयुक्त सो, श्री. रंजन कुमार शर्मा, मा. अपर पोलीस आयुक्त सो, पश्चिम प्रादेशिक विभाग, श्री. प्रविण पाटील, मा. पोलीस उप-आयुक्त सो, परिमंडळ-१, श्री. संदिपसिंह गिल्ल, मा. सहा पोलीस आयुक्त सो, श्री. साईनाथ ठोंबरे, विश्रामबाग विभाग यांचे मार्गदर्शनाखाली, मा. बरिष्ठ पोलीस निरीक्षक, महेश बोळकोटगी, मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रशेखर सावंत, पोलीस निरीक्षक (गुन्हे), श्री. चंद्रकांत सुर्यवंशी, सहा पोलीस निरीक्षक के बी डाबेराव, पोलीस उपनिरीक्षक अजित बडे, पोलीस अंमलदार नलिनी क्षिरसागर, आदेश चलवादी, तेजस चोपडे, गणेश जाधवर, श्रीकृष्ण सांगवे, प्रविण दडस, रुचिका जमदाडे, स्वालेहा शेख (एटीसी) यांनी केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

नांदेडमध्ये 4,796 धारदार शस्त्रे जप्त, पोलीस म्हणतात महाराष्ट्रातील एक दिवसीय शस्त्रसाठा | पुणे बातम्या

छत्रपती संभाजीनगर : नांदेड ग्रामीण पोलिसांनी बुधवारी मध्यरात्री सुमारे 24 तास चाललेल्या छाप्यात तलवारी, खंजीर, गुप्ती आणि चाकू यासह 4,796 धारदार शस्त्रे जप्त केली.पोलिसांनी...

पश्चिम बंगालचे मतदान, लग्नाच्या हंगामामुळे पुण्यातील रेस्टॉरंट्स, उद्योगांमध्ये कामगारांची गर्दी | पुणे बातम्या

पुणे: पश्चिम बंगाल आणि उत्तर भारतीय राज्यांमधून मोठ्या संख्येने स्थलांतरित कामगार त्यांच्या गावी परतल्यामुळे शहरातील रेस्टॉरंट्स आणि विविध उद्योगांना मोठ्या प्रमाणात मजुरांच्या तुटवड्याचा सामना...

अष्टविनायक : भाविकांसाठी मोठी बातमी! थेऊर, मोरगाव आणि सिद्धटेकची मंदिरे महिनाभर दर्शनासाठी बंद

बापू सोनवणे कार्यकारी संपादक लोणी काळभोर, ता. ८: संपूर्ण महाराष्ट्राचे श्रद्धास्थान असलेल्या अष्टविनायक यात्रेतील तीन प्रमुख गणपती मंदिरांबाबत मोठा आणि ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला आहे....

रवी पंडित यांचे निधन: KPIT टेक्नॉलॉजीचे सहसंस्थापक आणि अध्यक्ष रवी पंडित यांचे वयाच्या ७५...

पुणे: मोबिलिटी टेक्नॉलॉजी फर्म केपीआयटी टेक्नॉलॉजीजचे सह-संस्थापक आणि अध्यक्ष आणि उद्योगातील प्रमुख नेते रवी पंडित यांचे शुक्रवारी सकाळी अल्पशा आजाराने निधन झाले,...

सुनेत्रा पवार यांच्या जागी राज्यसभेत कोण? बारामतीच्या विजयानंतर राष्ट्रवादी काँग्रेस (एसपी) छगन भुजबळ, जय...

बारामती विधानसभेची पोटनिवडणूक २.१८ लाखांपेक्षा जास्त मतांनी जिंकल्यानंतर सुनेत्रा पवार यांनी बुधवारी सभागृहाचा राजीनामा दिला. नवी दिल्ली: बारामती पोटनिवडणुकीत विजय मिळविल्यानंतर महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री...

error: Content is protected !!