Homeताज्या बातम्याभारती विद्यापीठ पोलिसांची मोठी कारवाई: तीन गावठी कट्टे व चार जिवंत काडतुसांसह...

भारती विद्यापीठ पोलिसांची मोठी कारवाई: तीन गावठी कट्टे व चार जिवंत काडतुसांसह दोन सराईत गुन्हेगार जेरबंद

पुणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन हद्दीत पोलिसांनी धडक कारवाई करत तीन गावठी बनावटीचे कट्टे आणि चार जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. या प्रकरणी दोन वेगवेगळ्या कारवायांमध्ये रेकॉर्डवरील गुन्हेगारांना अटक करण्यात आली आहे.
​पहिली कारवाई दिनांक २६/०८/२०२६ रोजी करण्यात आली. भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलींग करीत असताना, साई सिध्दी चौक ते चिंतामणी ज्ञानपीठ दरम्यानच्या श्री कोचिंग क्लासेसच्या समोरील गल्लीमध्ये पोलीस उप-निरीक्षक रवि जाधव, पोलीस अंमलदार मितेश चोरमले, सागर बोरगे व अभिनय चौधरी यांना एक संशयित तरुण आढळला. पोलिसांनी त्याची झडती घेतली असता, ओंकार उर्फ बब्या संतोष पवार (वय १८ वर्षे, रा. तापकीर चाळ, साई सिध्दी चौकाजवळ, शिवशंभे गल्ली क्र.२, आंबेगाव पठार, पुणे) याच्या ताब्यात १ गावठी बनावटीचा कट्टा व २ जिवंत काडतुसे मिळून आली. त्याच्याकडून शस्त्रे जप्त करून भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन येथे गु.र.नं. ४४१/२०२६ आर्म अॅक्ट ३(२५), सी. म.पो.अधि.कलम ३७(१)(३) सह १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
​दुसरी कारवाई दिनांक २७/०८/२०२६ रोजी करण्यात आली. तपास पथकाचे पोलीस उप-निरीक्षक निलेश मोकाशी, मितेश चोरमले, सागर बोरगे व अभिनय चौधरी यांना मिळालेल्या गोपनीय बातमीनुसार, कात्रज डेअरी ते सरहद्द चौक दरम्यान कात्रज डेअरीच्या भिंतीजवळ एक इसम अग्निशस्त्रासह थांबल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी त्या ठिकाणी सापळा रचून शिरीष जितेंद्र खोपडे (वय २६ वर्षे, रा. श्री गणेश निवास, स.नं. ३२/१०, आंबेगाव पठार, पुणे) याला ताब्यात घेतले. त्याच्या झडतीत २ गावठी बनावटीचे कट्टे व २ जिवंत काडतुसे मिळून आल्याने ती जप्त करण्यात आली. त्याच्याविरुद्ध भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन येथे गु.र.नं. ४४४/२०२६ आर्म अॅक्ट ३(२५), सी. म.पो.अधि.कलम ३७(१)(३) सह १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे दोन्ही आरोपी रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार आहेत.
​ही धडक कारवाई अपर पोलीस आयुक्त (पश्चिम प्रादेशिक विभाग, पुणे शहर) श्री. राजेश बनसोडे, पोलीस उपायुक्त (परिमंडळ २, पुणे शहर) श्री. मिलिंद मोहिते, आणि सहायक पोलीस आयुक्त (भारती विद्यापीठ विभाग, पुणे शहर) श्री. राहुल आवारे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. तसेच भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. सुदर्शन गायकवाड व पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्री. संतोष जाधव यांच्या सूचनांनुसार पोलीस उप-निरीक्षक निलेश मोकाशी, पोलीस उप-निरीक्षक रवि जाधव, पोलीस अंमलदार मितेश चोरमले, सागर बोरगे, अभिनय चौधरी, सचिन सरपाले, मंगेश पवार, निलेश खैरमोडे, सोहम शेंडकर, तुकाराम सुतार, संदिप आगळे, मंगेश गायकवाड, किरण साबळे, मल्लीकार्जुन कोळी, आणि कृष्णा म्हस्के यांच्या पथकाने ही कामगिरी केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

खराडी पोलिसांची धडक कारवाई: वाहन चोरीचे ५ गुन्हे उघड; सराईत आरोपी अटकेत

पुणे: पुणे शहरातील वाहन चोरीच्या वाढत्या घटनांना आळा घालण्यासाठी पुणे पोलिसांच्या पथकाने अत्यंत महत्त्वाची कामगिरी बजावली आहे. खराडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडलेल्या वाहन चोरीच्या गुन्ह्याचा...

धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त बोपोडी येथे धम्मदीक्षा अनुकरण सोहळा उत्साहात संपन्न; भीमअनुयायांच्या उपस्थितीने परिसर धम्ममय!

धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त बोपोडी येथे धम्मदीक्षा अनुकरण सोहळा उत्साहात संपन्न; भीमअनुयायांच्या उपस्थितीने परिसर धम्ममय! पुणे (शशिकांत पाटोळे) : महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ऐतिहासिक...

खेड तालुक्यातील वाडा येथील भांबुर्डेकर ज्वेलर्स दुकानात चोरी करणारे दोन आरोपी जेरबंद; १० गुन्हे...

पुणे (ग्रामीण): खेड तालुक्यातील वाडा येथील भांबुर्डेकर ज्वेलर्स दुकानात डल्ला मारणाऱ्या दोन सराईत आरोपींना स्थानिक गुन्हे शाखा व खेड पोलीस स्टेशनच्या पथकाने गजाड केले आहे....

औंध नगर आणि विद्यापीठ भागात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विजयादशमी उत्सव उत्साहात संपन्न;

औंध नगर आणि विद्यापीठ भागात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विजयादशमी उत्सव उत्साहात संपन्न; पुणे (शशिकांत पाटोळे) : औंध नगर आणि विद्यापीठ भागातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा वार्षिक...

बाणेरमध्ये जबरी चोरी करणाऱ्या पाच जणांच्या टोळीला पोलिसांकडून जेरबंद; सोन्याचे दागिने व रोकड हस्तगत

पुणे: पुण्यातील बाणेर परिसरात रात्रीच्या सुमारास नागरिकाला अडवून मारहाण करत सोन्याचे दागिने आणि ऑनलाईन पैसे जबरदस्तीने ट्रान्सफर करून लूटमार करणाऱ्या पाच जणांच्या टोळीला बाणेर पोलीस...

error: Content is protected !!