Homeताज्या बातम्याभारती विद्यापीठ पोलीस ठाण्याची मोठी कारवाई: मागील सहा महिन्यांपासून पोलिसांना गुंगारा देणारा...

भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याची मोठी कारवाई: मागील सहा महिन्यांपासून पोलिसांना गुंगारा देणारा गांजा तस्करीतील मुख्य सूत्रधार जेरबंद

पुणे:
पुणे शहर पोलीस आयुक्तांच्या अंतर्गत येणाऱ्या भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत गांजा तस्करी करणाऱ्या आणि मागील तब्बल सहा महिन्यांपासून पोलिसांना सतत गुंगारा देणाऱ्या एका कुख्यात मुख्य सूत्रधारास अटक करण्यात पुणे पोलिसांना मोठे यश आले आहे. या कारवाईमुळे अंमली पदार्थ तस्करी करणाऱ्या रॅकेटला मोठा सुरुंग लागला आहे.
​गुन्ह्याची पार्श्वभूमी व मुख्य आरोपी:
​भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन येथे दाखल असलेल्या गुन्ह्यात आरोपी नामे १. चारुदत्त काळुराम चव्हाण, २. अजय पोपटराव पाडूळे यांच्याविरुद्ध एकूण ३५.०७६ किलो ग्रॅम वजनाचा व्यावसायिक स्वरूपाचा गांजा विक्रीकरता जवळ बाळगल्याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर २३९/२०२६, एन.डी.पी.एस. अॅक्ट कलम ८ (क), २०(ब)(ii)(क), २९ अन्वये गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्याच्या तपासामध्ये पाहिजे असलेला आरोपी अजय पोपटराव पाडूळे हा पुणे शहरामध्ये गांजा विक्री करणाऱ्या व्यवसायाचा मुख्य सूत्रधार असल्याचे निष्पन्न झाले होते.
​सापळा रचून अटक:
​दाखल गुन्ह्यातील मुख्य पाहिजे असलेला आरोपी अजय पोपटराव पाडूळे (वय ३० वर्षे, रा. नवी म्हाडा कॉलनी, बिल्डींग नंबर ११, फ्लॅट नंबर १०९, हडपसर, पुणे) हा पुणे शहरातून आपले अस्तित्व लपवून महाराष्ट्र राज्यातून पसार झाला होता. त्याचा शोध घेण्यासाठी भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुदर्शन गायकवाड यांच्या मार्गदर्शन व सूचनांप्रमाणे तपास पथकाचे अधिकारी निलेश मोकाशी, पोलीस अंमलदार किरण साबळे, मंगेश गायकवाड, तुकाराम सुतार, मंगेश पवार, संदीप आगळे हे कसून शोध घेत होते.
​दरम्यान, आरोपी अजय पोपटराव पाडूळे हा त्याचे आई व बहिणीस भेटण्यासाठी पुरंदर चौक, नवी म्हाडा कॉलनी, हडपसर, पुणे येथे येणार असल्याची खात्रीशीर बातमी पोलिसांना मिळाली. त्यानुसार नमूद अधिकारी व अंमलदार यांनी तात्काळ त्या ठिकाणी जाऊन सापळा रचला. आरोपी हा आई व बहिणीस भेटण्यासाठी आला असताना त्यास शिताफीने ताब्यात घेण्यात आले आणि दिनांक ०५/०९/२०२६ रोजी त्यास अटक करण्यात आली. या पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक निलेश मोकाशी हे करीत आहेत.
​इतर गुन्ह्यांची माहिती:
​सदर आरोपी हा केवळ एकाच गुन्ह्यात नव्हे, तर खालीलप्रमाणे इतर पोलीस ठाण्यांमधील गांजा विक्रीच्या गुन्ह्यांमध्येही हवा होता: अ.क्र.पोलीस ठाणे व गुन्हा रजिस्टर नंबरकायदेकलम
१भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन गु.रं.नं. १९६/२०२६एन.डी.पी.एस. अॅक्ट क. ८ (क), २०(ब)(ii)(अ)
२लोणी काळभोर पोलीस स्टेशन गु.रं.नं. ६९/२०२६एन.डी.पी.एस. अॅक्ट क. ८ (क), २०(ब)(ii)(क)
३वानवडी पोलीस स्टेशन गु.रं.नं. ४१९/२०२६एन.डी.पी.एस. अॅक्ट कलम ८ (क), २०(ब)(ii)(क)मार्गदर्शन व यशस्वी पोलीस पथक:
​सदरची उल्लेखनीय कामगिरी मा. पोलीस उप आयुक्त परिमंडळ, पुणे शहर, श्री. मिलींद मोहीते, मा. सहाय्यक पोलीस आयुक्त, भारती विद्यापीठ विभाग, पुणे शहर श्री. राहुल आवारे यांच्या मार्गदर्शनाखाली, भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनकडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. सुदर्शन गायकवाड, पोलीस निरीक्षक (गुन्हे) संतोष जाधव यांच्या सूचनांप्रमाणे खालील पोलीस अंमलदार व अधिकारी यांच्या पथकाने पार पाडली आहे:
​पोलीस उपनिरीक्षक: निलेश मोकाशी
​पोलीस अंमलदार: किरण साबळे, मंगेश गायकवाड, मंगेश पवार, तुकाराम सुतार, संदीप आगळे, मितेश चोरमोले, अभिनय चौधरी, सागर बोरगे, सोहम शेंडकर, सचिन सरपाले, निलेश खैरमोडे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

मुंढवा पोलीस स्टेशनची मोठी कारवाई: अटक दोन आरोपींकडून २ लाख २७ हजार रुपयांचे १४...

पुणे: पुणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या अंतर्गत येणाऱ्या मुंढवा पोलीस स्टेशनच्या तपास पथकातील अधिकारी व अंमलदारांनी कौशल्यपूर्ण तपास करून एका गुन्ह्यात महत्त्वाची कामगिरी केली आहे. मुंढवा...

ट्रान्सफॉर्मर (डीपी) चोरी करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश; तिघांना अटक, १२ लाख ७३ हजारांचा मुद्देमाल...

पुणे: पुणे शहर पोलीस आयुक्तालय तसेच आसपासच्या परिसरात वाढत्या ट्रान्सफॉर्मर (डी.पी.) चोरीच्या घटनांच्या अनुषंगाने गुन्हे शाखा युनिट-७ चे पथक गस्त घालत असताना, वाडेगाव (ता. हवेली,...

लोहार समाज हक्काच्या मागण्यांसाठी आक्रमक; मागण्या मान्य न झाल्यास पंढरपुरात सकल लोहार समाजाचे आमरण...

लोहार समाज हक्काच्या मागण्यांसाठी आक्रमक; मागण्या मान्य न झाल्यास पंढरपुरात सकल लोहार समाजाचे आमरण उपोषण पंढरपूर | प्रतिनिधी : लोहार समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी विविध शासकीय...

मुंढवा पोलीस ठाण्याची अमली पदार्थ विरोधी उल्लेखनीय कामगिरी: तडीपार महिलेच्या ताब्यातून १ किलो ४३५...

मुंढवा पोलीस ठाण्याच्या हद्दीत गायरान वस्ती येथे अमली पदार्थ गुन्ह्यातील तडीपार महिला नामे निकीता राकेश गारुंगे, वय ३१ वर्षे, रा. गायरान वस्ती, केशवनगर मुंढवा...

स्नॅपचॅटवर ‘प्रिन्सिका’ बनून मैत्री, क्रिप्टोमध्ये दीड लाखांची फसवणूक; मुलीच्या आवाजामागचा ‘तो’ सायबर पोलिसांच्या ताब्यात

पुणे: पुणे शहर सायबर पोलीस स्टेशन येथे दाखल असलेल्या गु.र.नं. १०९/२०२६ नुसार भारतीय न्याय संहितेच्या कलमे ३१९(२), ३१८(४) आणि माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० च्या...

error: Content is protected !!