स्वस्त धान्य दुकानात रेशनिंग बाबुची मनमानी कधी थांबणार..
क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्युज सहसंपादक शिवाजी दवणे 9730170965.
महाराष्ट्र शासनाचा पुरवठा विभागातील आँनलाईन कारभार होऊन देखील आजही एकही काम धडाचे होईना रेशनिंग विभागाचे सर्वर कधी डाऊन कधी गायब रेशनिंग कार्ड मध्ये ऑनलाइन नावे समाविष्ट होण्यासाठी लागतात सहा सहा महिने, नवीन रेशन कार्ड काढणे म्हणजे अग्नी परीक्षाच काम आहे. रेशनिंग कार्ड मध्ये नाव कमी करण्यासाठी वारंवार सेतू केंद्र पुरवठा विभागात चक्क मारून काम होतं नाही.अनेक ठिकाणी गोरगरीब जनतेची अडवणूक लुट हे समिकरण झाले आहे. अहिल्यानगर जिल्हात अनेक जिल्ह्यधिकारी आले आणि गेले आणि हे जिल्हाधिकारी जातील पण रेशनिंग पुरवठा विभागाचा कारभार सुधारण्यासाठी कोणत्याही प्रकारची ठोस कार्यवाही आजपर्यंत कोणत्याही जिल्हा पुरवठा अधिकाऱ्याने केलेली नाही. ना जिल्हाधिकारी कधी या सामान्यां माणसांची रेशनिंग समस्या दखल घेतील सामान्य नागरिकांचे हे दुःख जे आहे तेच आहे.
परंतु शासनाकडे या रेशनिंग कार्ड, स्वतः धान्य बाबुमनमानी कारभार विषयावर आजही ठोस कार्यवाही उपाययोजना केलेल्या दिसत नाही.तसेच नगर तालुक्यातील अनेक स्वतः धान्य दुकानदार आजही मनमानी कारभार केल्याचे सातत्याने समोर येत आहे. यात चांगलं काम करणारे दुकानदार आहेत या दुकानदारांचा योग्य सन्मान होण गरजेच आहे.शासनाचा स्वतः धान्य दुकानदार शासनाचे नियमानुसार कामकाज करत नाही. फलक न लावणे, तक्रार बुक उपलब्ध न करणे, आँनलाईन पावती न देणे, ताटकळत ठेवणे, अपमानास्पद भाषा वारंवार वापर करणे, रेशनिंग सचिवाना दरमहा चिरीमिरी पोहच होत असल्याने आज पर्यंत रेशनिंग स्वतः धान्य दुकानदार विरोधात सचिवाने कारवाई केल्याचे एक उदाहरण दाखवण्यासाठी आहे का…? शासन स्तरावर स्वतः याबाबत कुठलीही कारवाई का करत नाही. खेडेगावात सामान्य जीवन आजही रोजंदारीवर आहे. या साठी फिरावे लागते. सकाळीच रोजंदारीच्या शोधात भटकंती करावी लागते. कामावरून उशिरा सुट्टी होते रेशनिंग दुकान तर दुपारी १ नंतर बंद थेट दुसऱ्या दिवशी भेट झाली तर ठिक अनेक रेशनिंग दुकान हे महिन्यात चार दिवस उघडले जाते ते महिन्याच्या अखेरीस मग सामान्य नागरिकांना स्वतः धान्य खरेदी साठी आर्थिक तडजोड करावी लागते सदर दुकान सकाळी ११.नंतर उघडले जाते दुपारी १ बंद मग या चार दिवसांत कामाचं नियोजन आणि वेळेच नियोजन करण्यात सामान्य माणसाचे महिन्याचे आर्थिक गणित कोलमडले जाते. रेशनिंग बाबुचा बोलण्याचा दिमाख , अपमानास्पद वागणूक, अनेक पद्धतींनी रेशनिंग बाबु हा रेशनिंग बाबतीत हा नेहमीच अनुभव झाला आहे खाजगी सामान्य नागरिक सांगत असतात नियमा पेक्षा दहा पंधरा रुपये लुट वेगळी काटा मध्ये चलाखी पणा हा रेशनिंग बाबुना चालाखी लगाम लावणारा महसुल विभागात कडक शिस्त प्रिय अधिकारी आहे का नाही. सगळे या चिरीमिरी गुंतलेले हात आहे . हा प्रश्न सर्वसामान्य माणसाला वाली कोण आहे का नाही. लोकप्रतिनिधी या रेशनिंग बाबतीत ठोस कार्यवाही करताना दिसत नाही.नगर तालुक्यातील या रेशनिंग बाबु विरोधात लेखी तक्रार दिल्या नंतर नगर तहसीलदार आता तरी आपल्या अधिकाराचा बडगा या रेशनिंग बाबुना दाखवणार का हा प्रश्न सर्वसामान्य नागरिक विचारत आहेत
का मागचे पाडे पंचव्वन रहाणार…!
चौकट….
नगर तालुक्यातील दहिगाव येथील स्वतःधान्यदुकानदारा विरोधात दहिगाव येथील रहिवासी ग्रामस्थांनी लेखी तक्रार दाखल केली आहे. धान्य देण्यासाठी टाळाटाळ करणे वेळेत हजर नसणे,आधार लिंक नाही हे कारण सा़ंगण, राजकीय द्वेषातून रेशनिंग देत नसल्याची तक्रारदार तहसीलदार नगर कार्यालय दाखल केली आहे आता नगर पुरवठा विभाग काय कारवाई करणार तक्रारदार यांनी पुरवठा विभागांच्या आँनलाईन सिस्टीम पाहणी केली असता रेशनिंग लिंक व्यवस्थित दाखवत आहे. मग आता पुरवठा विभाग दहिगाव रेशनिंग दुकान क्रमांक ४९ वर कारवाई काय करणार या कडे नगर तालुक्यातील ग्रामस्थांचे लक्ष लागुन आहे.
चौकट…..
रेशनिंग बाबतीत सेवा हमी कायदा लागु आहे का नाही, महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, २०१५ (सेवा हमी कायदा) २८ एप्रिल २०१५ पासून प्रभावी असून, हा कायदा नागरिकांना सरकारी व निमशासकीय सेवा पारदर्शक आणि विहित मुदतीत (७ ते ४५ दिवस) मिळवून देतो या कायद्यामुळे ‘सरकारी काम आणि सहा महिने थांब’ ही पद्धत बंद होऊन, कामात टाळाटाळ करणाऱ्या अधिकाऱ्यांवर दंडात्मक कारवाईची तरतूद आहे.

(Grievance Redressal – IT Rules 2021)
क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्यूज (Crimemaharashtra.live) हे केंद्र सरकारच्या माहिती तंत्रज्ञान नियम, २०२१ (IT Rules 2021) च्या नियम १८ अंतर्गत नोंदणीकृत आणि नियमांचे पालन करणारे अधिकृत डिजिटल न्यूज पोर्टल आहे. आमच्या पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या कोणत्याही बातमी, लेख किंवा मजकुराबाबत आपल्याला काही आक्षेप किंवा तक्रार असल्यास, आपण आमच्या मुख्य तक्रार निवारण अधिकाऱ्यांकडे लेखी नोंदणी करू शकता.
कायदा आणि नियमांनुसार आपल्या तक्रारीची २४ तासांच्या आत दखल घेऊन १५ दिवसांच्या आत त्याचे निवारण केले जाईल.
📌 मुख्य तक्रार निवारण अधिकारी (Level 1):
अधिकारी: आमीर मोहम्मद शेख (Editor & Publisher)
वेबसाईट: https://crimemaharashtra.live
अधिकृत ईमेल: crimemaharashtra.live@gmail.com
Info@crimemaharashtra.live
कार्यालयीन पत्ता: पुणे, महाराष्ट्रIn accordance with Rule 11(2)(a) of the Information Technology (Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules, 2021, any person having a grievance regarding the content published on Crimemaharashtra.live may send their complaint to the designated Grievance Redressal Officer.
Grievance Officer: Amir Mohammad Shaikh (Editor & Publisher)
Website: https://crimemaharashtra.live
Official Email: crimemaharashtra.live@gmail.com
Address: Pune, Maharashtra, India.
Note: Please ensure that your complaint includes the specific URL of the news article, the date of publication, and a clear description of the grievance along with supporting documents. All grievances will be acknowledged within 24 hours and resolved within 15 days.,























