Homeताज्या बातम्यामित्राचा जीव घेणाऱ्या आरोपींना काळेपडळ पोलिसांनी ४८ तासांच्या आत ठोकल्या बेड्या; ३...

मित्राचा जीव घेणाऱ्या आरोपींना काळेपडळ पोलिसांनी ४८ तासांच्या आत ठोकल्या बेड्या; ३ आरोपी गजाआड

पुणे:
पुण्यातील होळकरवाडी परिसरामध्ये मित्राचा खून करून फरार झालेल्या आरोपींचा शोध लावण्यात काळेपडळ पोलीस स्टेशनच्या तपास पथकाला मोठे यश आले आहे. पोलिसांनी अत्यंत सराईतपणे अवघ्या ४८ तासांच्या आत मुख्य आरोपीसह त्याच्या दोन्ही साथीदारांना बेड्या ठोकल्या आहेत.
​मित्राचा गंभीर दुखापत करून खून
​मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक २०/०६/२०२६ रोजी काळेपडळ पोलीस स्टेशन येथे गु.र.नं. २७३/२०२६ भा.न्या.सं.क. १०३ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यातील फिर्यादी यांचे मयत चुलत भाऊ आकाश मारुती झांबरे (वय ३१ वर्षे, रा. झांबरे तालीम चौक, गणेश मंदिराशेजारी, होळकरवाडी, ता. हवेली, जि. पुणे) यांना एका अज्ञात इसमाने अज्ञात कारणावरून डोक्यात व तोंडावर मारून गंभीर जखमी केले होते, ज्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला होता.
​सीसीटीव्ही आणि तांत्रिक विश्लेषणाने लागला सुगावा
​या गंभीर गुन्ह्याचा तपास करत असताना पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण आणि परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फूटेज तपासले. त्या आधारे पोलिसांनी संशयित आरोपी आकाश उर्फ आक्या अशोक भरेकर (वय ३३ वर्षे, रा. मयुर पार्क, हांडेवाडी, पुणे) याला ताब्यात घेतले. त्याची सखोल चौकशी केली असता, त्याने हा गुन्हा त्याचे साथीदार संतोष बबन टकले व साहिल अर्जुन कचरावत यांच्या मदतीने केल्याची कबुली दिली. गुन्हा दाखल झाल्यापासून हे दोन्ही साथीदार फरार होते.
​बोपदेवघाटाच्या दिशेने पळताना फिल्मी स्टाईलने आवळल्या आवळल्या मुसक्या
​दिनांक २२/०६/२०२६ रोजी तपास पथकाचे पोलीस अंमलदार दाऊद सय्यद यांना त्यांच्या गोपनीय बातमीदारामार्फत खात्रीशीर माहिती मिळाली की, सदर दोन्ही फरार आरोपी येवलेवाडी येथे आले असून तिथून पळून जाण्याच्या तयारीत आहेत. माहिती मिळताच तपास पथकाच्या अधिकारी व अंमलदारांनी तात्काळ येवलेवाडी गाठली. पोलीस आल्याची भणक लागताच आरोपी रिक्षात बसून बोपदेवघाटाच्या दिशेने पळून गेले. मात्र, पोलिसांनी तात्परतेने सापळा रचून, आरोपींचा थरारक पाठलाग केला आणि त्यांना शिताफीने ताब्यात घेतले. त्यांची नावे विचारली असता त्यांनी आपली नावे:
१) संतोष बबन टकले (वय ३४ वर्षे, रा. हांडेवाडी, पुणे)
२) साहिल अर्जुन कचरावत (वय २६ वर्षे, रा. हांडेवाडी, पुणे) असे असल्याचे सांगितले.
​या पोलीस पथकाने केली धडक कारवाई
​सदरची उल्लेखनीय कामगिरी मा. अपर पोलीस आयुक्त (पुर्व प्रादेशिक विभाग, पुणे शहर) श्री. मनोज पाटील, मा. पोलीस उप-आयुक्त (परिमंडळ ६, पुणे शहर) श्री. जीवन बेनिवाल, आणि मा. सहाय्यक पोलीस आयुक्त (हडपसर विभाग, पुणे शहर) श्री. अतुलकुमार नवगिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
​तसेच वरिष्ठ पोलीस निरीक्षक (काळेपडळ पोलीस स्टेशन) श्रीमती गिरीषा निंबाळकर, आणि पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्री. अण्णासो बाबर यांच्या सूचनांनुसार तपास पथकातील खालील अधिकारी व अंमलदारांनी ही यशस्वी कारवाई केली:
​अधिकारी: सपोनि विलास सुतार, अमित शेटे.
​पोलीस अंमलदार: प्रविण काळभोर, दाऊद सय्यद, प्रतिक लाहीगुडे, शाहीद शेख, किशोर पोटे, अमोल फडतरे, निलेश देसाई, अतुल पंधरकर, विशाल ठोंबरे, लक्ष्मण काळे, नितीन ढोले, सद्दाम तांबोळी, प्रदिप बेडीस्कर, महादेव शिंदे, गिरीराज जगदाळे आणि अमोल जाधव.
​या धडक कारवाईमुळे काळेपडळ पोलीस प्रशासनाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

नवले ब्रिजजवळ पुणे पोलिसांची मोठी कारवाई: गुजरातहून आणलेला तब्बल २३ लाखांचा प्रतिबंधित गुटखा जप्त;...

पुणे: गुजरात येथून ट्रॅव्हल्स बसमधून पुणे शहरात विक्रीसाठी आणलेला तब्बल २२,९१,५३४/- (बावीस लाख एक्याण्णव हजार पाचशे चौतीस) रुपये किमतीचा प्रतिबंधित गुटखा जप्त करण्यात नऱ्हे पोलिसांना...

पुणे पोलिसांची मोठी कारवाई: दोन ‘मोक्का’ गुन्ह्यांतील फरार आरोपी शशिकांत ऊर्फ पप्पू दळवी कोथरूडमधून...

पुणे, २३ जून २०२६: पुणे शहर पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट-३ च्या पथकाने अत्यंत धडाकेबाज कामगिरी करत दोन गंभीर 'मोक्का' (MCOCA) गुन्ह्यांमध्ये दीर्घकाळापासून फरार असलेल्या एका...

pune trek death: लोहगड किल्ल्याचे आमिष दाखवून ४०० फुटांवरून ढकलले: मंगेतर सिया गोयल, प्रियकराने...

केतन विशाल अग्रवाल (लि.) या पीडित तरुणाला वाढदिवसाचे आमिष दाखवून गडावर नेण्यात आले. पोलिसांनी मंगेतर (एम) आणि तिच्या कथित प्रियकराला (आर) तिच्या मंगेतरला...

केतन अग्रवालचा शेवटचा ट्रेक: लोहगड किल्ल्याचा सीसीटीव्ही आणि हुडीमधील संशयिताच्या फोटोने सिया गोयलच्या खोट्याला...

पुणे: वाढदिवसाची सहल म्हणजे आता कथित हत्येची घटना समोर आली आहे, अन्वेषकांनी 26 वर्षीय केतन अग्रवालच्या शेवटच्या क्षणांचा शोध लावला आहे, ज्याचा...

संपूर्ण महाराष्ट्रात नागरी मालमत्तेचे नकाशे पुन्हा रेखाटण्यासाठी ड्रोन सर्वेक्षण; 1.4 लाख उत्परिवर्तन अर्ज ऑनलाइन...

राज्य सरकारने शहरी मालमत्तेचे नकाशा तयार करण्यासाठी ड्रोन-आधारित सर्वेक्षण सुरू केले आहे आणि सुमारे एक कोटी रेकॉर्डसाठी उत्परिवर्तन प्रक्रियेचे डिजिटायझेशन करत आहे. पुणे...

error: Content is protected !!