Homeक्राईममॉर्निंग वॉक करणाऱ्या महीलेच्या गळयातील सोन्याची साखळी जबरदस्तीने हिस्कावणाऱ्या सराईत आरोपीस जेरबंद...

मॉर्निंग वॉक करणाऱ्या महीलेच्या गळयातील सोन्याची साखळी जबरदस्तीने हिस्कावणाऱ्या सराईत आरोपीस जेरबंद “

पुणे-:: दिनांक ३०/०१/२०२५ रोजी सकाळी ०५.४५ वा चे सुमारास प्रज्ञा वॉशींग सेन्टर समोर, त्रिमुर्ती चौकाचे पुढे, भारती विद्यापीठ, पुणे येथे फिर्यादी निता रामचंद्र शिर्के, वय ५० वर्षे, व्यवसाय काही नाही, रा. श्रेयस घरकुल गर्ल हॉस्टेल, प्रज्ञा वॉशिंग सेन्टरचे गल्लीमध्ये त्रिमुर्ती चौकाजवळ, भारती विद्यापीठ, पुणे हे वॉकीग करत असताना हिरो होंडा मोटार सायकल वरुन आलेल्या दोन इसमांनी आपआपसात संगनमत करुन फिर्यादी यांचे गळयातील ४०,०००/-रुपये किंमतीची सोन्याची चैन हिसका मारुन चोरुन नेली आहे म्हणुन फिर्यादी यांनी दिले तक्रारीवरुन भारती विदयापीठ पोलीस स्टेशन, गुन्हा रजि नंबर ७६/२०२५ भारतीय न्याय संहीता कलम ३०४, ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सदरचा गुन्हा गंभीर स्वरुपाचा असल्यामुळे मा. वरीष्ठ पोलीस निरीक्षक सावळाराम पु. साळगांवकर यांनी तपास पथकाचे अधिकारी पोलीस उप निरीक्षक निलेश मोकाशी व अंमलदार यांना आरोपींचा तात्काळ शोथ घेणेबाबतचे मार्गदर्शन केले होते. त्यानुसार भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनचे तपास पथकाचे अंमलदार मंगेश पवार, निलंश खैरमोडे, सचिन गाडे हे तांत्रिक विश्लेषणाच्या आधारावरुन आरोपींचा शोध घेत असताना सदरचा गुन्हा रेकॉर्डवरील राजु महादेव डेंगळे, वय २२ वर्षे, रा. प्रतिकनगर, गोकुळनगर, गल्ली नंबर १, कात्रज कोंढवा रोड, पुणे यांनी केल्याची खात्रीशीर माहीती मिळाली. त्यानुसार आरोपी राजु डेंगळे याचा शोध घेतला असता तो कात्रज कोंढवा रोडवर मिळुन आल्याने त्यास नमुद गुन्हयात दिनांक ०४/०२/२०२५ रोजी २०.२५ वा अटक करण्यात आली असुन आरोपीकडुन फिर्यादी यांचे चोरी केले १ तोळे वजनाची सोन्याची चैन जप्त करण्यात आली आहे. आरोपीकडे आणखीन गुन्हे केले आहेत अगर कसे याबाबत तपास चालु आहे.

सदरची कामगिरी मा. अमितेश कुमार मा. पोलीस आयुक्त साो, पुणे शहर, मा. रंजनकुमार शर्मा साो, पोलीस सह आयुक्त, पुणे शहर, मा. प्रविणकुमार पाटील साो, अपर पोलीस आयुकत, पश्चिम प्रादेशीक विभाग, पुणे, मा. श्रीमती स्मार्तना पाटील साो मा. पोलीस उप आयुक्त परिमंडळ २, मा. राहुल आवारे, मा. सहाय्यक पोलीस आयुक्त स्वारगेट विभाग, पुणे यांचे मार्गदर्शनाखाली भारती विदयापीठ पोलीस स्टेशनकडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक सावळाराम पु.साळगावकर, राहुलकुमार खिलारे, व तपास पथकाचे अधिकारी पोलीस उपनिरीक्षक निलेश मोकाशी, पोलीस अंमलदार मंगेश पवार, निलेश खैरमोडे, सचिन गाडे, चेतन गोरे, महेश बारवकर, अचिन सरपाले, मितेश चोरमोले, अभिनय चौधरी, सागर बोरगे यांच्या पथकाने केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

बाहेरगावी जाताना इंद्रायणी नदीत बुडून एकाचा मृत्यू. पुणे बातम्या

पुणे : तळेगाव दाभाडेजवळील कुंड मळा येथे शुक्रवारी दुपारी इंद्रायणी नदीत एका २४ वर्षीय तरुणाचा बुडून मृत्यू झाला. प्रथमेश लोणारे असे पीडित तरुणाचे नाव...

आरोग्यसेवेसाठी राष्ट्रीय AI धोरण काम करत आहे, NHA CEO | पुणे बातम्या

पुणे: राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाचे (NHA) सीईओ डॉ सुनील कुमार बर्नवाल यांनी शुक्रवारी सांगितले की, सरकार आरोग्य सेवेसाठी एआयसाठी राष्ट्रीय धोरण विकसित करत आहे."AI सारखे...

निष्काळजीपणामुळे बाळाच्या मृत्यूप्रकरणी 4 डॉक्टर, 2 परिचारिकांवर एफआयआर. पुणे बातम्या

पुणे : गेल्या वर्षी अकरा महिन्यांच्या बालिकेच्या मृत्यूप्रकरणी निष्काळजीपणा आणि फसवणूक करून मृत्यूला कारणीभूत ठरल्याप्रकरणी नवी पेठेतील चिन्मय नर्सिंग होमच्या चार बालरोगतज्ज्ञ आणि दोन...

IAF लढाऊ विमानाच्या ‘हार्ड लँडिंग’मुळे पुण्याची धावपट्टी बंद पडली, रात्रीच्या उड्डाणांवर परिणाम झाला. पुणे...

पुणे: भारतीय हवाई दलाच्या (IAF) विमानाचा समावेश असलेल्या एका घटनेनंतर त्याची धावपट्टी लँडिंग आणि टेक-ऑफसाठी बंद करण्यात आल्याने शुक्रवारी रात्री 11 च्या...

खंडणी प्रकरणातील खून उघड; चंदननगर पोलिसांची जलद कारवाई, ०६ तासांत आरोपी जेरबंद

पुणे | प्रतिनिधी पुणे शहरातील चंदननगर परिसरात घडलेल्या खळबळजनक खून प्रकरणाचा उलगडा करत खंडणी विरोधी पथक-२, गुन्हे शाखा व चंदननगर पोलिसांनी अवघ्या ०६ तासांत आरोपींना...

error: Content is protected !!